Harbhajan Singh on India Captains Rohit Sharma Harbhajan Singh: कर्णधारपदाच्या बाबतीत एमएस धोनी आणि रोहित शर्मा एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत, असे माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगचे मत आहे. हरभजन सिंगने ‘Find a Way with तरुवर कोहली’ या पॉडकास्टवर बोलताना काही प्रश्नांची उत्तरे दिली. तर भारताच्या कर्णधारांबद्दलही वक्तव्य केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व केल्याने रोहित शर्माला एक चांगला कर्णधार बनवले आहे, असे हरभजनने म्हटले. पॉडकास्टमध्ये, हरभजनने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळत असतानाच्या सुरूवातीच्या दिवसातील आठवणींना उजाळा दिला आहे.
हरभजन सिंगने सांगितले की, सौरव गांगुली कोणत्या कारणामुळे महान कर्णधार ठरला. हरभजन म्हणाला, ‘खेळाडू म्हणून तुम्हाला तुमच्या कर्णधाराकडून चांगली साथ हवी असते. हे सर्व मॅन मॅनेजमेंटबद्दल आहे. सौरव गांगुली या बाबतीत कदाचित सर्वोत्तम होता. त्याने आम्हाला मैदानात जाऊन खेळाचा आनंद लुटण्याचे स्वातंत्र्य दिले.
कोणालाही बदलण्याचा प्रयत्न केला नाही
हरभजन म्हणाला, ‘आम्ही सगळे वेगवेगळे होतो. मी राहुल द्रविडपेक्षा वेगळा आहे. झहीर खान माझ्यापेक्वेषा गळा आहे. आशिष नेहरा वेगळा आहे. त्याने कोणाचेही व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न न करता त्यांना आपपल्या परीने पुढे जाऊ देण्याची संधी दिली. अशा रीतीने त्याने आमच्या सर्वात्कृष्ट कामगिरी करून घेतली. एमएस धोनीने सौरवचा वारसा पुढे नेला, त्यानंतर रोहितने तो पुढे नेला. मला आशा आहे की भविष्यात जो कोणी टीम इंडियाचा कर्णधार होईल तोही हा वारसा पुढे नेईल.
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या तरुवर कोहलीने रोहित शर्माच्या नेतृत्व कौशल्याची तुलना दिवंगत शेन वॉर्नशी केली. तरूवर कोहली म्हणाला, ‘शेन वॉर्न रोहितसारखा होता. वॉर्म-अपमध्ये तो प्रत्येक व्यक्तीकडे यायचा आणि प्रत्येकाला भूमिका समजावून सांगायचा.’
हेही वाचा – Yograj Singh: “धोनीमुळे युवराजने लवकर निवृत्ती घेतली…”, वडिल योगराज सिंग यांचा गौप्यस्फोट
रोहित-धोनी दोघेही वेगळे
हरभजन सिंग म्हणाला, ‘धोनी आणि रोहित पूर्णपणे वेगळे आहेत. एमएस धोनी तुम्हाला तुमच्या चुकांमधून शिकू देईल. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना तो कधीही कोणत्याही खेळाडूकडे जात नाही आणि त्याला कसे मैदान सेट करायचे आहे हे विचारणार नाही.
हरभजन म्हणाला, ‘मला एक सामना आठवतो, ज्यात मी शॉर्ट फाईन लेगवर क्षेत्ररक्षण करत होतो आणि एमएस धोनी कीपिंग करत होता. शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत होता आणि केन विल्यमसनने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. पुढचा चेंडूही त्याच लेंग्थचा होता आणि विल्यमसनने तोच शॉट खेळला. मी एमएसकडे गेलो आणि त्याला शार्दुलला वेगळ्या लेंग्थने गोलंदाजी करण्यास सांग असे सांगितले. एमएसने मला सांगितले, ‘पाजी मी आता त्याला सांगितले तर तो कधीच शिकणार नाही. त्याला स्वतःहून शिकू द्या.
हेही वाचा – Farhan Ahmed: इंग्लंडच्या १६ वर्षीय खेळाडूने मोडला १५९ वर्षे जुना विक्रम, एकाच सामन्यात घेतले १० विकेट्स
हरभजन सिंग म्हणाला, ‘शार्दुलला जेव्हा चौकारांवर चौकार लागतील फटकेल तेव्हा तो पटकन शिकेल, असा त्याचा विचार होता. एमएस धोनीची ही पद्धत होती. रोहित शर्माबद्दल भारताचा माजी फिरकीपटू म्हणाला, ‘तो खूप वेगळा आहे. तो जाऊन प्रत्येक खेळाडूशी चर्चा करेल. तो एक अशाप्रकारचा माणूस आहे, जो तुमच्या खांद्यावर हात ठेवून सांगेल की तुम्हाला काय अपेक्षित आहे. तो तुम्हाला विश्वास देईल की होय तुम्ही हे करू शकता.
कसोटी कर्णधार आणि रोहित
हरभजन म्हणाला, ‘रोहितमध्ये सर्वात मोठा बदल तेव्हा झाला जेव्हा त्याने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद स्वीकारले. कसोटी कर्णधार म्हणून तुम्ही खूप काही शिकता. टी-२० मध्ये असे अनेक क्षण आहेत ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता, पण कसोटी क्रिकेटमध्ये तुम्ही तसे करू शकत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवतो. कसोटी सामने जिंकण्यासाठी त्याची रणनीती आणि अंमलबजावणी खूप महत्त्वाची आहे, हीच गोष्ट तुम्हाला उत्कृष्ट कर्णधार बनवते. स्टीव्ह वॉचे नाव लगेच माझ्या मनात येते कारण तो खूप चांगला कर्णधार होता. जर तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत असाल, तर टी-२० आणि वनडेमध्ये कर्णधार बनणे सोपे होईल.
2024-09-02T11:57:50Z dg43tfdfdgfd