एक मॅच आणि 7 खेळाडूंच्या करियरला मोठा ब्रेक; IPL मध्ये असं काय घडलं?

इंडियन प्रीमिअर टी-20 क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल ही जगातील दुसरी सर्वात मोठी स्पोर्ट्स लीग आहे. बीसीसीआय या लीगचं आयोजन करीत असते. 2008 पासून सुरू झालेल्या या लीगमध्ये आजही असे खेळाडू आहेत जे आयपीएलच्या पहिल्या सीझनपासून खेळत आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, काही खेळाडू असे आहेत ज्यांना त्यांच्या क्रिकेट करिअरमध्ये आयपीएलची एकच मॅच खेळता आहे.

आयपीएल स्पर्धा 2008 पासून सुरू झाली, व या लीगचं पहिले विजेतेपद राजस्थान रॉयल्सनं जिंकलं होतं. त्यानंतर आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळाडू आले आणि गेले. आता आयपीएलचे मेगा लिलाव लवकरच होणार असून त्यानंतर आगामी सीझनमध्ये पुन्हा अनेक खेळाडू आयपीएलमध्ये दिसतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंची माहिती देणार आहोत, जे त्यांच्या क्रिकेट करिअरमध्ये आयपीएल स्पर्धेत केवळ एकच मॅच खेळू शकले. चला तर, हे खेळाडू नेमके कोण आहेत, ते जाणून घेऊ.

ब्रॅड हॅडिन

ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर बॅट्समन ब्रॅड हॅडिन याला त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये केवळ एकच आयपीएल मॅच खेळता आली. तो 2011 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून ही मॅच खेळला होता.

डॅरेन ब्राव्हो

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू डॅरेन ब्राव्हो याला आयपीएलमध्ये केवळ एकच मॅच खेळण्याची संधी मिळाली. तो 2017 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून ही मॅच खेळला होता.

अकिला धनंजय

श्रीलंकेचा स्पिनर अकिला धनंजय यालाही त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये केवळ एकच आयपीएलची मॅच खेळण्याची संधी मिळाली. 2012 मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून पहिली व शेवटची आयपीएल मॅच खेळला.

आंद्रे नेल

दक्षिण आफ्रिकेचा पेस बॉलर आंद्रे नेललाही आयपीएलमध्ये केवळ एकच मॅच खेळण्याची संधी मिळाली. 2008 मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून एकमेव मॅच खेळला.

मशरफी मुर्तझा

बांगलादेशचा माजी पेस बॉलर मशरफी मुर्तझा यालाही आयपीएलमध्ये केवळ एकच मॅच खेळता आली. 2009 साली मुंबई इंडियन्सकडून त्याला ही संधी मिळाली होती.

युनूस खान

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू युनूस खान देखील आयपीएलमध्ये खेळला आहे. 2008 मध्ये काही पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी देण्यात आली होती. त्यावेळी युनूस खान राजस्थान रॉयल्स टीमकडून एक मॅच खेळला होता. ही मॅच त्याच्या आयपीएल करिअरमधील शेवटची ठरली.

अब्दुर रझाक

बांगलादेशचा माजी बॉलर अब्दुर रझाक यालाही आयपीएलमध्ये केवळ एकच मॅच खेळण्याची संधी मिळाली. त्याला ही संधी राजस्थान रॉयल्सकडून मिळाली होती.

आयपीएल ही स्पर्धा खेळाडूंना आर्थिक सक्षम करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरली आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक खेळाडू उत्सुक असतात.

2024-09-04T07:13:09Z dg43tfdfdgfd