गिलने इंग्लंडला रडवलं, जयस्वाल-जाडेजाने इंगा दाखवला, पहिल्या डावात धावांचा डोंगर

India vs England : बर्मिंगहॅम एजबस्टन टेस्टमध्ये टीम इंडियाने खतरनाक खेळी केली आहे. कर्णधार शुभमन गिलच्या सर्वाधिक 269 धावा आणि यशस्वी जयस्वाल आणि रविंद्र जडेजाच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने पहिल्या डावात 580 धावा ठोकल्या आहेत. इंग्लंडकडून क्रिस वोक्स, जोश टंग आणि शोएब बशीरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत.

टीम इंडियाने आज दुसऱ्या दिवशी 5 विकेट गमावून 310 धावापासून पुढे खेळायला सूरूवात केली होती. यावेळी शुभमन गिलने पहिल्या दिवशीच सेंच्युरी ठोकली होती.त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याने थेट एकामागोमाग विक्रमाला गवसणी घालायला सुरूवात केली होती.त्याने पहिल्यांदा दीडशे धावा केल्या.त्यानंतर पु्न्हा 200 चा पल्ला गाठत डबल सेंच्यूरी ठोकली होती. पण यानंतर त्याला बॅट काय शांत बसली नाही त्याने 250 धावाही ठोकून टाकल्या. त्यानंतर 300 धावा ठोकतोय की काय? याची भिती असताना तो 269 धावांवर बाद झाला. त्याने 387 बॉलमध्ये 269 धावा ठोकल्या होत्या.या खेळीत त्याने 3 षटकार आणि 30 चौकार लगावले आहेत.

दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन :

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (क), ऋषभ पंत (डब्ल्यू), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज,प्रसिद्ध कृष्णा

दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :

इंग्लंड (खेळणारा इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

दुसरी कसोटी: 2-6 जुलै 2025 एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

तिसरी कसोटी: 10-14 जुलै 2025 लॉर्ड्स, लंडन

चौथी कसोटी: 23-27 जुलै 2025 ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवी कसोटी: 31 जुलै 4 ऑगस्ट 2025 द ओव्हल, लंडन

2025-07-03T16:03:15Z