नवी मुंबई: नवी मुंबईतील नेरुळ येथे डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, मध्ये बीसीसीआय महीला प्रीमीयर लीग टी २० क्रिकेट सामने खेळविले जाणार आहेत. सामने होणार त्या दिवशी स्टेडियमला येणारे खेळाडू व महत्वांच्या व्यक्तींचा जाण्याचा व येण्याचा मार्ग स्टेडियम नजिकच्या भिमाशंकर सोसायटी ते एल. पी. रिक्षा स्टॅण्ड या दरम्यानच्या सेवा रस्ता मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव व वाहतुक कोंडी होवू नये याकरीता नागरिकांच्या वाहनांना ये-जा करण्यास व वाहने पार्किंग करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
९ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, नेरूळ या ठिकाणी बीसीसीआय महीला प्रीमीयर लीग टी २० क्रिकेट सामने खेळविले जाणार आहेत. या सामान्या निमित्त स्टेडियमला येणारे खेळाडू व महत्वांच्या व्यक्तींचा जाण्याचा व येण्याचा मार्ग स्टेडियम नजिकच्या भिमाशंकर सोसायटी ते एल. पी. रिक्षा स्टॅण्ड या दरम्यानच्या सेवा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर आता सुरक्षेच्या कारणास्तव व वाहतुक कोंडी होवू नये याकरीता नागरिकांच्या वाहनांना ये-जा करण्यास व वाहने पार्किंग करण्यास मनाई करणे आवश्यक आहे. त्याकरीता अधिसूचना निर्गमित करण्यासाठी अहवाल सादर करण्यात आलेला आहे.
तुर्भे वाहतूक शाखेच्या हददीत९ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान सकाळी ०७:०० ते रात्री ११ पर्यंत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम जवळील भिमाशंकर सोसायटी ते एल. पी. रिक्षा स्टॅण्ड या दरम्यानच्या सेवा मार्गाचा वापर होणार असल्याने या मार्गावरून असणाऱ्या नियमित वाहतूक खोळंबून राहू नये तसेच वाहतुकीस अडथळा येऊ नये यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.
पर्यायी मार्ग – शीव – पनवेल महामार्ग वरील उरण फाटा ते नेरुळ एल. पी. उड्डाणपूल दरम्यानच्या रस्त्याने मार्गक्रमण करीत वाहन चालक पुढे इच्छित स्थळी जाऊ शकतात. तसेच नेरुळ एल पी उड्डाणपूल .कडे जाणारी वाहन चालकांनी सेवा मार्गाचा वापर न करता शीव पनवेल महामार्गाचा अवलंब करीत मार्गस्त व्हावे असे आवाहन नवी मुंबई वाहतूक विभागाने केले आहे.
ही वाहतुक नियंत्रण अधिसुचना ही इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच पोलीस वाहने, अग्निशमन वाहने , रुग्णवाहिका, शासकीय वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना तसेच आयपीएल व्यवस्थापनाचे अधिकृत पास धारक वाहने यांना लागु होणार नाही.
2026-01-09T13:05:17Z