GAUTAM GAMBHIR : गौतम गंभीरने निवडली भारताची ऑल टाईम इलेव्हन, रोहिसह ‘या’ दिग्गजांना दिला डच्चू, पाहा कोणत्या खेळाडूंना मिळाले स्थान?

Gautam Gambhir pick his all time Team India XI : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सर्व फॉरमॅटसाठी भाराताची ऑल टाईम इलेव्हन निवडले आहे. यामध्ये गौतम गंभीरने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आपल्या अकरा जणांच्या संघात स्थान दिले आहे. याशिवाय त्याने टीम इंडियाच्या अनेक दिग्गजांचाही समावेश केला आहे. विशेष म्हणजे गंभीरने आपल्या ऑल टाईम इलेव्हनमध्ये फक्त दोन वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. मात्र, या संघात रोहित शर्मा आणि सौरव गांगुली यांना स्थान मिळाले नाही.

या संघात गौतम गंभीरने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, एमएस धोनी आणि झहीर खान सारख्या दिग्गजांना स्थान दिले आहे, परंतु त्याने या संघात दिग्गज सुनील गावस्कर आणि कपिल देव तसेच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश केलेला नाही. रोहित-गावसकर यांची भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम सलामीवीरांमध्ये गणना केली जाते, तर जसप्रीत बुमराहने तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करून भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

स्पोर्ट्सकीडाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, गौतम गंभीरने वीरेंद्र सेहवागची त्याच्या सर्वकालीन इंडिया इलेव्हनचा सलामीवीर म्हणून निवड केली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर त्याने ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरसह राहुल द्रविडची निवड केली आहे. गंभीरने आपल्या संघात विराट कोहलीला पाचव्या क्रमांकावर आणि सहाव्या क्रमांकावर युवराज सिंगला ठेवले आहे.

गौतम गंभीरच्या ऑल टाईम इंडिया इलेव्हनचा यष्टिरक्षक दुसरा कोणी नसून माजी कर्णधार एमएस धोनी आहे.

हेही वाचा – Joe Root : जो रुटने सहा दिग्गजांना मागे टाकत केला मोठा पराक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसराच खेळाडू

गंभीरने आपल्या संघात एकूण चार वेगवान गोलंदाज ठेवले असून त्यात दोन फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. दोन फिरकीपटू म्हणून, त्याने अनिल कुंबळेसह रविचंद्रन अश्विनची त्याच्या सर्वकालीन इंडिया इलेव्हनमध्ये निवड केली आहे, तर वेगवान गोलंदाजांमध्ये त्याने झहीर खानसह इरफान पठाणचा समावेश केला आहे.

हेही वाचा – MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल

गौतम गंभीरची टीम इंडियासाठीची ऑल टाईम इलेव्हन (सर्व फॉरमॅटसाठी):

वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, एमएस धोनी (यष्टीरक्षक), अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्विन, इरफान पठाण, झहीर खान.

2024-09-02T08:57:48Z dg43tfdfdgfd