पिंपळनेर : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील आ.मा.पाटील महाविद्यालयाची खेळाडू कृष्णा जयप्रकाश कुंभार हिने राष्ट्रीय पातळीवरील 'तांग सू डो' स्पर्धेत सुवर्णपदक पटाकावले. दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये १ ते ३ जानेवारी दरम्यान अकरावी राष्ट्रीय तांग सू डो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्याच्या संघात पिंपळनेर येथील आ.मा.पाटील महाविद्यालयाची खेळाडू कृष्णा कुंभार ही देखील सहभागी झाली होती. या स्पर्धेत तिने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
कृष्णा हिला राजे छत्रपती स्कुलचे प्रशिक्षक संभाजी अहिरराव, अमोल अहिरे, श्री. गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या उल्लेखनिय कामगिरीबद्दल राजे छत्रपती स्कुलच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटील, आ.मा.पाटील महाविद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एच.पाटील यांनी तिचे कौतूक केले. कृष्णा ही शहरातील शांती ट्रेडर्सचे संचालक जयप्रकाश कुंभार-प्रजापत यांची कन्या आहे.
2025-01-08T15:56:02Z