भारतानं चॅम्पियन ट्रॉफी २०२५ जिंकल्यामुळे क्रिकेट फॅन्स प्रचंड खुश आहेत. लोकं अक्षरश: रस्त्यावर उतरून नाचताहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत जिंकल्यावर त्यांनी मैदानात डान्स करून आपला आनंद व्यक्त केला. पण लक्षवेधी बाब म्हणजे श्रेयस अय्यर नंतर आता सुनिल गावसकर यांचा डान्स सुद्धा तारक मेहतामधून कॉपी निघाला. होय, गावसकर यांनी सुद्धा तारक मेहतामधील डान्सची नक्कल केली असं म्हटलं जात आहे. आता हे दोन्ही डान्स तुम्ही देखील पाहा अन् सांगा काय वाटतेय तुम्हाला?
(फोटो सौजन्य - crikcasamm/Instagram)आणखी एक डान्स आलाय समोर
हा व्हिडीओ crikcasamm या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही रोहित शर्माच्या हातात ट्रॉफी पाहून गावसकरांना नाचताना पाहू शकता. पण गंमत म्हणजे हा डान्स करताना त्यांनी ज्या स्टेप्स मारल्या आहेत त्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बापूजींच्या डान्सवरून कॉपी केल्याचं म्हटलं जातेय. या व्हिडीओच्या खाली बापूजींचा डान्स सुद्धा दाखवण्यात आलाय. अन् खरंच त्यांनी सुद्धा हुबेहुब गावसकरांसारखाच डान्स केलाय. योगायोग म्हणजे यापूर्वी श्रेयस अय्यरचा डान्स व्हायरल झाला होता. अन् तो डान्स सुद्धा यापूर्वी तारक मेहतामधील कृष्णन अय्यरनं केला होता. हे सगळं कमी आहे म्हणून की काय त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं सेलिब्रेशन हे सुद्धा तारक मेहतामध्ये आधीच दाखवण्यात आलेय. खरंच हे मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.(फोटो सौजन्य - crikcasamm/Instagram)
बापूजी आणि सुनिल गावसकर
रोहित शर्मा आणि विराट कोहली
यापूर्वी श्रेयस अय्यरचा डान्स झाला होता व्हायरल