इंग्लंडच्या कॅप्टनच अर्धशतक फुकट गेलं, वैभव सूर्यवंशीने 31 बॉलमध्ये उडवली झोप

IND vs ENG U-19 : भारताने 19 वर्षांखालील युवा एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. बुधवारी पावसामुळे प्रभावित झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताच्या 19 वर्षांखालील संघाने इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाचा चार विकेट्सने पराभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावत २६८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती खेळीमुळे भारताने 34.4 षटकांत 6 विकेट्स गमावत 274 धावा करून सामना जिंकला. पावसामुळे हा सामना 40-40 षटकांचा खेळवण्यात आला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली आणि चांगली सुरुवात केली. संघाची पहिली विकेट 78 धावांवर इसहाक मोहम्मदच्या रूपात पडली. तो 41 धावा करून बाद झाला. बीजे डॉकिन्सने 62 धावांची खेळी केली. त्यानंतर भारताने दोन विकेट लवकर गमावल्या.

थॉमस रियू 76 धावा केल्या

बेन मेयर 31 धावा काढून बाद झाला आणि रॉकी फ्लिंटॉफ फक्त 16 धावा काढून बाद झाला. कर्णधार थॉमस रियू पुन्हा एकदा संघासाठी उपयुक्त खेळी केली. थॉमसने 44 चेंडूत 76 धावा केल्या, ज्यात 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. या खेळीमुळे इंग्लंड 250 धावांचा टप्पा ओलांडू शकला. भारताकडून कनिष्क चौहानने सर्वाधिक तीन बळी घेतले.

वैभव सूर्यवंशी यांनी इतिहास घडवला

269 धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला वैभव सूर्यवंशीने जलद सुरुवात दिली. तथापि, अभिज्ञान कुंडू 38 धावांवर 12 धावा करून बाद झाला. तरीही, वैभवची बॅट थांबली नाही. वैभवने 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 19 वर्षांखालील भारतीय संघातील हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक होते. यापूर्वी पंतने नेपाळविरुद्ध 19 चेंडूत ही कामगिरी केली होती.

थॉमसवर सूड घेतला

वैभव सूर्यवंशीने 31 चेंडूंचा सामना करत 86 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीमुळे सूर्यवंशीने थॉमसकडून सूडही घेतला. खरंतर, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यवंशीने दमदार खेळी करत भारताला लढाऊ धावसंख्या गाठून दिली, पण थॉमसने शतक ठोकून भारताकडून सामना हिसकावून घेतला.

कनिष्कची अष्टपैलू कामगिरी

वैभव व्यतिरिक्त, विहान मल्होत्राने 46 धावांची खेळी केली. शेवटी, कनिष्क चौहान (नाबाद 43) आणि अम्ब्रीश (नाबाद 31) यांनी 34.3 षटकांत सामना संपवला. अम्ब्रीशने षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. भारताने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

2025-07-03T06:48:10Z