क्रिकेट विश्वात शोककळा, भारतीय क्रिकेटरचा अपघातात मृत्यू

Ex cricketer dies in accident: 10 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमकडून खेळणारे त्रिपुराचे माजी क्रिकेटर राजेश बानिक यांचे अपघाती निधन झाले आहे. पश्चिम त्रिपुरातील आनंदनगर येथे रस्ते अपघातात त्यांचे निधन झाले. ते 40 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांचे वडील, आई आणि भाऊ आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय क्रिकेट विश्वावरवर शोककळा पसरली आहे.

क्रिकेटर राजेश बानिक मोटारसायकलवरून त्यांच्या गावी जात असताना ही हृदयद्रावक घटना घडली. प्रवासादरम्यान त्यांची मोटारसायकल एका ट्रकला धडकली. धडक इतकी जोरदार होती की तरुण क्रिकेटरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना क्रिकेट समुदायासाठी एक मोठा धक्का आहे, ज्याने एका आशादायक आणि प्रतिभावान क्रिकेटरला गमावले आहे.

राजश बानिक यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवली होती. त्यांनी भारताच्या 19 वर्षांखालील टीमचे प्रतिनिधित्व केले आणि नंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळले. ते एक प्रतिभावान ऑलराऊंडर म्हणून ओळखला जात होते, त्यांनी त्यांच्या टीमला अनेक महत्त्वाच्या मॅचेस जिंकण्यास मदत केली. त्यांच्या कामगिरी आणि लढाऊ वृत्तीमुळे ते टीममध्ये आणि चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते.

हे पण वाचा : IND vs AUS, 3rd T20I: वॉशिंग्टन सुंदरची स्फोटक खेळी; कांगारूंना लोळवलं, टीम इंडियाचा दणदणीत विजय

या दुःखद बातमीनंतर, अनेक वर्तमान आणि माजी क्रिकेटपटर्सने तसेच त्यांच्या चाहत्यांनी क्रिकेटरच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. शेकडो लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि श्रद्धांजली वाहिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देखील शोक व्यक्त करणारे अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे.

बीसीसीआयने म्हटले आहे की, "भारताच्या 19 वर्षांखालील माजी वर्ल्ड कप प्लेअर आणि रणजी ट्रॉफी क्रिकेटरच्या निधनाने आम्हाला दुःख झाले आहे. ते एक प्रतिभावान क्रिकेटर होते आणि त्यांनी देशासाठी खूप काही केले. आम्ही त्याच्या कुटुंब आणि मित्रांप्रती आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो."

त्रिपुरा टीमसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 1400 हून अधिक रन्स

राजेश बनिक यांनी 2002-03 सीजनमध्ये त्रिपुरासाठी रणजी ट्रॉफीमध्ये एन्ट्री केली. त्यांच्या काळात राज्याच्या अव्वल क्रिकेटपर्सपैकी एक होते. त्यांनी 42 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये एकूण 1469 रन्स केले. 24 लिस्ट-ए मॅचेसमध्ये 378 रन्स केले, ज्यामध्ये एका सेंच्युरीचा समावेश आहे. या काळात त्यांचा सर्वोत्तम स्कोअर 101 होता. त्यांनी आपच्या कारकिर्दीत एकूण 18 टी-20 मॅचेस खेळल्या ज्यामध्ये 203 रन्स केले.

2025-11-02T14:32:41Z