आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या आयसीसी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. तर स्पर्धेत आठ विविध संघ सहभागी होणार आहेत, या सर्व संघांचे सामने पाकिस्तानात होणार आहेत तर भारतीय संघाचे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ गट टप्प्यात तीन सामने खेळणार आहे, पहिला सामना बांगलादेशविरूद्ध, दुसरा सामना पाकिस्तानविरूद्ध तर तिसरा सामना न्यूझीलंडवर दुबईच्या मैदानावर खेळवला जाईल.
पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यासाठीची तिकीट विक्री आधीच सुरू झाली आहे. आयसीसीने आता दुबईत होणाऱ्या भारताच्या सामन्यांसाठीची तिकिटांची किंमत आणि तिकीट विक्रीची वेळ आणि तारीख जाहीर केली आहे. दुबईत होणाऱ्या भारताच्या गट टप्प्यातील तीन सामन्यांची आणि पहिल्या उपांत्य फेरीची तिकिटं आज म्हणजेच ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ४ वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. दुबई, युएईमध्ये होणारे भारताचे हे सामने पाहण्यासाठी तिकीट विक्रीची माहिती आयसीसीने दिली आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यांसाठी चाहते ऑनलाइन तिकिटे खरेदी करू शकतात आणि यासाठी सामान्य किमतीची सुरूवात दुबईच्या रूपयाप्रमाणे AED 125 म्हणजेच भारतीय रूपयाप्रमाणे २,९६४ पासून होतील. तर कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या १० सामन्यांसाठी तिकीट विक्री सर्वसाधारणपणे सुरू झाली आहे.
भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांची तिकीटं बुक करण्यासाठी इथे क्लिक करा.
2025-02-03T07:48:53Z