Dimuth Karunaratne announced retirement : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु व्हायला आता अवघे दोन आठवडे उरले आहेत. याआधी क्रिकेट वर्तुतळातून मोठी बातमी समोर आली आहे. एका स्टार क्रिकेटने निवृत्ती जाहीर केली आहे. या निवृत्तीनंतर तो त्याचा शेवटचा सामना खेळणार आहे. हा त्याचा 100 वा सामना आहे. खेळाडूच्या या निर्णयाने संघाला मोठा धक्का बसला आहे.दरम्यान हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
श्रीलंकेचा स्टार क्रिकेटर दिमुथ करुणारत्नेने निवृत्तीची घोषणा केली आहे. तो गॅले स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर (श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना) निवृत्त होणार आहे. करुणारत्नेने सलामीवीर फलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा आगामी सामना त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असेल. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 8 हजारांहून अधिक धावा केल्या.
श्रीलंकेच्या 'डेली एफटी'च्या वृत्तानुसार, दिमुथ करुणारत्नेने त्याच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले आहे. निवृत्तीनंतर तो पुढच्या महिन्यात श्रीलंका सोडून आपल्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याचेही त्याने उघड केले. करुणारत्ने मेजर क्लब थ्री-डे स्पर्धेत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. 14-16 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत तो सिंहली विरुद्ध नॉनडेस्क्रिप्ट्स सामन्यात खेळेल.
दिमुथ करुणारत्ने त्याच्या निवृत्तीबद्दल म्हणाले, "जर एखादा खेळाडू वर्षातून फक्त चार कसोटी सामने खेळला तर त्याला फॉर्म राखणे आणि प्रेरित राहणे कठीण होते. गेल्या 2-3 वर्षांत विश्वचषक सुरू झाल्यापासून कसोटी अजिंक्यपद, जगात आपल्याला खूप कमी द्विपक्षीय मालिका खेळाव्या लागल्या आहेत. माझ्या निवृत्तीची कारणे म्हणजे माझा सध्याचा फॉर्म, 100 वा कसोटी सामना आणि 2023-25 च्या जागतिक क्रिकेट हंगामाचा शेवट. मला वाटते की निवृत्तीसाठी ही योग्य वेळ आहे.
दिमुथ करुणारत्नेने 2011 मध्ये श्रीलंकेकडून एकदिवसीय सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने 99 कसोटी सामने खेळले आहेत आणि 7,172 धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 16 शतके आणि 39 अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत, त्याने 50 सामन्यांमध्ये एकूण 1 हजार 316 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये एक शतक आणि 11 अर्धशतके आहेत. त्याच्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने 8 हजारांहून अधिक धावा आणि 17 शतके केली.
2025-02-04T06:18:35Z