Joe Root 2nd player who scored most runs in winning matches in test : इंग्लंडचा फलंदाज जो रूट जेव्हा-जेव्हा मैदानात उतरतोय, तेव्हा तो कसोटी क्रिकेटमधील कोणता ना कोणता विक्रम मोडत आहे. खरं तर जो रूटच्या निशाण्यावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे, जो सध्या तेंडुलकरच्या नावावर आहे. मात्र, जो रूटने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ज्यामध्ये रूटने सचिन तेंडुलकरसह जगातील ६ महान क्रिकेटपटूंना मागे टाकले असून कसोटी क्रिकेटमध्ये संघाच्या विजयात सर्वाधिक धावा करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. आता त्याच्या पुढे फक्त एकच फलंदाज आहे.
जो रूटने श्रीलंकेविरुद्ध लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली आणि सामन्यात एकूण २४६ धावा केल्या. यासह जो रूटने ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज स्टीव्ह वॉला मागे टाकले आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये विजयात ६४६० धावा केल्या होत्या, तर जो रूटने आता संघाच्या विजयात ६५७१ धावा केल्या आहेत. मात्र, या यादीत अव्वल स्थानावर ऑस्ट्रेलियाचा महान माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये विजयी सामन्यांत ९१५७ धावा केल्या आहेत. या यादीत चौथे नाव आहे दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसचे आहे
जॅक कॅलिसने कसोटी क्रिकेटमध्ये संघाच्या विजयात ६३७९ धावा केल्या आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन पाचव्या स्थानावर आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये संघाच्या विजयात ६१५४ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, परंतु त्याच्या जवळपास १६ हजार धावांपैकी केवळ ५९४६ धावा संघाच्या विजयात आल्या आहेत. या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. सातव्या स्थानावर स्टीव्ह स्मिथ ५६९० धावांसह तर आठव्या स्थानावर इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक ५६८९ धावांसह आहे.
९१५७ धावा – रिकी पॉन्टिंग
६५७१ धावा – जो रूट*
६४६० धावा – स्टीव्ह वॉ
६३७९ धावा – जॅक कॅलिस
६१५४ धावा – मॅथ्यू हेडन
५९४६ धावा – सचिन तेंडुलकर
५६९० धावा – स्टीव्ह स्मिथ*
५६८९ धावा – ॲलिस्टर कुक
2024-09-02T07:58:15Z dg43tfdfdgfd