मराठी माणसांसाठी खेळलो, ट्रॉफीपेक्षा त्यांची मनं महत्त्वाची! - घनःश्याम दरवडे
घनःश्याम दरवडे हे छोटा पुढारी म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रोखटोक मताचे राज्यभरात चाहते आहेत. मात्र बिग बॉसच्या घरातला त्यांचा खेळ काही प्रेक्षकांना फार रुचला नाही. अगदी तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात त्यांचा खेळ दिसू लागला होता, मात्र तेवढ्यातच त्यांचं एलिमिनेशन झालं. मुलाखतीत ते नेमकं काय म्हणाले, पाहूया. ‘मी अहिल्यानगरमधून आहे आणि मी नगरकरांचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न निश्चित केला. ज्या ज्या गोष्टी मला शक्य होत्या, माझी मतं, माझा टास्क, माझा गेम, माझी मैत्री या सगळ्या गोष्टी मी सातत्यात उतरवल्या.' - घनःश्याम दरवडे 'घरात राजकारण करायचं म्हटलं तर मला लय टाइम नसता लागला, 2 मिनिटात राजकारण केलं असतं पण मला रियालिटी शोमध्ये माझी रियालिटी पर्सनालिटी दाखवायची होती. त्यामुळे मी डोक्यानी गेम कमी खेळलो आणि हृदयापासून गेम जास्त खेळलो.' - घनःश्याम दरवडे 'घनःश्याम दरवडे असं व्यक्तिमत्त्व आहे की, आजही महाराष्ट्र म्हणत नाही की, तो ग्रुपसाठी खेळला आणि ग्रुपनी त्याचा वापर केला. मी माझा स्वतःचा खेळलो याचा मला सार्थ अभिमान आहे.' - घनःश्याम दरवडे 'मी कमेंट्स वाचल्या नाही पण बहिणीकडून मला कळल्या कमेंट्स, मला असं वाटतंय की, कुठंतरी माझ्या जीवनाचं पारणं फिटलं. बऱ्याच लोकांच्या डोळ्यात अश्रू आले मी बिग बॉसमधून आल्यानंतर. बाहेर येताना का होईना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, जनतेनं मला पहिल्यापेक्षा दुप्पट प्रेम दिलं. हेच माझ्यासाठी लय आहे, तिथंच मी जिंकलो.' - घनःश्याम दरवडे 'प्रत्येकाला वाटतं ट्रॉफी मला हवी, ट्रॉफी मला हवी, पण मी सांगतो मी ट्रॉफीसाठी खेळलो नाही. मी मराठी माणसांसाठी खेळलो, मी मराठी माणसांचा होतो, त्यांच्यासाठी खेळलो. मला ट्रॉफीपेक्षा मराठी माणसांची मनं महत्त्वाची होती.' - घनःश्याम दरवडे 'वाघ जरी रक्ताच्या थारोळ्यात पडला तरी त्याचं वाघपण जात नाही, तशी ही जनता वाघ आहे, मी थारोळ्यात जरी पडलो असलो तरी यांच्या सपोर्टनी पुन्हा उठेन आणि पुन्हा मैदानात येईन.’ - घनःश्याम दरवडे
2024-09-11T05:03:49Z