Trending:


भारतीय वाघिणींचा धमाका; आठव्यांदा महिला आशिया कप जिंकला, बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीत श्रीलंका चितपट

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया चषक २०२६ चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये दमदार कामगिरी करत श्रीलंकेला मात दिली. त्यामुळे टीम इंडियाने महिला आशिया चषकाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.


४७ वर्षीय इम्रान ताहिरचा वर्ल्ड रेकॉर्ड! टी-२० इतिहासात अशी अनोखी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज

Imran Tahir T20 World Record: दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू इमरान ताहीरने वयाच्या ४७व्या वर्षी विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.


भारतीय संघाला झटका, अफगाणिस्तान आणि एशियन गेम्समधून मॅचविनर बाहेर; युवा खेळाडूची निवड, कोण?

IND vs AFG T20 News : भारत आणि अफगाणिस्तानमधील टी-२० मालिका तोंडावर असताना भारतीय संघाला झटका बसला आहे . स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. कोण आहे तो खेळाडू आणि त्याच्या जागी कोणाची निवड झाली जाणून घ्या.


पाकिस्तान किंवा श्रीलंका आम्हाला फरक पडत नाही; फायनलसाठी भारताकडून कडक फिल्डींग; दीप्ती शर्माने सांगितली आतली बातमी

Deepti Sharma News : महिला आशिया कप २०२६च्या फायनलमध्ये भारताने सलद दहाव्यांदा प्रवेश केला आहे. आता फायनलमध्ये भाारतासमोर श्रीलंका की पाकिस्तान कोणाचे आव्हान असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मात्र त्याआधी अष्टपैलू खेळाटू दीप्ती शर्माने केलेले विधान चर्चेत आले आहे.


भारताच्या टी-२० संघात मोठा बदल! हर्षित राणा पुन्हा झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर; बुमराहबाबत मोठी अपडेट

India vs Afghanistan T20 Squad Updates: अफगाणिस्तानविरूद्ध टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे.


पाकिस्तानी संघ पुन्हा वादात, दोन खेळाडूंचे फोन जप्त! रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा संपूर्ण प्रकरण

आता पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंची आणखी अडचणींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता, पाकिस्तानच्या सायबर गुन्हे शाखेकडून इमाम आणि रिझवान यांना नोटीस बजावण्यात आली आहे.


IND vs SL: श्रेयस सारखाच हरमनचा बोल्ड डिसिजन, फायनलला मॅचविनर खेळाडूला बाहेर बसवलं

दुबईच्या इंटरनेशनल स्टेडिअमर भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कपच्या फायनल सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्याचा टॉस जिंकून कॅप्टन हरमनप्रीत कौरने बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्रीलंका प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. दरम्यान या सामन्यासोबत तिकडे टीम इंडियाचा पुरुष संघ अफगाणिस्तान विरूद्ध टी20 सामना खेळतो आहे. या सामन्यात कॅप्टन श्रेयस अय्यरने बोल्ड डिसिजन घेत वैभव सूर्यवंशीला बाहेर बसवलं होतं. आता श्रेयस सारखाच बोल्ड डिसिजन हरमनप्रीत कौरने घेत टीममध्ये एक बदल केला आहे. तिने थेट एका चॅम्पियन खेळाडूला बाहेर बसवलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला हा बदल भारी पडला नाही तर बरं. हरमनप्रीत कौरने प्रतिका रावलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कारण संपूर्ण स्पर्धेत ती फ्लॉप ठरली होती. तसेच मागच्या सामन्यात तिने दोन कॅच ड्रॉप केल्या आहेत. पण असं जरी असलं तरी तिने वनडे वर्ल्डकप जिंकवण्यात भारताला मोलाची साथ दिली होती. आता तिच्या जागी गुणालन कमालिनीला संधी देण्यात आली आहे. गुणालन कमालिनीने एकमेव टी20 सामना खेळला आहे.या सामन्यात तिला एकही विकेट मिळाली नव्हती.तरी देखील हरमनप्रीत कौरने जोखीम घेऊन तिला टीममध्ये घेतले आहे. आता गुणालन कमालिनी फायनलमध्ये कशी कामगिरी करत? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान फायनलमध्ये टीम इंडियाच्या डावाची सुरुवात चांगली झाली आहे. टीम इंडियाने सात ओव्हरमध्ये 70 धावांचा आकडा गाठला आहे.


65 वर्ष जुना रेकॉर्ड उध्वस्त, ईशान किशनच्या फलंदाजीचा दुलीप ट्रॉफीमध्ये दबदबा

Duleep Trophy 2026 Ishan Kishan : ईशान किशनच्या नेतृत्वात ईस्ट झोनने 2026 च्या दुलीप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 13 वर्षानंतर ईस्ट झोनने ही ट्रॉफी जिंकली असून यात ईशानने सर्वोत्तम फलंदाजी केली. यासह ईशान किशनने 65 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड उध्वस्त करून सर्वात जास्त धावांचा रेकॉर्ड बनवला.


वैभवने उंचावली ट्रॉफी, 13 वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलं! फायनल सामना न खेळता बनला चॅम्पियन

East Zone Duleep Trophy 2026: ईशान किशनने अखेर जवळपास १३ वर्षांपासूनची प्रतीक्षा पूर्ण केली. पूर्व विभागाच्या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण विभागाला हरवून दुलीप ट्रॉफी जिंकली.


ENG vs PAK : पाकिस्तानच्या नव्या वकार युनुसची बॅटिंगमध्ये पण कमाल, 9 व्या नंबरवर येऊन मारल्या 9 SIX, रजाउल्लाह सुसाट VIDEO

ENG vs PAK : पाकिस्तानचा 21 वर्षाचा युवा खेळाडू रजाउल्लाह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. पदार्पणाच्या डेब्यू टेस्ट मॅचमध्येच त्याने कमाल केली आहे. गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही त्याने आपली ताकद दाखवून दिली.


सचिन तेंडुलकर ते विराट कोहली! ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची आलिशान घरे अन् त्यांची थक्क करणारी किंमत

Indian Cricketers Expensive Houses : सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग आणि एमएस धोनी या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनी रिअल इस्टेटमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.


बांगलादेशी खेळाडूनं स्मृती मानधनाला डिवचलं, टीम इंडियाच्या खेळाडूनं दिलं चोख उत्तर, video viral

IND vs BAN Womens Asia Cup: भारत आणि बांगलादेश यांच्यात सेमीफायनल सामना रंगला जो भारतीय संघाने जिंकला. या सामन्यात मैदानावर जे झालं त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.


एकदिवसीय विश्वचषक खेळणार का? रोहित शर्माने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मला आता तसे वाटत नाही..."

आता रोहित शर्मा 2027 चा एकदिवसीय विश्वचषक खेळणार की नाही यावर मागील काही काळापासून सातत्याने चर्चा पाहायला मिळत आहे, आता स्वत: रोहितने प्रतिक्रिया दिली आहे.


व्हाईस-कॅप्टन्सी काढली, टीममधूनही बाहेर केलं... खऱ्या मॅच विनरने श्रेयस-गंभीरला दाखवून दिला ऑरा!

पहिल्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाने वैभव सूर्यवंशी, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई आणि यश ठाकूर यांना बेंचवर बसवलं. पहिले बॅटिंग करणाऱ्या अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 156/8 एवढा स्कोअर केला. अफगाणिस्तानकडून अझमतुल्लाह ओमरझईने अर्धशतकी खेळी करून अफगाणिस्तानला संकटातून बाहेर काढलं. ओमरझईने 44 बॉलमध्ये नाबाद 64 रनची खेळी केली, ज्यात 4 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. ओमरझईशिवाय मोहम्मद नबीने 33 रन केले. भारताकडून अर्शदीप सिंगला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. याशिवाय जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीला एक-एक विकेट घेण्यात यश आलं. शिवम दुबेने टाकलेल्या 20 व्या ओव्हरमध्ये 21 रन आल्यामुळे अफगाणिस्तानला 150 रनचा टप्पा ओलांडता आला. या सामन्यातून भारतीय टीममध्ये कमबॅक करणाऱ्या अक्षर पटेलने टिच्चून बॉलिंग करून पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं. अक्षर पटेलने 4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन एक विकेट घेतली. अक्षरने गुलबदीन नैबला आऊट केलं. अक्षर पटेलने त्याच्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 11 रन दिल्या होत्या. पहिल्याच बॉलपासून अक्षरने अफगाणिस्तानच्या बॅटरना मोठे शॉट मारून दिले नाहीत, पण अक्षरने त्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 16 रन दिले. टीम इंडियाला 2024 आणि 2026 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अक्षर पटेलचं योगदान मोठं आहे, पण चांगल्या कामगिरीनंतरही अक्षरची व्हाईस-कॅप्टन्सी अचानक काढण्यात आली, तसंच त्याला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात अपयश आल्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यातून टीमबाहेर केलं गेलं. आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये टीम इंडियाला पराभावाचा धक्का बसला, यातलं प्रमुख कारण अक्षरचा फॉर्म ठरलं. आता कमबॅकच्या सामन्यात अक्षर पटेलने उत्कृष्ट कामगिरी करून पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परत आल्याचं दाखवून दिलं आहे. अक्षर पटेलचा हा फॉर्म टीम इंडियासाठी मात्र नक्कीच दिलासादायक असेल.


Duleep Trophy final: १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं! इशान किशनच्या नेतृत्वात ईस्ट झोनचा दुलीप ट्रॉफीवर कब्जा

Duleep Trophy Final: ईस्ट झोन आणि साऊथ झोन या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात ईस्ट झोन संघाने जेतेपदाचा मान पटकावला आहे.


जो रूटकडून सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडीत! ४ मैदानांवर १,०००+ धावा अन् ६९ अर्धशतके; इंग्लंडकडून पाकचा ३-० ने धुव्वा!

६९ वे अर्धशतक ठोकून रूटने कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. त्याच्या नाबाद ६२ धावांच्या बळावर इंग्लंडने पाकिस्तानचा ३-० असा व्हाईटवॉश केला.


Sreesanth father death: माजी क्रिकेटर एस श्रीसंतच्या वडिलांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास!

एस. श्रीशांत याचे वडील व्ही. शांतकुमारन नायर, यांचं शुक्रवारी रात्री निधन झालं. पीटीआयने कौटुंबिक सूत्रांच्या हवाल्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू श्रीशांत यांच्या वडिलांवर लिसी रुग्णालयात उपचार सुरू होते. व्ही. शांतकुमारन नायर हे 89 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवाला कोट्टामंगलम येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी नेण्यात येईल. एस. श्रीशांत यांच्या वडिलांचा मृतदेह सध्या शवागारात ठेवण्यात आला आहे. त्यांचे कुटुंबीय सध्या परदेशात आहे. कुटुंबीय परतल्यानंतर ते मृतदेह कोट्टामंगलम येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी घेऊन जातील. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नायर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती समोर आली आहे. एस श्रीशांत हा एकमेव मल्याळी आहे, जो 2006 च्या काळात भारतीय क्रिकेटचा चेहरा बनला. त्याचं अँग्रेशन सर्वांवर भारी पडत होतं. त्याचे वडील शांतकुमारन नायर आणि आई सावित्री देवी यांनी प्रत्येक परिस्थितीत मुलाला साथ दिली. शांतकुमारन नायर हे असे वडील होते, ज्यांनी आपल्या सहा महिन्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी आपले सर्वस्व विकलं होतं. त्यानंतर देखील मुलाला क्रिकेट खेळवण्यासाठी त्यांनी पूर्ण सपोर्ट दिला. श्रीसंत अनेकदा आपल्या वडिलांबद्दल बोलताना दिसला होता.


Shreyas Iyer: संघातील खेळाडूंवर अतिरिक्त दबाव... कॅप्टन श्रेयस अय्यरनं गंभीरबद्दल केलं विधान

IND vs AFG T20 Series: भारत अफगाणिस्तान यांच्यात टी-२० मालिकेला आता आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरने गौतम गंभीरबद्दल एक विधान केले आहे.


यशस्वी जयस्वाल वनडे वर्ल्ड कपच्या संघातून बाहेर! कोचने सुनावला निर्णय

ICC ODI World Cup 2026 : भारताचा स्टार क्रिकेटर यशस्वी जयस्वालला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027 साठी भारतीय संघात निवडण्यात येणार नाही असं मतं त्याचे लहानपणीचे कोच ज्वाला सिंह यांनी केलं आहे. यामागचं कारण सुद्धा यशस्वीच्या कोचने स्पष्ट केलं आहे.


लष्कर भरतीची तयारी करणारे 2 तरुण गावातील शर्यतीत कोसळले; घोड्याच्या इंजेक्शनमुळे कहाणीत ट्विस्ट

गावात धावण्याची शर्यत आयोजित करण्यात आली. त्यात लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या दोघांनी सहभाग घेतला. शर्यतीवेळी दोघांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


आपल्याच घरी भारतीय संघ पाहुणा ठरणार! भारतात होणाऱ्या मालिकेचं यजमानपद अफगाणिस्तानकडे का? जाणून घेऊया कारण

IND vs AFG T20I Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका भारतात खेळवली जाणार असून या मालिकेचं यजमानपद अफगाणिस्ताकडे आहे.


आजपासून भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी20 सीरिजला सुरुवात, कुठे पाहाल live स्ट्रीमिंग?

IND VS AFG T20 Series : 13, 15 आणि 17 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय सीरिज खेळवली जाणार आहे. ही सीरिज क्रिकेट फॅन्सना कुठे पाहता येईल याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.


बांगलादेशचा धुव्वा उडवून टीम इंडियाची फायनलला धडक... आशिया कप ट्रॉफीसाठी कुणाला भिडणार?

मुंबई : आशिया कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने बांगलादेशचा 40 रननी धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताने दिलेल्या 150 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 109/7 एवढाच स्कोअर करता आला. दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर नंदिनी शर्माला 2 विकेट मिळाल्या, याशिवाय श्री चरिणीने 1 आणि प्रेमा रावतने 1 विकेट घेतली.बांगलादेशकडून शोरना अक्तरने नाबाद 22 रन तर दिलारा अक्तरने 21 रन केले. बांगलादेशने या...


भारतीय संघाची थाटात फायनलमध्ये एन्ट्री! एकटीने जिंकवली टीम इंडियाला, ट्रॉफी जिंकण्यासाठी कोणाशी भिडणार?

Asia Cup Final 2026: आशिया कप 2026 च्या सेमीफायनलमध्ये भारत आणि बांगलादेशचे संघ एकमेकांसमोर भिडले ज्यात भारतीय संघाचा विजय झाला. आता फायनलमध्ये कोणाला भिडणार आहे ते पाहा...


दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये ईस्ट झोनचा दमदार विजय, ईशानचे द्विशतक ठरले टर्निंग पॉइंट पण मॅच ड्रॉ तरीही विजेता घोषित कसा? जाणून घ्या

Duleep Trophy Final Winner 2026 : दुलीप ट्रॉफी फायनल सामना ईस्ट झोनने विजय मिळवला आहे. सांघिक कामगिरीच्य जोरावर हा विजय मिळवला असला तरीही सामना ड्रॉ झाला असताना ईस्ट झोनला विजयी कसे देण्यात आले? नेमका नियम काय आहे ते जाणून घ्या.


आशिया कप फायनलमध्ये भारताचे श्रीलंकेला 184 धावांचे लक्ष्य; शेफालीची तुफानी खेळी, रचला ऐतिहासिक विक्रम

India vs Sri Lanka Womens Asia Cup 2026 Today Match UPDATES : महिला आशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८३ धावा केल्या आहेत. भारताच्या शेफालीने तुफानी अर्धशतकी खेळी करत ऐतिहासिक विक्रम रचला आहे.


Vaibhav Sooryavanshi : बुमराहने थोडीही दयामाया दाखवली नाही! 5 बॉल यॉर्करवर यॉर्कर अन् वैभव पायाचा अंगठा वाचवत राहिला; प्रॅक्टिस सेशनमध्ये काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi in Net practice Session : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-ट्वेंटी मॅचेसची सिरीज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. त्यासाठी आता दोन्ही टीम्स सराव करत असून टीम इंडिया सिरीज जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. अशातच टीम इंडियासाठी आनंदाची बातमी म्हणजे जसप्रीत बुमराह याचं कमबॅक झालं असून तो अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना दिसेल. तर याच सिरीजमध्ये वैभव सूर्यवंशी देखील खेळणार आहे. अशातच नेट सेशनमध्ये दोन्ही खेळाडू आमने...


हर्षित राणाच्या दुखापतीमुळे या खेळाडूला मिळाली टीम इंडियात संधी, अफगाणिस्तान सीरिज आणि एशियन गेम्समध्ये खेळणार

Team India : टीम इंडिया सप्टेंबर महिन्यात अफगाणिस्तान विरुद्ध टी20 सीरिज आणि एशियन गेम्स 2026 खेळणार आहे. यात दुखापतग्रस्त गोलंदाज हर्षित राणा यश ठाकूरने रिप्लेस केलं आहे. हर्षित राणा पूर्णपणे बरा नसल्याचे सांगत बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून स्वतः यशाच्या नावाची घोषणा केली.


वनडे वर्ल्डकप खेळणार की नाही? हिटमॅन रोहित शर्माचं एका वाक्यात उत्तर, काय म्हणाला?

Rohit Sharma ODI World Cup 2027 : भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार आहे की नाही हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर आता रोहितनेच उत्तर दिलं आहे. हिटमॅन काय म्हणाला? जाणून घ्या.


Ishan Kishan statement: कर्णधार असावा तर असा! इशान किशनने दुलीप ट्रॉफी विजयाचं क्रेडिट कोणाला दिलं? सामन्यानंतर म्हणाला…

Duleep Trophy 2026 Final East Zone vs South Zone: इशान किशनच्या नेतृत्वात ईस्ट झोन संघाने साऊथ झोनला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला. दरम्यान सामना जिंकल्यानंतर इशान किशन काय म्हणाला? जाणून घ्या.


आशिया कप फायनल मॅचमध्ये गतपराभवाचे उट्टे काढण्यासाठी भारतीय वाघिणी सज्ज, पण एक पडती बाजू ठरणार डोकेदुखी; नेमकी कोणती?

Women Asia Cup final : महिला आशिया कप २०२६ मध्ये आज भारत आणि श्रीलंका हे दोन संघ आमनेसामने असणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. मात्र भारताची एक पडती बाजू समोर आलीये. नेमकी कोणती? जाणून घ्या.


पाकिस्तानी क्रिकेटपटूवर कशी वेळ आली? सोशल मीडियावर मागितलं काम, म्हणाला…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तान संघाचा भाग असलेल्या गोलंदाजावर नामुष्की ओढावली आहे. त्याने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतही भाग घेतला होता. मात्र आता संघातून बाहेर असल्याने सोशल मीडियावरून आवाहन करावं लागलं आहे.


Harmanpreet Kaur: शेफाली वर्मा एकटी लढली, तरीही हरमनप्रीत कौरकडून भलत्याच खेळाडूंचे कौतुक, असं का?

Womens Asia Cup Final 2026: भारत आणि बांगलादेश यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला. या विजयानंचर कर्णधार हरमनप्रीत कौरने जे विधान केले त्याची आता चर्चा रंंगली.


Fatima Sana : सेमीफायनलमधून बाहेर पडल्यानंतर ढसाढसा रडली पाकिस्तानची कॅप्टन! पण का मिळाला 'प्लेयर ऑफ द मॅच' अवॉर्ड?

वुमेन्स आशिया कपच्या दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये श्रीलंका महिला टीमने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला. या पराभवासोबतच पाकिस्तानचं फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगलं असून श्रीलंकेने फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमधील पराभवानंतर आता पाकिस्तानचं पॅकअप झालं असून पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडली आहे. भारताने 57 रन्सवर पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर आता पुन्हा इंडिया आणि पाकिस्तान आमने सामने येणार नाही. आणखी एका पराभवानंतर पाकिस्तानची कॅप्टन फातिमा सना ढसाढसा रडली. पराभवानंतर तिला अश्रू अनावर झाले. खाली बसून ती हुंदके देत रडली. मात्र, आपणच कॅप्टन असल्याचं जाणवल्यानंतर फातिमा पुन्हा उठली अन् शेक हँड केलं. कॅमेऱ्यात पाहिल्यावर तिचे डोळे पाणावले होते. मात्र, 18 आणि 19 व्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या बॉलर्सनी आणि फिल्डर्सनी चुका केल्या. 19 व्या ओव्हरमध्ये फातिमा सनाने टाकलेला नो-बॉल आणि त्यावर पडलेला बाउंड्री पाकिस्तानला महाग पडला. पाकिस्तानचा पराभव झाला असला, तरी 47 रन्सची नाबाद खेळी आणि 4 विकेट्स घेणारी पाकिस्तानची कॅप्टन फातिमा सना ही तिच्या ऑलराऊंडर कामगिरीसाठी 'प्लेयर ऑफ द मॅच' ठरली. फातिमाने तीन वेळा मॅच फिरवली होती. फातिमा सनाने 36 बॉल्समध्ये 4 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने नाबाद 47 रन्सची जिद्दी खेळी केली. 131 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना श्रीलंकेला दोनदा फातिमाने अडचणीत आणलं होतं. त्यामुळे तिला 'प्लेयर ऑफ द मॅच' अवॉर्ड दिला गेला. दरम्यान, फातिमाने दुसऱ्याच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या अन् टॉप ऑर्डर मोडून काढली. तर 17 व्या ओव्हरमध्ये फातिमा सनाने पुन्हा एकदा कमाल करत या दोन्ही सेट बॅटर्सना एकाच ओव्हरमध्ये आऊट केलं आणि पाकिस्तानला मॅचमध्ये परत आणलं.


टीम इंडियाच्या सामन्यांची वेळ बदलली, किती वाजता सुरु होणार भारताचे सामने?

Team India Asian Games 2026 : अशियन गेम्स 2026 मध्ये पुरुष क्रिकेट इव्हेन्टशी संबंधित एक मोठी अपडेट समोर येत आहे. त्यानुसार दुपारी होणाऱ्या सामन्यांच्या वेळेत बदल झाले असून सामने अर्धातास अगोदर सुरु होणार आहेत.


17 वर्षांच्या रोहित शर्माला ट्रेनमधून कोणी दिला धक्का? हिटमॅनच्या शोवर मित्राने केला खुलासा

Rohit Sharma : रोहित शर्माचा सहकारी आणि मित्र क्रिकेटर अभिषेक नायर याने 'फॅमिली फुल हाऊस' या शोमध्ये रोहित शर्माच्या आयुष्यातील एक मजेदार किस्सा सांगितला. अभिषेकने रोहित 17 वर्षांचा असताना त्याच्यासोबत मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये घडलेला किस्सा सांगितला.


Vinesh Phogat: विनेश फोगाटला मोठा झटका, दिल्ली उच्च न्यायलयानं काय म्हटले?

Vinesh Phogat World Wrestling Championships Trials: दिल्ली उच्च न्यायालयाने कुस्तीपटू विनेश फोगाटला २०२६ च्या वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या महिलांच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास परवानगी नाकारली आहे.


Yash Thakur : निघाला पाँडेचेरीला पण पोहोचला दिल्लीत! 24 तासात नशीब बदललं, BCCI च्या एका कॉलने विदर्भच्या पोट्ट्याला लॉटरी!

अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेत टीम इंडियाचा स्टार बॉलर हर्षित राणा दुखापतीमुळे संघातून बाहेर गेला आहे. अशातच आता हर्षित राणाच्या जागेवर विदर्भच्या यश ठाकूर याला टीम इंडियात संधी मिळाली आहे. बुधवारी ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध इंडिया ए संघाची घोषणा झाली. यामध्ये यश ठाकूरला टीममध्ये संधी मिळाली. त्यानंतर तो 22 सप्टेंबरच्या सामन्यासाठी पाँडेचेरीला रवाना होणार होता. पण बीसीसीआयच्या एका फोन कॉलमुळे त्याला दिल्लीला जावं लागणार आहे. बुधवारी यश ठाकूरचं इंडिया ए टीममध्ये सिलेक्शन झालं अन् गुरुवारी त्याला थेट टीम इंडियाचा कॉल आला. त्यामुळे बीसीसीआयच्या एका फोन कॉलमध्ये 24 तासात त्याचं नशीबच चमकलं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. राईट हँड बॉलर यश ठाकूर देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करतो. महेंद्रसिंह धोनीने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर यशला क्रिकेटची प्रेरणा मिळाली आणि त्याने सुरुवातीला विकेटकीपर म्हणून खेळण्यास सुरुवात केली होती. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये धमक दाखवल्यावर आता यशला टीम इंडियात पदार्पणाची संधी मिळाली आहे. झिम्बॉब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याला डेब्यू करण्याची संधी मिळाली होती. तिथंही त्याने चमकदार कामगिरी करून दाखवली होती.


Team India: टीम इंडियाला मोठा धक्का! रायन टेन डोशेट, टी दिलीपनंतर आणखी एका सदस्याने सोडली संघाची साथ, कारण…

Team Inida Physio, Kamlesh Jain: भारतीय संघाचे फिजिओ कमलेश जैन यांनी भारतीय संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


भारताची विजयी सुरुवात, अफगाणिस्तानला 7 विकेट्सने केले पराभूत! वाचा सामन्याचा अहवाल

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर पहिला मालिकेचा टी20 सामना पार पडला. या सामन्यात 7 विकेट्सने टीम इंडियाने विजय नावावर केला आहे.


Women’s Asia Cup 2026 final: जेतेपदासाठी भारत श्रीलंकेशी भिडणार; पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि कुठे पाहावा थेट सामना

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका भिडणार आहे. मागच्या पर्वात श्रीलंकेने भारताला पराभूत केलं होतं. आता त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.


Explained: 'राहुल द्रविड मालक असल्यासारखा वागतोय,' European T20 चा प्रशिक्षक स्पष्टच बोलला; 'सलग पाच सामने गमावूनही, सगळी जबाबदारी...'

खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून यश मिळवल्यानंतर, राहुल द्रविडने 'युरोपियन टी-20 प्रीमियर लीग'मधील 'डब्लिन गार्डियन्स' या फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करत नवी भूमिका साकारत आहे.


Rohit Sharma : 'ऑक्टोबर 2027 अजून खूप लांब, तोपर्यंत...', वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? हिटमॅनने एका वाक्यात विषय संपवला!

इंग्लंडविरुद्ध सेंच्युरी ठोकून टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याने टीममधली आपली जागा पक्की केली आहे. त्यानंतर आता त्याने एटरटेनमेंटच्या दुनियात एन्ट्री केली आहे. त्याचा एक शो टीव्हीवर लवकर येतोय. अशातच मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये आयोजित एका कार्यक्रमात रोहित शर्मासमोर एक प्रश्न बॉम्बासारखा पडला. तू आगामी वनडे वर्ल्ड कप खेळणार का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्याने "ऑक्टोबर 2027 अजून खूप दूर आहे, तेव्हा बघूया.", असं उत्तर दिलं. 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप तब्बल 11 वर्षानंतर जिंकला होता. त्यानंतर मुंबईत भव्य बस रॅली परेड काढण्यात आली होती. तिथं लाखोंची गर्दी पहायला मिळाली होती. यावर रोहितने भाष्य केलं. रोहित शर्माला असंही विचारण्यात आलं की, जर टीम इंडियाने 2027 मध्ये वर्ल्ड कप जिंकला, तर 2024 प्रमाणे बस परेड होईल का? यावर शर्माने उत्तर दिलं, "मला नाही वाटत की आता बस परेड शक्य होईल." दरम्यान, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी रोहितच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. तर रोहित शर्माने लॉर्ड्वर सेंच्युरी ठोकल्यानंतर मी कुठंही जाणार नाही, असं म्हणत सर्वांना उत्तर दिलं होतं.


पाकिस्तानने भारतासमोर आणखी एकदा टेकले गुडघे! टीम इंडियाने पाकला 19-0 ने केलं पराभूत

ज्युनियर आशिया कप 2026 च्या उपांत्य फेरीमध्ये भारतीय महिला संघाने पाकिस्तानला 19-0 अशा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.


भारताने संघाबाहेर केलं, पण या खेळाडूचा इंग्लंडमध्ये जलवा; काऊंटी संघाचे प्रशिक्षक म्हणाले, "त्याला पुन्हा संघात घेण्यासाठी काहीही करू"

भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या खेळाडूची काऊंटी क्रिकेटमधील कामगिरी पाहून त्याला संघात घेण्यासाठी कोच अगदी काहीही करायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं.


"मी माफ करू शकते, पण..." स्मृती मंधानाने व्यक्त केले दुःख! म्हणाली, 'मला गरीब समजू नका'

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये महिला आशिया कप 2026 फायनलचा सामना होणार आहे, आता स्मृती मानधनाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये ती तिच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. आता स्मृतीने नक्की मुलाखतीमध्ये काय सांगितले यासंदर्भात सविस्तर वाचा.


वैभव सूर्यवंशीला ड्रॉप करत मॅचविनर खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये उतरवा; अजिंक्य रहाणेने कोणाचं नाव घेतलं?

Ajinkya Rahane on Vaibhav Sooryvanshi News : आपल्या तोडफोड फलंदाजीमुळे कायम चर्चेत असलेला वैभव सूर्यवंशी याला अफगाणिस्तानविरूद्ध प्लेइंग ११ मध्ये न ठेवण्याचा सल्ला अजिंक्य रहाणेने दिला आहे. रहाणेने कोणत्या खेळाडूंना संधी दिली जावी त्यांची नावे घेतली आहे.


टीम इंडियाला अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेआधी मोठा धक्का, संघातील मुख्य खेळाडू जखमी

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये मालिका सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. आता भारताच्या संघाला मालिकेला सुरुवात होण्याआधी मोठा धक्का बसला आहे.


Smriti Mandhana : 'मी बाथरूममध्ये जाऊन ढसाढसा रडते...', स्मृती मानधनाने मनातलं स्पष्टच सांगितलं 'मला मागील गोष्टींचा पश्चाताप...'

Smriti Mandhana Podcast : टीम इंडियाची धाडक बॅटर आणि सांगली सुपरस्टार क्रिकेटर स्मृती मानधना सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आशिया कपमध्ये स्मृती टीम इंडियाने अनेक मॅच जिंकून देतीये. अशातच आता स्मृती मानधनाने राज शमानीसोबत एक पॉडकास्ट केला. तेव्हा तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या दोन वर्षात स्मृतीच्या खासगी आयुष्यात अनेक उलथापालथ झाल्या आहेत. अशातच स्मृतीने आपल्या भावना पॉडकास्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.काय आहे स्मृतीचा 30 मिनिट...


महिलांना क्रिकेट खेळता येत नाही, तर ते चांगलं जेवण बनवतात, शाहिद आफ्रिदीच्या विधानामुळे वातावरण तापले

Pakistan Womens Cricket: पाकिस्तान महिला क्रिकेट संघाबद्दल आता त्यांच्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने एक विधान केले होते ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे.