Paris Paralympic 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 चा बुधवारी दुसरा दिवस असून भारताचे खेळाडू यात दमदार प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. सहाव्या दिवशी भारताच्या तब्बल 8 खेळाडूंनी पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकले त्यामुळे सध्या भारताच्या खात्यात एकूण 8 पदकांचा समावेश आहे. भारताने पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकण्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड केवळ 6 दिवसांमध्ये मोडला. भारताने यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये 19 पदक जिंकले होते. भारताच्या खात्यात सध्या 3 सुवर्ण, 7 रौप्य तर 10 कांस्य पदकांची समावेश आहे.
पॅरालिम्पिकच्या सातव्या दिवशी भारताचे नेमबाज, टेबल टेनिस खेळाडू, एथलीट, तीरंदाज आणि पॉवरलिफ्टर ऍक्शन मोडमध्ये दिसून येतील. बुधवारी भारताची सुरुवात ही नेमबाजीने होईल जिथे पी4 मिक्स्ड 50 मीटर पिस्टल SH1 मध्ये निहाल सिंह आणि रुद्रांश खंडेलवाल हे सहभागी होतील. तर एथलेटिक्स मध्ये शॉट पुट खेळाडू सुद्धा पदकावर दावा सांगतील. भारताची वर्ल्ड चॅम्पियन पदक विजेती सिमरन शर्मा ही सुद्धा ऍक्शन मोडमध्ये असेल. तर बुधवारी भारताचे पुरुष आणि महिला पॉवर लिफ्टर सुद्धा बुधवारी पदकावर दावा सांगतील.
हेही वाचा : 26000 कोटींचा मालक... विराट, सचिन, धोनी, रोहितच्या एकत्रित संपत्तीपेक्षाही त्याच्याकडे जास्त पैसा
शूटिंग - निहाल सिंह, रुद्रांश खाडेलवाल - P4 मिक्स्ड 50 मीटर पिस्टल SH1 - दुपारी 1 वाजता
एथलेटिक्स - मोहम्मद यासिर, रोहित कुमार आणि सचिन खिलारी - F46 पुरुष शॉटपुट - दुपारी 1.35 वाजता
टेबल टेनिस - भाविनाबेन पटेल- महिला सिंगल्स WS4 क्वार्टर फाइनल - दुपारी 2.15 वाजता
एथलेटिक्स - आमिशा रावत - महिला शॉटपुट F46 - दुपारी 3.17 वाजता
पावरलिफ्टिंग - परमजीत कुमार - पुरुष 49 किलोग्राम - दुपारी 3.30 वाजता
आर्चरी - हरविंदर सिंह - पुरुष इंडीविजुअल रिकर्व ओपन - संध्याकाळी 5.49 वाजता
पावरलिफ्टिंग - सकीना खातून - महिला अप टू 45 किलोग्राम - रात्री 8.30 वाजता
एथलेटिक्स - धर्मबीर, प्रणव सूरमा, अमित कुमार - पुरुष क्लब थ्रो F51 - रात्री 10.50 वाजता
एथलेटिक्स - सिमरन शर्मा - महिला पुरुष 100 मीटर T12 Heat 1 - रात्री 11.03 वाजता
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 साठी भारताने यंदा 84 खेळाडूंचा समूह पाठवला आहे. हे खेळाडू विविध 12 स्पर्धांमध्ये भाग घेणार असून यात 52 पुरुष तर 32 महिला खेळाडूंचा समावेश आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेची सांगता 9 सप्टेंबरला होईल.
2024-09-04T06:31:29Z dg43tfdfdgfd