इंग्लंडविरूद्ध वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन समोर

Ind vs Eng : इंग्लंडचा संघ या महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड भारतासोबत पाच सामन्यांची टी20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन समोर आली आहे.या प्लेइंग इलेव्हनमध्ये नेमक्या कोणत्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आणि कोणत्या खेळाडूला डच्चू मिळाला आहे. हे जाणून घेऊयात.

टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करण्याची ही भारताची शेवटची संधी असेल. या मालिकेतून टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी किती तयार आहे हे दिसून येईल. या कारणास्तव, खूप विचार करून या मालिकेत खेळाडूंना संधी दिली जाणार आहे.

दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ कसा असू शकतो.हे जाणून घेऊयात. शुभमन गिल कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो. या दोन्ही खेळाडूंनी एकदिवसीय विश्वचषकातही सलामी दिली. यशस्वी जयस्वाल संघाचा बॅकअप ओपनर असेल.

तसेच भारताकडे मधल्या फळीत अनेक पर्याय आहेत. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. यानंतर केएल राहुल आणि ऋषभ पंत सारख्या खेळाडूंना संधी मिळू शकते. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन सारख्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता नाही. सूर्यकुमार यादवची एकदिवसीय सामन्यांमध्ये कामगिरी तितकीशी चांगली राहिलेली नाही आणि त्यामुळे त्याला यावेळी वगळले जाऊ शकते.

जर आपण अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोललो तर हार्दिक पांड्या खेळणार हे निश्चित आहे. त्याच्याशिवाय अक्षर पटेल किंवा रवींद्र जडेजा हे दोघेही खेळू शकतात. यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरलाही खेळवण्याची चर्चा होती पण आता त्याच्याऐवजी जडेजाला संधी मिळेल असे दिसते.

गोलंदाजीचा विचार केला तर कुलदीप यादव हा संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज असेल. तो एकदिवसीय संघात परतेल. वेगवान गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना संधी मिळू शकते. या मालिकेतून जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येईल.

टीम इंडियाची सभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी

2025-01-09T03:21:53Z