Hardik Pandya Son Visits Home After Divorced with Natasa Stankovic: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक जुलै २०२३ मध्ये वेगळे झाले. ४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर हार्दिक आणि नताशाने घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर नताशा भारत सोडून मुलगा अगस्त्यसह मायदेशी सर्बियाला गेली. त्याचवेळी नताशा जवळपास दीड महिन्यानंतर भारतात परतली आहे. ज्याचे फोटो तिने स्वत: शेअर केले.
सध्या सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पंड्याची पत्नी पंखुरी ही अगस्त्यबरोबर मुंबईतील त्यांच्या राहत्या घरातील फोटो आहे. नताशा मुंबईत परतल्यानंतर तिने अगस्त्यला हार्दिक पंड्याच्या घरी नेले होते, ज्याचे फोटो पंखुरी शर्माने शेअर केले.
घटस्फोटानंतर हार्दिक पंड्याची पत्नी नताशा पहिल्यांदाच तिचा मुलगा अगस्त्याला त्याच्य घरी घेऊन गेली आहे. हार्दिकची वहिनी आणि त्याचा मोठा भाऊ कुणाल पंड्याची पत्नी पंखुरी शर्माने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये अगस्त्य त्याच्या भावांसोबत खेळताना मजा करताना दिसत आहे. पंखुरीने तिचा लेक आणि अगस्त्य यांना मांडीवर गेऊन पुस्तक वाचून दाखवत आहे. तिने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये पंखुरीने स्टोरी टाईम असं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा – WTC 2025 अंतिम फेरीची तारीख जाहीर, ICC ने केली घोषणा; पहिल्यांदाच ‘या’ मैदानावर होणार फायनल
हार्दिक पंड्या आणि नताशा यांचे २०२० मध्ये लग्न झाले आणि २०२१ मध्ये त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म झाला, परंतु जुलै २०२४ मध्ये दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत वेगळे होत असल्याचा निर्णय जाहीर केला.दोघांनी सांगितले की ते चार वर्षे एकत्र राहत होते, काही काळानंतर त्यांनी त्यांचे नाते टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु शेवटी त्यांना वाटले की वेगळं होणं दोघांसाठी एक चांगला पर्याय आहे. दोघांनीही हे स्पष्ट केले की ते त्यांचा मुलगा अगस्त्यचे को-पॅरेंट्स असतील आणि त्याच्या आनंदासाठी सर्व काही करतील.
नताशाने शेअर केल्या क्रिप्टिक पोस्ट
पती हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर नताशाने सोशल मीडियावर अनेक क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या होत्या. तिच्या पोस्टवरून ती हार्दिकला उद्देशून बोलत असल्याची चर्चा सुरू होती.
2024-09-04T06:58:32Z dg43tfdfdgfd