भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) लक्ष्य केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू असणारे योगराज सिंग आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या विधानांवरुन अनेकदा वादही निर्माण झाला आहे. याआधीही अनेकदा त्यांनी जाहीरपणे महेंद्रसिंग धोनीवर टीका केली असून, आपल्या मुलाचं करिअर बर्बाद केल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी नव्याने धोनीला लक्ष्य केलं असून आपण कधीही त्याला माफ करणार नाही असं म्हटलं आहे. योगराज सिंग यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
"मी धोनीला माफ करणार नाही. त्याने आरशात आपला चेहरा पाहावा, तो मोठा क्रिकेटर आहे. पण त्याने माझ्या मुलाविरोधात जे काही केलं ते सगळं आता बाहेर येऊ लागलं आहे. मी त्याला आयुष्यात कधीच माफ करु शकणार नाही. एकतर जो माझ्यासोबच चुकीचं करतो त्याला मी कधीच माफ करत नाही, दुसरं म्हणजे मी आयुष्यात कधीच त्यांना मिठी मारत नाही. मग ती माझी मुलं असो किंवा कुटुंबातील सदस्य असोत," असं योगराज सिंग यांनी झी स्विच युट्यूब चॅनेलशी बोलताना सांगितलं.
योगराज सिंग यांनी धोनीवर जाहीरपणे टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 66 वर्षीय योगराज सिंग यांनी चेन्नई सुपरकिंग्ज धोनीच्या वाईट कर्मांमुळे आयपीएल 2014 हारली असा दावा केला होता. धोनीला युवराजचा फार मत्सर आहे असा आरोपही त्यांनी केला होता.
"चेन्नई आयपीएल 2024 हारली, पण ते का हारले? याचं कारण तुम्ही जे काही पेरता तेच उगवतं. युवराज सिंग आयसासीचा अॅम्बेसिडर आहे, त्याला माझा सलाम आहे. आणि धोनीला त्याचा मत्सर वाटतो. तो धोनी आता कुठे आहे? त्याने युवराजसोबत साधं हस्तांदोलनही केलं नाही. याचमुळेच चेन्नई सुपरकिंग्जचा यावर्षी पराभव झाला," असा दावा योगराज सिंग यांनी केला होता.
दरम्यान महेंद्रसिंग धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण 43 वर्षीय युवराज सिंग अद्यापही आयपीएलमध्ये सक्रीय आहे. पण धोनीच्या भवितव्याबाबत साशंकता आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये धोनी चेन्नईसह खेळणार की नाही याबाबत शंका आहे.
2024-09-02T07:00:35Z dg43tfdfdgfd