रोहित शर्माचा वारसदार ठरला; हिटमॅननंतर हा खेळाडू होणार वनडेचा कॅप्टन!
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मलिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. यामध्ये बीसीसीआयने मोठे बदल न करता संघ जाहीर केलाय. पण काही महत्त्वाचे निर्णय बीसीसीआयने घेतले आहे. टीम इंडियामध्ये श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीची एन्ट्री झाली आहे. तर मोहम्मद सिराज याला डच्चू देण्यात आला आहे. तसेच करुण नायरला देखील संघात स्थान दिलं गेलं नाही. एकीकडे रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कायम असतानाच आता शुभमन गिल याच्याकडं उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन्सी दिल्याने आता रोहित शर्मानंतर शुभमन गिल टीम इंडियाची जबाबदारी सांभाळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. बीसीसीआयने याचे स्पष्ट संकेत दिलेत. शुभमनला व्हाईस कॅप्टन्सी दिल्यानंतर बीसीसीआय त्याचा भविष्यातील कर्णधार म्हणून गांभीर्याने विचार करत असल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे. तर हार्दिक पांड्याचा पत्ता कट झालाय. दरम्यान, मागील वर्षी म्हणजेच जुलै 2024 मध्ये शुभमन गिल उपकर्णधार असेल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता शुभमन गिलवर थेट जबाबदारी सोपवल्याचं पहायला मिळतंय. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.
2025-01-18T12:01:39Z
टीम इंडियाचे चार खेळाडू करणार पाकिस्तानचा खेळ खल्लास, मोठी भविष्यवाणी!
आगामी चॅम्पिन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने 15 खेळाडूंची नावं जाहीर केली. अशातच आता हरभजन सिंगने मोठं वक्तव्य केलं आहे. शुभमन गिलला उपकर्णधार बनवलं नसतं तर यशस्वी जयस्वाल खेळला असता. यशस्वी, रोहित, तिसऱ्या क्रमांकावर कोहली, चौथ्या क्रमांकावर अय्यर असा परफेक्ट संघ तयार झाला असता, असं मत हरभजनने व्यक्त केलंय. श्रेयस अय्यरची प्लेइंग इलेव्हनमध्ये हकालपट्टी करून जयस्वालला जागा मिळेल का? असा प्रश्न देखील हरभजनने व्यक्त केला. तसेच चार खेळाडूंना हरभजनने गेमचेंजर म्हटलं आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह गे चारही खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी मॅचविनर ठरतील, असं हरभजन सिंगने म्हटलं आहे.. प्रत्येक खेळाडू कठीण काळातून जातो, परंतु या मोठ्या खेळाडूंना कसं कमबॅक करायचं हे माहित आहे, त्यामुळे ते नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवतील, असं हरभजन सिंग म्हणाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता रोहित आणि विराट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, पाकिस्तानविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी उतरतील आणि भारताला जेतेपद मिळवून देतील, असा विश्वास हरभजन सिंगने व्यक्त केला आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह टीम इंडियाच्या गोलंदाजीचे दोन स्तंभ आहेत. त्यांची फिटनेस आणि कामगिरी महत्त्वाची ठरेल, असंही हरभजन सिंग म्हणाला आहे.
2025-01-21T05:02:58Z