बॅझबॉलचा सुफडा साफ! ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर अखेरच्या कसोटीत शानदार विजय; स्मिथने मालिका विजयाची ट्रॉफी पाहा कोणाला दिली?

ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील अखेरच्या पाचव्या कसोटीत इंग्लंड संघावर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४-१च्या फरकाने मालिकेत पराभव केला आहे. सिडनी कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे त्यांनी शेवटच्या दिवसाच्या खेळात ५ विकेट गमावून पूर्ण केले.

सिडनी कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचे टॉप-३ फलंदाज लवकर बाद झाले, पण जो रूट व हॅरी ब्रुकने संघाचा डाव सावरला. रूटने २४२ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने १६० धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रुकने ९७ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ८४ धावा केल्या. याशिवाय जेमि स्मिथने ४६ धावांची खेळी करत संघाला ३८४ धावांचा टप्पा गाठून दिला.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३८४ धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक १६० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड व स्टीव्ह स्मिथ यांनी पहिल्या डावात दोन शतकं झळकावली. हेडच्या १६३ धावा व स्मिथच्या १३८ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ५६७ धावा केल्या आणि १८३ धावांची आघाडी मिळवली.

दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडकडून डकेटने ४२ धावांची खेळी केली. तर २२ वर्षीय जेकब बेथलने मेडन शतक झळकावत १५४ धावा केल्या. तर हॅरी ब्रुकने ४२ धावा केल्या आणि ३४२ धावा करत विजयासाठी १६० धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलिया संघाला १६० धावांचा पाठलाग करतानाही फार कष्ट घ्यावे लागले, परिणामी संघाने सामना जिंकलाच. सर्व फलंदाजांनी ३०-४० धावांच्या खेळी करत संघाला विजयापर्यंत नेलं. इंग्लंडकडून जोश टंगने तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने उत्कृष्ट गोलंदाजी केली.

2026-01-08T04:20:14Z