तिलक वर्माचा कमबॅक प्लॅन तयार! ऑपरेशननंतर समोर आली पहिली प्रतिक्रिया

Tilak Verma Health Updates :राजकोटमध्ये विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) दरम्यान भारताचा युवा स्टार क्रिकेटर तिलक वर्माला (Tilak Verma) टेस्टिकुलर टॉर्शनमध्ये दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. तिलक वर्मा 21 जानेवारी पासून न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांची टी 20 सीरिज  सुरु करणारा आहे. 21 जानेवारी पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात टी 20 सीरिज खेळवली जाणार आहे. तीन सामन्यांची ही सीरिज तिलक वर्मा ऑपरेशन झाल्यामुळे मुकू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आता तिलक वर्मा आणि बीसीसीआयने (BCCI) अधिकृतपणे आपल्या एक्स हॅण्डलवर पोस्ट करून अपडेट दिली आहे. 

21 जानेवारी पासून न्यूझीलंड विरुद्ध भारत पाच सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहे. ही सीरिज म्हणजे आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 साठी दोन्ही संघांसाठी वॉर्मअप सामना ठरेल. या सीरिजसाठी भारतीय संघात तिलक वर्माचा समावेश होता. मात्र तिलकचं ऑपरेशन झाल्यावर त्याला पूर्ण रिकव्हर होण्यासाठी 2 ते 4 आठवडे लागू शकतात. बीसीसीआयने सुद्धा स्वतः तिलकच्या ऑपरेशनबद्दल अपडेट्स दिले आहेत यासह तिलकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. 

काय म्हणाला तिलक वर्मा?

ऑपरेशनच्यानंतर तिलक वर्माने इंस्टाग्राम हॅण्डलवर आपला एक फोटो स्टोरीला शेअर केला. यावर त्याने लिहीलं की, 'एवढं प्रेम देण्यासाठी खूप धन्यवाद. मी आपली रिकव्हरी सुरु केली आहे आणि जसं की तुम्हाला माहितीये की मी लवकरच मैदानात पुनरागमन करेल. तुम्हाला तर माहिती आहेच'. मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी तिलकचे पुनरागमन त्याच्या प्रशिक्षण आणि फिटनेस चाचणीवर अवलंबून असेल.

तिलक वर्माला का करावी लागली सर्जरी : 

टेस्टिकुलर टॉर्शनच्या समस्येमुळे 7 जानेवारीच्या सकाळी राजकोट येथे नाश्ता केल्यावर तिलक वर्माला शरीराच्या खालच्या भागाला अचानक वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जिथे तपासणी केल्यावर त्याचं ऑपरेशन करण्यात आलं. यावेळी तिलक वर्मा हा विजय हजारे ट्रॉफीसाठी हैदराबाद संघासोबत राजकोट येथे होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने PTI ला सांगितलं तिलक वर्मा वेदनेत असताना त्याला लगेचच गोकुळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. चाचण्या आणि स्कॅनमधून असे दिसून आले की तिलकला टेस्टिक्युलर टॉर्शन आहे, ही अशी स्थिती आहे जी अचानक, तीव्र वेदनांमुळे होते. डॉक्टरांनी तिलकला विलंब न करता ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा :  रोहित शर्माच्या पत्नीने खरेदी केलं आलिशान घर! 263000000 रुपयांच्या घरात काय आहे खास? जाणून घ्या

 

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी 20 सीरिजसाठी टीम इंडियाचा संघ : 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर. 

 

2026-01-09T12:10:53Z