विराटची जागा घेतली, पण प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू, एकाचा डेब्यू, किती वाजता सुरू होणार पहिली वनडे?
आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये टीम इंडिया सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया मैदानात उतरेल. रोहित शर्माचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं आहे, तर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या दुखापतीमुळे या सीरिजमध्ये खेळू शकणार नाहीत. विराट कोहलीला हॅमस्ट्रिंगची तर हार्दिक पांड्याला मांडीच्या स्नायूची दुखापत झाली आहे. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल हा रोहित शर्मासोबत ओपनिंगला येईल. रोहित शर्मा आयसीसी क्रमवारीमध्ये बॅटिंगच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीला दुखापत झाल्यामुळे यशस्वी जयस्वालला टीम इंडियात संधी मिळाली आहे, पण त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश व्हायची शक्यता कमी आहे. इशान किशन हा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येईल. इशान किशनने नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. इशान भारताकडून शेवटची वनडे 11 ऑक्टोबर 2023 ला अफगाणिस्तानविरुद्धच खेळला होता. टीमचा उपकर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या आणि विकेट कीपर बॅटर केएल राहुल पाचव्या क्रमांकावर खेळतील. हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत नितीश कुमार रेड्डी सहाव्या क्रमांकावर खेळेल. सातव्या क्रमांकावर ऑलराऊंडर स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. तर सुंदरसोबत कुलदीप यादवकडे स्पिन बॉलिंगची जबाबदारी असेल. बुमराह आणि सिराज वनडे सीरिजमध्ये खेळत नसल्यामुळे फास्ट बॉलिंगचं नेतृत्व अर्शदीप सिंग करेल, याशिवाय त्याला प्रसिद्ध कृष्णाची साथ मिळेल. प्रिन्स यादव किंवा गुरनूर ब्रार यांच्यापैकी एक जण या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातली पहिली वनडे मॅच दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे, तर मॅचचा टॉस दुपारी एक वाजता होईल. भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : शुभमन गिल, रोहित शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार/प्रिन्स यादव
2026-06-12T13:00:57Z
पहिली वनडे किती वाजता सुरू होणार? अंपायरनी दिली डेडलाईन, धर्मशालामधून मोठी अपडेट!
अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव टेस्ट मॅच जिंकल्यानंतर शनिवारपासून 3 वनडे मॅचची सीरिज सुरू होणार आहे, पण धर्मशालामध्ये पाऊस पडत असल्यामुळे सामना सुरू होऊ शकलेला नाही. दुपारी 1 वाजता मॅचचा टॉस होणार होता, तसंच 1.30 वाजता पहिला बॉल पडणार होता, पण पावसामुळे अजून टॉसही झालेला नाही, त्यामुळे आता ओव्हर कमी व्हायला सुरूवात झाली आहे. 20 ओव्हरची मॅच सुरू होण्यासाठी 6.32 हा कट ऑफ टाईम आहे. संध्याकाळी 6.32 पर्यंत एकही बॉल पडला नाही, तर सामना रद्द केल्याची घोषणा केली जाईल. या वनडे सीरिजपासून टीम इंडियाच्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात होणार आहे. पुढच्या वर्षी 4 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत दक्षिण आफ्रिकेत वनडे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. वनडे वर्ल्ड कपसाठी टीम तयार करण्याचा आतापासूनच भारतीय निवड समिती आणि कोच गौतम गंभीरचा प्रयत्न असेल. रोहित शर्मा-विराट कोहली वनडे वर्ल्ड कप खेळणार का नाही? याचा सस्पेन्स अजून कायम आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा खेळत आहे, तर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. विराटऐवजी यशस्वी जयस्वालची टीम इंडियात निवड झाली. भारतीय टीम : शुभमन गिल, रोहित शर्मा, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, इशान किशन, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव अफगाणिस्तानची टीम : हशमतुल्लाह शाहिदी, इक्रम अलिखिल, रहमनुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, अझमतुल्लाह ओमरझई, मोहम्मद नबी, राशिद खान, नानगेलिया खरोटी, अल्लाह गझनफर, बिलाल सामी, डारविश रसुली, फरीद अहमद मलिक, झिया उर रहमान शारिफी
2026-06-13T10:45:57Z
शफाली कृणाल पांड्या ट्रॅपमध्ये अडकली, वर्ल्ड कपच्या पहिल्याच बॉलला सिक्स, चौथ्या बॉलला पॅव्हेलियनमध्ये!
महिला वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर टीमची ओपनर शफाली वर्माने धमाकेदार सुरूवात केली. मॅचच्या पहिल्याच बॉलला शफाली वर्माने सदिया इक्बालच्या बॉलिंगवर खणखणीत सिक्स मारला, यानंतर पुढच्या तिन्ही बॉलवर शफालीने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण यात तिला एकही रन करता आली नाही. शफालीचा गेम प्लान ओळखून सदिया इक्बालने तिची लाईन ऍण्ड लेंथ बदलली. स्पिनर असलेल्या सदिया इक्बालने कृणाल पांड्यासारखाच शॉर्ट बॉल शफालीला टाकला, ज्यात ती फसली आणि विकेट कीपरने तिचा कॅच पकडला. 5 बॉलमध्ये 6 रन करून शफाली आऊट झाली, पण तिने खेळलेल्या या शॉटमुळे तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यात येत आहे. एवढा मोठा सामना असताना शफाली असे शॉट मारूच कसे शकते? असे प्रश्न चाहते विचारत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत, या सामन्यांपैकी 13 सामने टीम इंडियाने जिंकले तर फक्त 3 सामन्यांमध्ये पाकिस्तानचा विजय झाला. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात हरमनप्रीत कौरने अमरावतीच्या भारती फुलमाळीला संधी दिली आहे. भारती फुलमाळी मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करते त्याशिवाय मीडियम फास्ट बॉलिंगही टाकते. भारताची प्लेइंग इलेव्हन : स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, भारती फुलमाळी, रिचा घोष, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, श्री चरिणी, क्रांती गौड
2026-06-14T14:45:49Z
कोहलीच्या साथीदाराने क्रिकेट सोडलं, टेस्टमध्ये आता काहीच उरलं नाही, स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
टीम इंडियाने नुकताच मु्ल्लानपूरच्या स्टेडिअमवर अफगाणिस्तानचा एक डाव राखून आणि 300 धावांनी पराभव केला होता. टीम इंडियाने जरी हा ऐतिहासिक विजय मिळवला असला तरी त्याची फारशी चर्चा झाली नाही.यामागचं कारण म्हणजे विराट कोहली. कोहली आणि रोहित सारख्या खेळाडूंनी टेस्ट क्रिकेट सोडल्यापासून या फॉरमॅटमध्ये मजाची उरली नाही आहे,अशी नेहमीच चर्चा होते. त्यात आता कोहलीच्या एका खास मित्राने टेस्ट क्रिकेट सोडलं आहे.त्यामुळे आता टेस्ट क्रिकेटमधली उरली सूरलेली मजाही संपुष्ठात आल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सूरू आहे. दरम्यान हा नेमका खेळाडू कोण आहे, ज्याने टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकलं आहे? आणि कोहलीसोबत त्याचं नेमकं नातं कसं होतं? हे जाणून घेऊयात. वर्ल्ड क्रिकेटमधला सगळ्यात सन्मानित आणि यशस्वी फलंदाज असलेल्या केन विल्यम्सनने टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंटची घोषणा केली आहे. 16 वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिल्यानंतर केन विल्यम्सनने आज अखेर टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे.त्याच्या या निर्णयाने क्रिकेट फॅन्सला मोठा धक्का बसला आहे. तसेच या निवृत्तीसह क्रिकेटच्या सुर्वण अध्यायचा शेवट झाला. 35 वर्षीय केन विल्यमसनने न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीचा शेवट केला. त्याने 378 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 48 शतकांसह 19,346 धावा केल्या. 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या केन विल्यमसनने आपल्या तंत्र, संयम आणि दर्जाने जगाला लवकरच मोहित केले. त्याची फलंदाजी कमी आक्रमक, पण अधिक प्रभावी आणि सातत्यपूर्ण होती. ज्या काळात न्यूझीलंड संघ जगातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानला जात होता, त्या काळात विल्यमसन न्यूझीलंड क्रिकेटचा चेहरा बनला. त्याने केवळ धावाच केल्या नाहीत, तर संघात जिंकण्याची सवयही रुजवली. कर्णधार म्हणून केन विल्यमसनचे योगदानही ऐतिहासिक होते. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तथापि, त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च यश 2021 मध्ये आले, जेव्हा न्यूझीलंडने भारताला हरवून आपले पहिले आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप विजेतेपद पटकावले. हा विजय केवळ न्यूझीलंड क्रिकेटचीच नव्हे, तर विल्यमसनच्या कर्णधारपदाचीही ओळख बनला. केन विल्यमसनचा जगभरात केवळ त्याच्या विक्रमांसाठीच नव्हे, तर त्याच्या वागणुकीसाठी आणि खिलाडूवृत्तीसाठीही आदर केला जातो. तो मैदानावर क्वचितच रागावलेला दिसायचा. जय असो वा पराजय, त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच शांतता आणि नम्रता दिसून यायची. यामुळेच त्याचे प्रतिस्पर्धीसुद्धा त्याच्या संघसहकाऱ्यांइतकाच त्याचा आदर करत असत. विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यात खास नातं होतं. दोघे अंडर 19 पासून एकत्र मैदानात उतरले आहेत.त्यामुळे दोघांच मैदानावर खास नातं होतं.
2026-06-12T11:30:57Z
Rahul Dravid son : ठासून नाय घासून आलाय! वैभव सूर्यवंशीला डच्चू पण राहुल द्रविडच्या मुलाची एन्ट्री; कोण आहे ज्युनियर द्रविड?
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि द वॉल राहुल द्रविड याने आपलं दगडी बांधकाम पुन्हा सुरू केलं असून दोन्ही पोरं चमकदार कामगिरी करत आहे. अशातच द्रविड कुटूंबात आनंदाची बातमी समोर आलीये. राहुलचा थोरला मुलगा समित याच्यानंतर आता धाटका मुलगा अन्वय याने देखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. वडिलांप्रमाणेच धाकट्या मुलाने देखील विकेटकीपर बॅटरची जबाबदारी खांद्यावर घेतलीये. बीसीसीआयने ज्युनियर क्रिकेट समितीने आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी अंडर 19 संघाची घोषणा केली आहे. अन्वय द्रविड याची येत्या 4 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली आहे. राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित द्रविड हा वेगवान गोलंदाजी करणारा ऑलराऊंडर खेळाडू आहे, तर धाकटा मुलगा अन्वय द्रविड हा विकेटकीपर बॅटर आहे. अन्वयच्या सिलेक्शननंतर या दोघांचीही भारताच्या अंडर 19 संघांमध्ये निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये दुखापतीमुळे समितची 2024 मध्ये संधी हुकली होती, आणि आता श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताच्या अंडर 19 संघात अन्वय द्रविडची निवड झाली आहे. वडिलांप्रमाणे तो देखील विकेटकीपर बॅटर म्हणून खेळेल. 17 वर्षीय अन्वय द्रविडने मागील विनू मांकड ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या अंडर 19 टीमचे नेतृत्व करत संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचवले होते. या स्पर्धेत त्याने सहा सामन्यांमध्ये एकूण 220 धावा केल्या असून, त्याची सर्वोच्च धावसंख्या 82 नाबाद आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी अंडर 19 टीम - यशवर्धन सिंग चौहान (कॅप्टन), सागर विर्क, लक्ष्य रायचंदानी (व्हाईस कॅप्टन), विनीत व्हीके, अर्जुन राजपूत, कुशाग्र ओझा, रजत बघेल (विकेटकीपर), अन्वय द्रविड (विकेटकीपर), अनमोलजीत सिंग, वुटकुरी यशवीर पटेल, अनोळ वीरेश गौड, यशवीर गौड, व्ही. मोहित उलवा, इशान सूद.
2026-06-12T06:45:58Z
एकट्या वैभवमुळे क्रिकेटचा अख्खा गेमच बदलला, पालकांच्या नुसत्या रांगा लागल्यात, नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचा वैभव सूर्यवंशी सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून अफगाणिस्तान आणि श्रीलंकेसोबत ट्रायसीरीज खेळतो आहे. या सीरीजसोबत वैभव सूर्यवंशीची आयर्लंड, इंग्लंड विरूद्ध टी20 मालिकेसोबत एशियन्स गेम्ससाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे आता वैभव सूर्यवंशी टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून लवकरच डेब्यू करताना दिसणार आहे. या डेब्यूची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान वैभव सूर्यवंशीच्या या निवडीनंतर बिहारमध्ये मोठा बदल झाला आहे. पालकांच्या मोठ मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात. 10 वर्ष तुम्ही जास्त बोलताय, आजच्या तारखेला 5 ते 6 वर्ष वयाच्या मुलांना त्याचे कुटुंबिय अकॅडमीत घेऊन येतायत.या मागच कारण सांगायचं झालं तर वैभव सूर्यवंशी या लहान मुलांच्या पालकांसाठी प्रेरणा बनला आहे. आणि लहान मुलांचा देखील तो रोल मॉडेल बनला आहे, असे वैभव सूर्यवंशीचे लहानपणीचे कोच मनीष ओझा यांनी सांगितले आहे. आज एक पालक जेव्हा वैभव सूर्यवंशीला बघतात तेव्हा त्यांच्यात एक वेगळी प्रेरणा निर्माण होते.आणि त्यांना देखील आपल्या मुलाच क्रिकेटमध्ये करिअर घडाव असं वाटतं, अशे देखील मनीष ओझा म्हणाले. आधी पालक मुलांना स्पोर्टस हे करिअर म्हणून निवडू द्यायचे नाही पण आता वैभव सूर्यवंशीमुळे पालकांचे विचार बदलले आहेत. त्यामुळे ही पॉझिटीव्ह गोष्ट आहे,यामुळे नवीन नवीन वैभव तयार होतील. वैभवला 8-9 वर्ष लागली टीम इंडियात संधी मिळाली. विराट कोहलीला देखील असाच ब्रेक मिळाला. त्यामुळे पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी ही प्रोसेस खुप मोठी आहे.तुम्हाला तुमच्या मुलावर विश्वास ठेवावा लागेल, त्याला हवं ते द्याव लागेल, तरच तो क्रिकेटमध्ये नाव कमावू शकतो,असे वैभवच्या कोचने पालकांना आवाहन करताना सांगितलं आहे.
2026-06-14T11:30:42Z
मॅचमध्ये इंजर्ड झाला, हॉस्पिटलला ॲडमीट होताच नर्सवर जीव जडला, 'कॅप्टन कूल'ची लव्हस्टोरी
क्रिकेट वर्तुळात असे अनेक खेळाडू आहेत, ज्याची लव्हस्टोरी खूपच भयानक आहे. काही खेळाडू आयपीएलमधील चिअरलीडर्स सोबत प्रेमात पडले, तर काही खेळाडूंनी आपल्या बालपणीच्या मैत्रीणींसोबत लग्नगाठ बांधली आहे. पण यात एका खेळाडूची लव्हस्टोरी खूपच वेगळी आहे. हा खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर इंजर्ड झाला. त्यानंतर हॉस्पिटलला अॅडमीट झाला. यावेळी त्याचा जीव एका नर्सवर जडला होता. दरम्यान हा खेळाडू नेमका कोण होता? आणि त्याची लव्हस्टोरी नेमकी काय आहे? हे जाणून घेऊयात. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यम्सन आहे. केन विल्यम्सनची लव्हस्टोरी खूपच खास आहे. 2015 ला केन विल्यम्सन दुखापतग्रस्त झाला होता.त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या हॉस्पिटलमध्ये सारा रहिम नावाची नर्स काम करायची. इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे जन्मलेली सारा नंतर न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाली. ती एक साधी व्यक्ती आहे, अगदी आपला धर्मही ती खाजगी ठेवते. केन हॉस्पिटलच्या बेडवर उपचार घेत असताना सारा त्याची काळजी घेत होती. साराच्या साधेपणाने आणि काळजीवाहू स्वभावाने केन इतका प्रभावित झाला की, तो तिला पहिल्याच भेटीत पसंत करू लागला. इथेच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.मग त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. हॉस्पिटलमधील ती छोटी भेट एका अतूट नात्याचा पाया ठरली. रुग्णालयातून घरी परतल्यानंतरही त्यांचे बोलणे थांबले नाही, उलट ते अधिकच वाढले. फोनवरील संभाषणांचे हळूहळू प्रत्यक्ष भेटींमध्ये रूपांतर झाले आणि लवकरच ते एकमेकांना डेट करू लागले.त्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये केन विल्यमसन आणि सारा एका गोंडस मुलीचे पालक झाले.जिचे नाव त्यांनी मॅगी ठेवले होते. त्यानंतर मे 2022 मध्ये, केन आणि साराच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे आगमन झाले. यावेळी, साराने एका मुलाला जन्म दिला. विल्यमसन कुटुंब आणखी मोठे आणि परिपूर्ण वाटू लागले. 2024 मध्ये, आणखी एका लहान देवदूताच्या जन्माने केन आणि सारा तिसऱ्यांदा पालक बनले. तीन मुलांच्या आगमनाने, केन आणि साराची प्रेमकथा एका परिपूर्ण आणि सुंदर कुटुंबात बहरली होती.
2026-06-12T16:46:00Z
'त्या व्यक्तीपासून दूर राहा', मॅच फिक्सिंगचा आरोप असलेल्या क्रिकेटर्सची वैभवला वॉर्निंग, कुटुंबियांनाही केलं सावध
अंडर 19 वर्ल्डकप आणि आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाच्या अ संघात स्थान मिळालं आहे. त्यामुळे तो श्रीलंका दौऱ्यावर असून ट्राय सीरीज खेळतोय आहे. तसेच त्याला इंग्लंड, आयर्लंड आणि एशियन्स गेम्ससाठी टीम इंडियात निवड झाली आहे. दरम्यान या निवडीनंतर वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड झाली असताना अनेक दिग्गज खेळाडू त्याला सल्ला देत आहे. यामध्ये एका मॅच फिक्सिंगचा आरोप झालेल्या खेळाडूने देखील वैभवला खास टीप्स दिल्या आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रीसंत जो आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकला होता.त्याने वैभव सूर्यवंशीला सल्ला दिला आहे. वैभव बद्दल जितकं बोलू तितक कमी आहे.त्याचं जितकं कौतुक करू तितकं कमी आहे. क्रिकेट खेळणे आणि क्रिकेटचा स्वप्न पाहणाऱ्या लहान मुलांना त्याने एक नवीन रस्ता दाखवला आहे,असे श्रीसंत सुरूवातीला म्हणाला आहे. पहिल्यांदा आपल्याकडे सचिन पाजी, नंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा. पण वैभव सूर्यवंशीने कमी वयात जो खेळ दाखवला आहे,ते समर्पण आणि चिकाटीचे एक उत्तम उदाहरण आहे, असे श्रीसंतने सांगितले. मला त्याचे वडील, त्याचे सर्व प्रशिक्षक आणि त्याच्या सपोर्ट सिस्टीममध्ये सामील असलेल्या प्रत्येकाबद्दल प्रचंड आदर आहे. कारण लोक क्रिकेटमधील संधीबद्दल नेहमीच बोलतात.पण कल्पना करा,दररोज चार तास प्रवास करणे, संधी मिळेल की नाही हे माहीत नसताना सराव करणे, घरी परतणे आणि मग पुन्हा हेच सर्व करणे .दिवसाला 750 ते 1000 बॉल खेळणे, सराव करणे , अथक परिश्रम करणे, आणि मग त्याच्या तोंडून हे ऐकणे की त्याला त्याच्या विश्रातींच्या दिवसाचाही आनंद मिळत नाही. मी त्याच्याकडून शिकेन.सर्व महान क्रिकेटपटूंबद्दलल आदर बाळगुनही, या मुलाने दाखवलेली कामगिरी अपवादात्मक आहे,असे श्रीसंत म्हणाला. तसेच वैभव माझी तुला एकच विनंती आहे.या मॅनेजर्सला बाजुला ठेव आणि फक्त तुझ्या खेळावर लक्ष्य केंद्रित कर.तुझे वडील आणि कुटुंब बाकी गोष्टीची काळजी घेतील त्यामुळे या व्यावसायिक मॅनेजरपासून दूर राहा, असा सल्ला श्रीसंतने वैभवला दिला आहे.
2026-06-12T13:30:36Z
शाब्बास मित्रा! 'तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मी मनात...', अनुष्कानंतर कोहली कुणासाठी झाला इतका भावुक
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेला उद्या 13 जून 2026 पासून सूरूवात होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा खेळताना दिसणार आहे.तर विराट कोहली मात्र या मालिकेतून बाहेर झाला आहे. दरम्यान ही मालिका सूरू व्हायला आता 24 तासांचा कालावधी उरला असताना विराट कोहली भावूक झाला आहे. कारण विराट कोहलीचा खास मित्र न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू केन विल्सम्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 16 वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिल्यानंतर केन विल्यम्सनने आज अखेर टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे.त्याच्या या निर्णयाने क्रिकेट फॅन्सला मोठा धक्का बसला आहे. तसेच या निवृत्तीसह क्रिकेटच्या सुर्वण अध्यायचा शेवट झाला. 35 वर्षीय केन विल्यमसनने न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीचा शेवट केला. त्याने 378 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 48 शतकांसह 19,346 धावा केल्या. केन विल्यमसनचा जगभरात केवळ त्याच्या विक्रमांसाठीच नव्हे, तर त्याच्या वागणुकीसाठी आणि खिलाडूवृत्तीसाठीही आदर केला जातो. तो मैदानावर क्वचितच रागावलेला दिसायचा. जय असो वा पराजय, त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच शांतता आणि नम्रता दिसून यायची. यामुळेच त्याचे प्रतिस्पर्धीसुद्धा त्याच्या संघसहकाऱ्यांइतकाच त्याचा आदर करत असत. दरम्यान याच आपल्या मित्रासाठी कोहली भावूक झाला होता. एक्सवर पोस्ट करताना तो लिहतो,प्रतिस्पर्ध्यापासून मित्रापर्यंतचा आपला प्रवास आहे. इतकी वर्षे तुला फलंदाजी करताना आणि तुझ्याशी स्पर्धा करताना पाहणे हा एक आनंददायी अनुभव होता,असे विराट कोहली म्हणतो. पण त्याहीपेक्षा जास्त, मला आपल्या मैत्रीची आणि खेळाबाबत (तसेच त्यापलीकडील गोष्टींबाबतही) असलेल्या आपल्या समान दृष्टिकोनाची अधिक किंमत वाटते. आपली जेव्हा जेव्हा भेट होते किंवा संवाद साधला जातो, तो प्रत्येक क्षण मी मनापासून जपून ठेवतो,असे देखील विराट म्हणाला. भावा, तुला नेहमीच सर्वोत्तम गोष्टी लाभोत, हीच सदिच्छा. तू तुझे योगदान दिले आहेस; आता निवांत होऊन या सर्व गोष्टींचा आनंद घेण्याची वेळ तुझी आहे. खूप छान कामगिरी केलीस मित्रा, आयुष्याची खरी सुरुवात तर आता कुठे झाली आहे, असे शेवटी विराट कोहली म्हणतो. दरम्यान विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यात खास नातं होतं. दोघे अंडर 19 पासून एकत्र मैदानात उतरले आहेत.त्यामुळे दोघांच मैदानावर खास नातं होतं.
2026-06-12T14:30:40Z