NAJMUL SHANTO : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’

Najmul Shanto said test series against India is very important for us : बांगलादेशने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करून आत्मविश्वास उंचावला आहे. आता बांगलादेशला १९ सप्टेंबरपासून भारतात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल शांतोला आशा आहे की त्यांचा संघ पाकिस्तानप्रमाणे भारतातही दमदार कामगिरी करेल. बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धची पहिली कसोटी १० विकेट्सनी आणि दुसरी कसोटी ६ विकेट्सनी जिंकली. ज्यामुळे बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध पहिलीच कसोटी मालिका जिंकली.

‘हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा’ –

पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर नजमुलने सामन्यानंतरच्या सादरीकरणात सांगितले की, “हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, जो शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. खरंच खूप आनंद झाला. आम्ही येथे बऱ्याच काळापासून विजय मिळवण्याचा प्रयत्न करत होतो, जे आज साध्य झाले. मला खूप आनंद होत आहे की प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडली. आमच्या वेगवान गोलंदाजांची कामाची नैतिकता उत्कृष्ट होती आणि त्यामुळेच आम्हाला असा निकाल मिळाला.”

नजमुल शांतोला पुढे म्हणाला, “प्रत्येकजण स्वतःशी प्रामाणिक होता आणि प्रत्येकाला जिंकायचे होते. झाकीरही या कसोटी सामन्यात चांगली फलंदाजी करताना दिसला. त्यानी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. त्यामुळे हा ऐतिहासिक विजय मिळवता आला.” यानतर बांगलादेशच्या कर्णधाराने भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेचे महत्त्व सांगितले.

हेही वाचा – WTC Points Table : पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशची मोठी झेप, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेलाही टाकलं मागे

‘पुढील मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची’-

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेबाबत नजमुल शांतो म्हणाला, “पुढील मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि या विजयाने आम्हाला खूप आत्मविश्वास दिला आहे. मुशफिकर रहीम आणि शकीब अल हसन यांच्याकडे खूप अनुभव आहे, हे दोघेही भारताविरुद्धच्या मालिकेसाठीखूप महत्त्वाचे असतील. मेहंदी हसन मिराझने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आणि पाच विकेट्स घेतल्या, ते खूप प्रभावी होते.”

हेही वाचा – Paralympics 2024 : पॅरालिम्पिकमध्ये व्हीलचेअर टेनिस… गुगलनेही बनवलं खास डूडल, जाणून घ्या खेळाचा इतिहास

बांगलादेशचा कर्णधार पुढे म्हणाला, “मला आशा आहे की सर्व खेळाडू भारताविरुद्धही अशीच कामगिरी करतील. प्रत्येकाने चांगली कामगिरी केली, विशेषतः ज्यांना संधी मिळत नव्हती. प्लेइंग इलेव्हनचा भाग नसलेले चार खेळाडू, पण ज्या पद्धतीने ते मैदानावर संघाला साथ देत होते, ते खूपच प्रभावी होते. ही संस्कृती भविष्यातही कायम राहील अशी आशा आहे.”

2024-09-03T12:28:13Z dg43tfdfdgfd