पंड्याविना कशी असेल Mumbai Indianची प्लेइंग 11,बुमराहची जागा कोण घेणार?
आयपीएल सूरू होण्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. कारण पहिल्या सामन्याला बीसीसीआयच्या कारवाईमुळे हार्दिक पंड्या मुकणार आहे. त्यासोबत बुमराह अद्याप फिट नसल्याने तो सुरूवातीच्या सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे पंड्या आणि बुमराह शिवाय प्लेईंग इलेव्हन कशी असणार आहे? हे जाणून घेऊयात. आयपीएलमध्ये पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळवला जाणार आहे.तर दुसरा सामना हैद्राबाद विरूद्ध राजस्थान आणि तिसरा सामना हा मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात असणार आहे. या सामन्यासाठी मुंबईची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? हे पाहूयात. पहिल्याच सामन्यात मुंबईचे दोन मोठे खेळाडू हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह बाहेर असणार आहेत. हा मुंबईला मोठा झटका आहे. पंड्याच्या अनुपस्थितीत सुर्यकुमार यादव मुंबईचा कर्णधार असणार आहे. मुंबईकडून सलामीला रोहित शर्मा उतरेल यात काहीच शंका नाही. त्याच्यासोबत विल जॅक्स डावाची सूरवात करेल. मुंबईच्या मधल्या फळीत तिलक वर्मा,सूर्यकुमार यादव आणि नमन धीर हे खेळाडू असणार आहेत. तसेच चेन्नईचा एकेकाळी गोलंदाजीचा प्रमुख असलेला दीपक चहर सध्या मुंबई इंडियन्ससोबत आहे आणि तो प्लेइंग-११ मध्ये खेळेल अशी अपेक्षा आहे. चेन्नईमध्ये खेळणारा आणखी एक खेळाडू मिचेल सँटनर अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारेल. यष्टीरक्षकाची जबाबदारी रॉबिन मिंज किंवा रायन रिकेलटन यांच्याकडे असेल. गोलंदाजीत फिरकी गोलंदाज मिशेल सँटनर व्यतिरिक्त, त्यांच्याकडे फक्त ट्रेंट बोल्ट आणि मुजीब उर रहमान हे पर्याय आहेत. दीपक चहर वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेत आणि कर्ण शर्मा फिरकी गोलंदाजाच्या भूमिकेत दिसतील. अर्जुन तेंडुलकर एक प्रभावशाली खेळाडू म्हणून दिसण्याची शक्यता आहे. सीएसके विरूद्ध मुंबई इंडियन्सची प्लेइंग-11 : रोहित शर्मा, विल जॅक्स, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), मिशेल सँटनर, रायन रिकेलटन/रॉबिन मिंज, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रेहमान, दीपक चहर, करण शर्मा, अर्जुन तेंडुलकर
2025-03-19T11:28:59Z
Yuzvendra Chahal : चहलच्या कथित गर्लफ्रेंडचा धनश्रीला टोमणा,तो कसाही असला तरी...
टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट होणार आहे. या घटस्फोटावर उद्या कोर्टातून निर्णय येणार आहे. या दरम्यान युझवेंद्र चहलने धनश्री वर्माला 4.75 कोटी रुपये देण्यास सहमती दर्शविली आहे.बुधवारी बार अँड बेंचने अहवाल दिला की संमतीच्या अटीनुसार, चहलने वर्मा यांना 4.75 कोटी रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्यास सहमती दर्शविली आहे. यानंतर आता चहलसोबत डेटिंगची चर्चा असलेल्या आरजे महावशने धनश्री वर्माला टोमणा मारला आहे. त्यामुळेआरजे महावशची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. आरजे महावशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, तुम्हाला जी व्यक्ती आवडते, त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करा. ती व्यक्ती कशीही असो, पण तुम्हाला ती व्यक्ती आवडते ना, मग तिचा स्वीकार करा. बाकीची लोकं काय करतात, या गोष्टीशी आपल्या आवडत्या व्यक्तीची तुलना करू नका. कारण लोकांना जे करायचं आहे ते त्या व्यक्ती करतील, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, ते तुम्ही ठरवा. कारण तुमची आवडती व्यक्ती तुमच्याबरोबर असणं, हे सर्वात महत्वाचं आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला कधीही फसवू नका, कारण त्यावेळी तुम्ही केलेल्या त्या कृतीची सल तुम्हाला आयुष्यभर बोचत राहील. कोणत्या व्यक्तीला डेट करायचं आहे, ते तुम्ही ठरवा. बाकी लोकांना काय करायचं आहे, ते ते लोकं ठरवतील. आरजे महावशने धनश्री वर्माच नाव घेता तिच्यावर जोरदार टीका केली आहे. या टीकेवर आता धनश्री काय उत्तर देते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
2025-03-19T16:59:06Z