PRIYANSH ARYA : विराट कोहलीच्या RCB संघाला IPL ट्रॉफी जिंकून देण्यासाठी ‘हा’ युवा सिक्सर किंग उत्सुक, जाणून घ्या कोण आहे?

Priyansh Arya want to help his Idol Virat Kohli win an IPL trophy for RCB : अलीकडेच दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स आणि उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स हे संघ आमनेसामने आले होते. ज्यामध्ये आयुष बदोनी आणि प्रियांश आर्य यांनी शतकी खेळी खेळली. या सामन्यात प्रियांश आर्यने आपल्या शतकी खेळीत एका षटकातील सलग ६ चेंडूत ६ षटकार मारून इतिहास घडवला होता. या खेळीनंतर आपले मनोगत व्यक्त केले. तो म्हणाला विराट कोहली माझा आवडता खेळाडू असून मला आरसीबीसाठी खेळायला आवडेल.

आरसीबीला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी उत्सुक –

स्पोर्ट्स यारीसोबतच्या संभाषणात प्रियांश आर्य म्हणाला की, “मला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळायला आवडेल, कारण विराट कोहली माझा आवडता क्रिकेटर आहे. आयपीएलच्या इतिहासात आजपर्यंत आरसीबीला ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. त्यामुळे जर आरसीबीसाठी खेळायची संधी मिळाली, तर मी आरसीबीला चॅम्पियन बनवण्यासाठी माझे १०० टक्के योगदान देईन.

चौथ्या षटकारानंतर जाणवले की सहा षटकार मारू शकतो –

सलग ६ चेंडूवर ६ षटकार मारण्यावर प्रतिक्रिया देताना प्रियांश आर्य म्हणाला की, “तीन षटकारानंतर नाही, तर चौथ्या षटकारानंतर मला जाणवले की मी सहा षटकार मारू शकतो. त्यानंतर आयुष बदोनी म्हणाला की, अशी संधी फार क्वचितच एखाद्याला मिळते, ज्यामध्ये तो पहिल्या चार चेंडूंवर चार षटकार मारण्यात यशस्वी होतो. त्यामुळे पुढेही षटकार मारत रहा आणि सलग सहा षटकार पूर्ण करण्याचा प्रयत्न करं.”

हेही वाचा – Natasa Stankovic : नताशा स्टॅनकोविक हार्दिकशी घटस्फोट झाल्यानंतर दीड महिन्यानंतर मुंबई परतली, शेअर केली इन्स्टा स्टोरी

प्रियांश आर्यने झळकावले दुसरे शतक –

प्रियांश आर्यने २३ व्या सामन्यात ५० चेंडूंचा सामना करत १२० धावांची धावांची वादळी खेळी साकारली. त्याचे हे या हंगामातील दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने डीपीएलच्या १५ व्या सामन्यात शतक झळकावले होते. या खेळीत प्रियांश आर्यने १० चौकार आणि १० षटकार मारले. प्रियांश आर्यने २४० च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.आयुष बदोनीसह त्याने दुसऱ्या विकेटसाठी २८६ धावांची भागीदारी केली, जी या लीगमधील आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे. प्रियांशची ही पहिलीच खेळी नाही, त्याने एकामागून एक अशा अनेक मोठ्या खेळी खेळल्या आहेत.

2024-09-02T14:27:51Z dg43tfdfdgfd