बातम्या

Trending:


मेंदूत रक्ताची गाठ कशी होते आणि त्याचे धोके काय? क्रिकेटपटू विनोद कांबळीला झालेला नेमका आजार काय? जाणून घ्या

क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या ढासळलेल्या प्रकृतीमुळे अनेकांना त्याची चिंता लागून आहे. आता त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ब्रेन स्टोक्सचा धोका वाढला आहे. चला जाणून घेऊयात असं का होतं?


पाकिस्तानचा चॅम्पियन कर्णधार सांभाळणार संघाचे प्रशिक्षणपद! PCB ने कसोटी संघाची केली घोषणा

पाकिस्तान क्रिकेट बार्डाने पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. पाकिस्तानच्या कसोटी संघात चार नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.


दिल्ली कॅपिटल्सचा आरसीबीवर 6 विकेटने दमदार विजय, मिलरने फिरवली मॅच

Delhi Capitals won by 6 wickets : शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. डेविड मिलर याने शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला विजय मिळवून दिला आहे.


RCB vs DC: आरसीबीचा संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात हिरवी जर्सी घालून का उतरला आहे? काय आहे नेमकं कारण?

RCB Green Jersey: आज आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२६ मधील सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याकरता आरसीबीचा संघ हिरवी जर्सी घालून का खेळणार आहे, जाणून घेऊया.


GT vs KKR मॅचमध्ये 'फ्री हिट'वरून राडा! पीचच्या बाहेर पडलेल्या बॉलला 'नो बॉल' का दिला? ICC चा नियम काय सांगतो?

IPL 2026 GT vs KKR : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या रोमहर्षक सामन्यात गुजरातने 2 बॉल शिल्लक असताना 181 रन्सचे लक्ष्य गाठलं. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर गुजरातने बाजी मारली. केकेआरला शेवटच्या ओव्हरमध्ये पाच रन्स डिफेन्ड करायचे होते. अजिंक्यने रमणदीपच्या हातात बॉल सोपवला होता. मात्र, केकेआरला अखेर पाचवा पराभव स्विकारावा लागला. मात्र, या सामन्यात अशोक शर्माने टाकलेल्या नो बॉलवरून अनेक चर्चा होताना दिसतायेत....


SAW vs INDW : अनुष्का शर्माची टीम इंडियात एन्ट्री, 2 खेळाडूंचा पत्ता कट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंग

South Africa Women vs India Women 2nd T20i and Playing 11 : हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडियाची दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. त्यानंतर महिला ब्रिगेडमधून 2 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जाणून घ्या.


खेळाडूंची आता 'डीएनए', 'एसआरवाय' चाचणी; भारतीय ॲथलेटिक्सचा निर्णय; फेडरेशन चषकापासून अंमलबजावणी

महिलांच्या श्रेणीत केवळ जैविक महिलाच स्पर्धा करतील, याची खात्री करण्यासाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने (एएफआय) पुढील महिन्यात रांची येथे होणार्‍या फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेपासून खेळाडूंची जनुकीय (डीएनए) आणि लिंगचाचणी (एसआरवाय) घेण्याचा निर्णय घेतला आहे.


पाकिस्तानची नव्या कसोटी कोचची घोषणा, महिन्याभरापूर्वी निवृत्ती घेतलेल्या खेळाडूवर दिली मोठी जबाबदारी

Pakistan Test Head coach: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कसोटी संघाचे नवे कोच आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफमध्ये बदल करत मोठी घोषणा केली आहे.


ऋतुराज गायकवाडची कॅप्टन्सी जाणार? फ्रेंचायजी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत, दिग्गजाने आतली बातमी लीक केली

CSK vs SRH : आयपीएलमध्ये चेन्नई सूपर किंग्जची सूरूवात खूपच खराब झाली होती. कारण चेन्नई सुपर किंग्जचा सलग तीन सामन्यात पराभव झाला होता. त्यानंतर चेन्नई सूपर किंग्जने सलग दोन सामने जिंकले होते. पण चेन्नईच्या टीमने ज्याप्रमाणे हे सामने जिंकले त्याने फेंचायजी खूश नाही आहे. त्यामुळे आता ऋतुराज गायकवाडची कॅप्टन्सी जाईल,अशी चर्चा सूरू झाली आहे आहे. या चर्चेला चेन्नई सूपर किंग्जच्याच एका दिग्गज क्रिकेटपटूने दुजोरा दिला आहे.खरं तर चेन्नई सुपर किंग्ज...


CSK vs SRH: अभिषेक शर्माने वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडला! IPL इतिहासात अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वेगवान खेळाडू

Abhishek Sharma Record: हैदराबादविरूद्ध सीएसके सामन्यात अभिषेक शर्माने अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला आहे.


चेन्नईची गाडी घसरली, सनरायजर्स हैदराबाद संघाचा 10 धावांनी दमदार विजय, पॉइंट टेबलमध्ये मुसंडी

CSK vs SRH Match Result News : आयपीएल २०२६ मध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर १० धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने याआधी सलग दोन विजय मिळवले होते पण त्यांची आज विजयाची हॅट्ट्रिक हुकली. तर दुसरीकडे हैदराबाद संघाने आपला तिसरा विजय मिळवला आहे.


ट्रीसा-गायत्री जोडीची उबर चषक स्पर्धेतून माघार; भारतीय महिला बॅडमिंटन संघाच्या तयारीला धक्का

डेन्मार्कच्या हॉर्सन्स येथे २४ एप्रिल ते ३ मे या कालावधीत ‘थॉमस आणि उबर चषक फायनल्स’ स्पर्धा होणार आहे.


आयपीएल फ्रँचाइजींनी टेस्ट संघ विकत घ्यावेत; पारंपरिक प्रकारासाठी आयपीएल संस्थापक ललित मोदींचा अनोखा फंडा

टेस्ट क्रिकेट चार दिवसांचं आणि डे नाईट असायला हवं असं मत आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी व्यक्त हवं.


‘मद्यपान करून कुटुंबाला शिवीगाळ’; नीरज चोप्रा आणि सुमित अंतिलचे प्रशिक्षक नवल सिंग यांच्यावर गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?

Javelin Controversy: भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा आणि पॅरालिम्पिक स्टार सुमित अंतिल यांनी प्रशिक्षक नवल सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवल सिंग हे मद्यपान करून खेळाडूंना आणि त्यांच्या कुटुंबाला अभद्र भाषेत शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी नीरज आणि सुमितने स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे (SAI) अधिकृत तक्रार करत शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी केली आहे.


चिअर लीडर्सच्या प्रेमात आकंठ बुडाला, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची लव्हस्टोरी आहे खूप खास

आयपीएलमध्ये आज वानखेडेच्या मैदानावर पंजाब किंग्जने 7 विकेट राखून मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. पण जरी मुंबईचा पराभव झाला असला तरी तो एकटाच पंजाबला भिडला होता. पंजाबला भिडणारा हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून क्विंटन डिकॉक आहे. कारण त्याने 112 धावांची नाबाद खेळी केली होती. दरम्यान या खेळाडूची लव्हस्टोरी देखील खास आहे. कारण तो चिअरलीडरच्या प्रेमात पडला होता. क्विंटन डिकॉक हा साऊथ आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू आहे.मैदानावर आपल्या स्फोटक फलंदाजीने आणि चौकार-षटकारांनी गोलंदाजांना धुणारा डी कॉक स्वतः एका चीअरलीडरच्या प्रेमात क्लिन बोल्ड झाला होता. हे फार कमी लोकांना माहीत आहे. क्विंटन डी कॉकच्या पत्नीचे नाव साशा हर्ली आहे. साशा पूर्वी आयपीएल चीअरलीडर होती. ते दोघे पहिल्यांदा 2012 च्या चॅम्पियन्स लीग टी20 सामन्यादरम्यान भेटले. त्यावेळी डी कॉक हायवेल्ड लायन्स संघाकडून खेळत होता. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात साशा हर्ली चीअरलीडर होती. याच सामन्यात डी कॉकने साशाला पहिल्यांदा पाहिले. मुंबई इंडियन्सविरुद्ध स्फोटक फलंदाजी करताना डी कॉकने दोन षटकार आणि सहा चौकारांसह ५१ धावा केल्या होत्या. डी कॉकच्या स्फोटक खेळीने साशा प्रभावित झाली आणि सामन्यानंतर त्याचे अभिनंदन करायला गेली. त्यानंतर लगेचच डी कॉकने फेसबुकवर मेसेज करून साशाच्या अभिनंदनाला प्रतिसाद दिला. डी कॉकने फेसबुकवर तिचे आभार मानले आणि यातूनच त्या दोघांमध्ये संभाषणाला सुरुवात झाली. हळूहळू ते चांगले मित्र बनले. डी कॉकने एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात अशा प्रकारे होईल याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. फेसबुकवर बराच वेळ बोलल्यानंतर, डी कॉकने हिंमत करून साशाकडे तिचा फोन नंबर मागितला, त्यानंतर ते फोनवर तासनतास बोलू लागले. यानंतर डी कॉक आणि साशा एकमेकांना डेट करू लागले. हे जोडपे नकळतपणे एकमेकांच्या प्रेमात पडले. तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर 2015 मध्ये डी कॉकने साशासोबत साखरपुडा केला. साखरपुड्याच्या वेळी डी कॉकने साशाला मर्सिडीज कार भेट दिली.साखरपुड्यानंतर एका वर्षाने, 2016 मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर लगेचच या जोडप्याला पहिले बाळ झाले. साशाने एका मुलीला जन्म दिला, जिचे नाव त्यांनी प्रेमाने कियारा ठेवले आहे. डी कॉक आणि साशाच्या मुलीचे नाव कियारा आहे. साशा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो चाहत्यांना खूप आवडतात. साशा नियमितपणे डी कॉक आणि तिच्या मुलीसोबतचे फोटो शेअर करते. ती अनेकदा मैदानावर क्विंटन डी कॉकला प्रोत्साहन देताना दिसली आहे.


Ajit Agarkar: २०२७ वर्ल्डकपआधी BCCI चा मास्टरस्ट्रोक; अजित आगरकरांबाबत मोठा निर्णय

BCCI Extended Contract Of Ajit Agarkar: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा कार्यकाळ बीसीसीआयने वाढवला आहे. २०२७ मधील वनडे वर्ल्डकपचे आव्हान लक्षात घेता त्यांना ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या कार्यकाळात भारताने टी-२० वर्ल्डकप २०२४, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि टी-२० वर्ल्डकप २०२६ अशा ३ आयसीसी ट्रॉफी जिंकल्या असून, अनेक धाडसी निर्णय त्यांच्या काळात घेण्यात आले आहेत.


ज्याला 1 रन करता आली नाही, त्यानेच अख्खी मॅच फिरवली, शेवटच्या 3 बॉलला सगळ्यांचा श्वास रोखला

आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 विकेटने पराभव केला आहे. दिल्लीच्या या विजयाचा शिल्पकार हा डेविड मिलर ठरला आहे. कारण त्याने शेवटच्या ओव्हरला सामना जिंकून दिला.[caption id="attachment_1668034" align="alignnone" width="1600"]" width="1600" height="900" /> रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 175 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने 19.5 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठत हा सामना 6 विकेटने जिंकला होता.[/caption] रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या 175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण पथून निसांका 1 धावावर बाद झाला होता. निसांका बाद झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारने सामन्याच्या तिसऱ्याच ओव्हरला करूण नायरला 5 तर समीर रिझ्वीला 2 धावांवर बाद केले होते. तीन विकेट पडल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स मैदानात आला होता. त्याच्यासोबत केएल राहुल मैदानात आला होता. यावेळी दोघांनी मिळून 69 धावांची पार्टनरशीप केली होती. त्यानंतर केएल राहुल 57 धावांवर बाद झाला होता. राहुल बाद झाल्यानंतर कॅप्टन अक्षर पटेल मैदानात आला होता. पण त्याच्या पायाला क्रॅम्प आल्यामुळे तो 25 धावा करून त्याने मैदान सोडलं होते.यावेळी डेविड मिलर मैदानात आला होता. त्यानंतर शेवटच्या ओव्हरला 6 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता होती.तेव्हा पहिल्या दोन बॉलला एक-एक धाव काढली गेली. त्यानंतर मिरलने तिसऱ्या आणि चौथ्या बॉलला लागोपाठ सिक्स ठोकले आणि नंतर एक चौकार खेचून दिल्लीला हा सामना 6 विकेटने जिंकून दिला होता. दरम्यान याच मिलरमुळे दिल्लीने तीन दिवसांपू्र्वी गुजरात विरूद्ध अवघ्या 1 धावांनी सामना हारला होता. त्या सामन्यात दिल्लीला 2 बॉल 2 धावा हव्या होत्या. मिलरने शेवटच्या पाचव्या बॉलला धाव काढलीच नाही. आणि नंतर सहाव्या बॉलला तो धाव काढायला गेला होता, पण एकही धाव न काढता कुलदीप रनआऊट झाला होता.त्यामुळे मिलरच्या चुकीमुळे दिल्लीने अवघ्या 1 धावांनी सामना हारला होता. आज त्याच डेविड मिलरने तीन बॉलमध्ये दोन षटकार आणि एक चौकार मारून दिल्लीला सामना जिंकुन दिला होता.[caption id="attachment_1670594" align="alignnone" width="1600"]" width="1600" height="900" /> दरम्यान फिल सॉल्टने केलेल्या 63 धावांच्या बळावर रॉयस चॅलेंजर्स बंगळुरून 8 विकेट गमावून 175 धावा ठोकल्या होत्या.[/caption]


Sunrisers Hyderabad : दोघं काय कमी होते, आता तिसरा आला! काव्याने आनंदात उड्या मारल्या पण ईशानला 'जोर का झटका'

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वात स्ट्रॉग कमबॅक करणारी टीम कोणती असेल तर ती सनरायझर्स हैदराबाद... पॅट कमिन्स उपलब्घ नसताना ईशान किशनच्या हातात ऐनवेळी कॅप्टन्सी सोपवली गेली. पाच मॅचमध्ये हैदराबादला फक्त दोनच मॅचमध्ये विजय मिळवता आलाय. हैदराबादने सलग दोन विजयानंतर आता कमबॅक केलं असून आज त्यांचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध असणार आहे. हैदराबादला दोन असे बॉलर मिळाले, ज्यांच्यामुळे ईशान किशनचं टेन्शन गेलं होतं. पण आता हैदराबादच्या अशा बॉलरने एन्ट्री केली आहे, ज्यामुळे ईशान किशनचं टेन्शन वाढलंय. हा तिसरा बॉलर इतर कुणी नसून पॅट कमिन्स आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार बॉलर पॅट कमिन्स याने भारतात पाऊल ठेवलं असून तो हैदराबादच्या स्कॉडसोबत सामील झाला आहे. तो आज मैदानात टीमसोबत दिसेल. पॅट कमिन्स याने आता आयपीएलमध्ये कमबॅक केल्याने ईशान किशन याची कॅप्टन्सी धोक्यात आली आहे. पॅट कमिन्स हैदराबादची धुरा सांभाळेल. मात्र आजच्या सामन्यात ईशानच कॅप्टन्सी करण्याची शक्यता आहे. पॅट कमिन्स आपल्या फॅमिलीसोबत काल रात्री हैदराबादमध्ये दाखल झाला. त्यामुळे आता काव्या मारनच्या आनंदाला उधाण आलं आहे. कॅप्टन परत आल्याने काव्याचं टेन्शन संपलं आहे. दरम्यान, पॅट कमिन्सला आता ईशान किशनच्या रणनितीने काही मॅच खेळावे लागणार आहे. हैदराबादचा फॉर्म परत येण्यासाठी ईशानने दोन अनकॅप भारतीय बॉलर खेळवले होते. त्यासह पॅटला जुळवून घ्यावं लागणार आहे.


मोईन अलीने आयपीएल का सोडली? पाकिस्तान लीगमध्ये का खेळतोय स्टार क्रिकेटर? स्वतः केला खुलासा

Moeen Ali IPL 2026 : इंग्लंडचा क्रिकेटर मोईन अली हा यंदा आयपीएलमध्ये खेळत नाहीये. सध्या मोईन अली हा पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतोय. तेव्हा आयपीएल सोडण्याचा निर्णय त्याने का घेतला याविषयी त्याने खुलासा केला आहे.


टॉसवेळी रवी शास्त्रींची मोठी चूक, सगळ्या गप्पा मारल्या पण महत्त्वाचा प्रश्नच विसरले

हैदराबादसाठी यंदाचा मोसम हा चढ-उतारांचा राहिला आहे. हैदराबादने आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये 2 विजय मिळवले आहेत तर 3 सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबाद 4 पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे चेन्नईने सुरूवातीचे तिन्ही सामने गमावल्यानंतर दिल्ली आणि केकेआरविरुद्ध त्यांचा विजय झाला. 5 सामन्यांमध्ये 2 विजय आणि 3 पराभवांसह सीएसकेच्या खात्यात 4 पॉईंट्स आहेत. टेबलमध्ये सीएसके आठव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात विजय झाला तर हैदराबाद पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर जाईल. तर चेन्नईने हा सामना जिंकला तर ते जास्तीत जास्त सातव्या क्रमांकापर्यंत पोहोचू शकतात. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टीमध्ये फार फरक पडणार नाही, पण त्यांना आम्ही फार रन करू देणार नाही, असं ऋतुराज म्हणाला आहे. टॉस पडल्यानंतर कॉमेंटेटर रवी शास्त्रींकडून मोठी चूक झाली. रवी शास्त्री यांनी ऋतुराज गायकवाडला सीएसकेच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल विचारलंच नाही. टॉस जिंकला असता तर आम्ही बॅटिंगच घेणार होतो, कारण आमची बॅटिंग मजबूत आहे. मोठा स्कोअर करण्यासाठी आम्ही मैदानात उतरू, असं इशान किशन म्हणाला आहे. हैदराबादने या सामन्यात एक बदल केला आहे, हर्ष दुबेऐवजी दिलशान मधुशंकाला संधी देण्यात आली आहे. हैदराबादची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, सलिल अरोरा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवांग कुमार, प्रफुल हिंगे, साकिब हुसैन, इशान मलिंगा सीएसकेची प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, डेवाल्ड ब्रेविस, जेमी ओव्हरटन, मॅथ्यू शॉर्ट, अंशुल कंबोज, नूर अहमद, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग


IND vs SA: शेवटी या २ चुकांमुळे सामना निसटला! हरमनप्रीतची झुंज व्यर्थ, दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय

India W vs South Africa W: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा विजय थोडक्यात निसटला. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.


मुंबईचा भिडू चेन्नईच्या ताफ्यात; खलील अहमदची रिप्लेसमेंट ठरली; हैदराबादविरुद्ध मॅचपूर्वी मोठा निर्णय

Chennai Super Kings IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये खलील अहमद हंगामातून बाहेर पडल्याने सीएसकेला मोठा धक्का बसला. आता, हंगामाच्या मध्यातून तो बाहेर पडल्यानंतर, सीएसके एका नवीन गोलंदाजाच्या शोधात आहे.


केकेआरचा IPLमधील पहिला विजय, राजस्थानचा 4 विकेटने पराभव; फिनिशर रिंकुचे दमदार अर्धशतक

KKR Win first Match Against Rajasthan Royals : आयपीएलमधील केकेआर संघाने आपल्या विजयाचा नारळ फोडला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा ४ विकेटने पराभव करत सामना खिशात घातला. रिंकू सिंह याने अर्धशतकी खेळी करत महत्त्वाची भूमिका बजावली.


Team India : श्रेयस अय्यर सूर्याची जागा घेणार; भारताचा कर्णधार बदलणार?

Shreyas Iyer and Surykumar Yadav: सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i टीम इंडियाने अद्याप एकही मालिका गमावलेली नाही. तसेच सूर्याने कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नात भारताला टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिलाय. मात्र सूर्याला फलंदाज म्हणून काही खास करता आलेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्याच्या कर्णधारपदावर टांगती तलवार आहे.


CSK Khaleel Ahmed replacement: मुंबईचा नेट बॉलर चेन्नईच्या जर्सीत; धोनीने गुपचुप बोलावलेला 'तो' खेळाडू नक्की कोण?

Akash Madhwal to replace Khaleel at CSK : चेन्नई सुपर किंग्सला खलील अहमद दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडल्याने मोठा धक्का बसला आहे.


Sachin Tendulkar: 'माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर कॅच...', श्रेयस म्हणाला 'कुणालाच कदर नाही', थेट क्रिकेटच्या देवाने लिहिली पोस्ट!

Sachin Tendulkar On Shreyas Iyer Catch : हार्दिकच्या हातातून बॅट सुटली अन् लॉग ऑनवर उभ्या असलेल्या श्रेयर अय्यरने डोळ्याची पापणी लवायच्या आत पळायला सुरूवात केली. श्वासातला श्वास घुटमळत असताना श्रेयसचे लक्ष्य फक्त बॉलवर केंद्रीत होते. हात अपोआप वर सरकला अन् कॅच मागे जातोय, याचा अंदाज श्रेयसला आला. त्यानं तातडीनं पाऊलं मागे घेतली अन् अफलातून मारुती उडी घेतली अन् बॉल हातात घेतला. संपूर्ण बॉडी हवेत अन् पाय टेकणार असं लक्षात येताच बॉल लगेच दुसऱ्या...


अवघड निर्णय घेण्याची वेळ? सलग चौथ्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याचे संकेत

पाच वेळच्या विजेत्या मुंबई संघाने यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामाची विजयासह सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर मुंबईला सलग चार सामन्यांत हार पत्करावी लागली आहे.


आर. वैशाली... प्रज्ञानंदची बहीण ते जगज्जेतेपदासाठीची आव्हानवीर!

आर. वैशाली आता फक्त प्रज्ञानंदची बहीण नाही, तर जगज्जेतेपदाच्या दारात उभी असलेली भारताची नवी आशा आहे.


24 तासांत दुपटीने वाढली हैदराबादची ताकद! पॅट कमिन्सचं भारतात लँडिंग अन् काव्याने फिरवला फोन अन् मागवली 'स्पीडगन'

IPL 2026 Sunrisers Hyderabad : आयपीएल 2026 मध्ये आज डबल हेडल सामना खेळवला जाणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या महत्त्वाच्या लढतीपूर्वी हैदराबादच्या संघाला 24 तासात दोन गुड न्यूज मिळाल्या आहेत. हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स हा भारतात पोहोचला असून तो लवकरच स्कॉड जॉईंड करेल. तर पॅट कमिन्स हैद राबादमध्ये पाऊल ठेवताच काव्या मारनने मोठा निर्णय घेतला आहे.गेराल्ड कोएत्जी आता 'ऑरेंज आर्मी'चा भाग...


आरसीबीच्या सामन्यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार, कँटिनमध्ये काम करणाऱ्यावर खळबळजनक आरोप

आयपीएल 2026 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामन्यानंतर या स्पर्धेत उलथापालथ होताना दिसत आहे. आरसीबीने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. पण आरसीबी चाहत्यांची लाखो रूपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. चला जाणून घेऊयात काय झालं ते...


केकेआरच्या सलग पाचव्या पराभवानंतरही अजिंक्य रहाणेला चूक मान्य नाही; मॅचनंतर भलतीच कारणं दिली

Ajinkya Rahane On GT vs KKR Match: गुजरात टायटन्सने या हंगामाची सुरुवात सलग दोन पराभवांनी केली, परंतु त्यानंतर त्यांनी पुढच्या तीन सामन्यांमध्ये प्रभावी विजय नोंदवले आहेत. त्यामुळे ते आता गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचले आहेत.


Rohit Sharma : 'क्या बोल रहा है यार...', बुमराहला झापलं, हार्दिकच्या कॅप्टन्सीवर संतापला रोहित शर्मा! पाहा video

IPL 2026, MI vs PBKS : आयपीएल 2026 मध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबई इंडियन्सची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाल्याचं पहायला मिळतंय. पहिल्या पाच मॅचनंतर मुंबई इंडियन्सची गाडी पहिल्याच मॅचवर अडकली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील या टीमला सलग 4 मॅचेसमध्ये पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे टीमची गाडी रुळावरून पूर्णपणे घसरल्याचं चित्र पहायला मिळतंय. मुंबईच्या या खराब कामगिरीनंतर माजी भारतीय क्रिकेटर मनोज तिवारी याने आक्रमक पवित्रा घेत...


विश्लेषण : पुरुष फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी प्रथमच महिला! जर्मनीतील निर्णयाचे पडसाद जगभर उमटणार?

जगभरातील ८६ महिला लीगमध्ये २२ टक्के मुख्य प्रशिक्षक महिला आहेत. परंतु पुरुष संघांच्या बाबतीत हे प्रमाण अजूनही कमीच आहे.


Jasprit Bumrah : बुमराह हिरोचा झीरो का झाला? त्याची गोलंदाजी का चालत नाहीय? त्यामागचं खरं कारण आलं समोर

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा, मुंबई इंडियन्सचा हिरो गोलंदाज आहे. पण बुमराह आता हिरोचा झीरो झालाय. त्याला एक विकेट मिळत नाहीय. बुमराहवर अशी वेळ का आलीय? त्यामागची कारणं काय आहेत? समजून घ्या.


चेन्नईसाठी हैदराबादचा मॅचविनर ठरला व्हिलन; हातातली मॅच गमावल्यावर कॅप्टन ऋतुराज गायकवाडने सांगितला टर्निंग पॉइंट

Ruturaj Gaikwad News : गेले दोन सामने जिंकत चेन्नई सुपर किंग्ज संघ रूळावर परतला होता. मात्र सनरायजर्स हैदराबादसमोर त्यांची गाडी रूळावरून घसरली. चेन्नईचा या सामन्यामध्ये १० धावांनी पराभव झाला. पराभवानंतर कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने सामना कुठे फिरला हे सांगितलं आहे.


Hardik Pandya : 'हार्दिकला आराम द्या, रोहितला कॅप्टन्सी सोपवा...', गंभीरच्या दुश्मनाने केली पंड्याच्या कॅप्टन्सीची पोलखोल!

Hardik Pandya MI Captaincy : आम्हाला आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं म्हणत सलग चौथ्या पराभवानंतर हार्दिक पंड्याने संताप व्यक्त केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज वानखेडेवर मुंबई इंडियन्सला भिडली अन् दमदार विजय नोंदवला आहे. श्रेयसच्या कॅप्टन्सीखाली पंजाबने चौथा विजय नोंदवला असून आला मुंबईच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतायेत. तर हार्दिक पंड्या देखील नाराज दिसून आला होता. त्यावर बोलताना गौतम गंभीरच्या दुश्मनाने पंड्याच्या...


आशिष नेहरा एका जागेवर बसूच शकत नाही; हरभजन सिंगने सांगितली चॅम्पियन कोचची दुसरी बाजू

Harbhajan Singh News : माजी खेळाडू आणि समालोचक हरभजन सिंग याने कोच आशिष नेहरा याचे कौतुक केले आहे. हरभजन सिंग याने आशिषची दुसरी बाजू सांगितली आहे. नेमकं तो का म्हणाला जाणून घ्या.


मुंबईच्या खेळाडूंना मिळणार पगार, देशातील पहिली क्रिकेट संघटना; 8 ते 20 लाखांपर्यंत असणार रक्कम, तीन गटात वर्गवारी जाणून घ्या

Mumbai Cricket News : मुंबईतील खेळाडूंसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट अध्यक्षांनी मोठी घोषणा केली आहे. ज्यामध्ये आता मुंबईकडून खेळणाऱ्या खेळाडूंना वार्षिक पगार मिळणार असून असा निर्णय घेणारी मुंबई देशातील पहिली संघटना आहे. नेमकी वर्गवारी कशाप्रकारे असणार जाणून घ्या.


मी खूप नाराज आहे गुजरातच्या विजयानंतरही शुभमन गिल नाखुश; मॅचनंतर खंत बोलून दाखवली

Shubman Gill On GT Won Against KKR: गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला असून त्यात विजय गुजरातचा झाला. यानंतरही कर्णधार गिल संघावर नाराज दिसला.


Shreyas Iyer: पंजाबचा संघ असं काय वेगळं करतोय? सलग ४ विजयानंतर श्रेयसने सांगितला ‘सक्सेस फॉर्म्युला’

Shreyas Iyer On Punjab Kings: पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. या विजयानंतर श्रेयस अय्यरने पंजाब किंग्जच्या विजयाचा फॉर्म्युला सांगितला आहे.


MI vs PBKS : 'आता माझ्याकडे बोलण्यासारखं काही उरलेलं नाही, कारण..' पराभवानंतर मनातून कोसळलेल्या हार्दिक पंड्याचे शब्द

MI vs PBKS : काल मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये सलग चौथा पराभव झाला. पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सची अशी हालत पाहून चाहत्यांना दु:ख होत आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या सुद्धा संघाच्या या कामगिरीने निराश झाला आहे. त्याचे शब्दच सर्वकाही सांगून गेले.


विकेट मिळत नसल्याने चालू सामन्यात बुमराह वैतागला; व्हिडिओ जोरदार व्हायरल

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला या हंगामात अजूनपर्यंत एकही विकेट मिळालेली नाही. त्याला अजूनही हवी तशी कामगिरी करता आली नसल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता बुमराहचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात तो वैतागलेला दिसत आहे.


Ajinkya Rahane : कॅमरून ग्रीनला ओव्हर का दिली नाही? अजिंक्य रहाणेने सांगितली 25 कोटीच्या प्लेयरची रिअ‍ॅलिटी

जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने घडत नसतात, तेव्हा तुम्ही खूप जास्त विचार करता. अशा वेळी वर्तमानात राहणं महत्त्वाचं आहे. आम्ही मैदानावर जाऊन खेळाचा आनंद घेण्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यावर भर देणार आहोत, असंही रहाणे म्हणाला. ज्या गोष्टी आमच्या नियंत्रणात नाहीत, त्यांचा विचार करण्यापेक्षा संघ म्हणून एकत्र खेळणं महत्त्वाचं आहे. मैदानावर उतरल्यावर पहिल्या बॉलपासून आक्रमक आणि सकारात्मक राहण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं म्हणत रहाणेने आगामी रणनिती देखील सांगितली. सलग 3 मॅचेस अगदी जवळ येऊन गमावल्या असल्यामुळे कॅमरून ग्रीनवर प्रेशर होतं. तो दबावाखाली होता, पण ज्या प्रकारे परिस्थिती सांभाळली. त्याने विरोधी टीमवर हल्लाबोल केला. हे पाहणं खरोखर अप्रतिम होतं, असंही रहाणे म्हणाला. मॅचमध्ये कॅमेरून ग्रीनने चांगली बॅटिंग केली आणि फिल्डिंगमध्ये देखील त्याने अफलातून कॅच घेतला पण त्याचा दिवस असताना त्याला बॉलिंग का दिली नाही, याचं कारणही अजिंक्य रहाणे याने स्पष्ट केलं. ग्रीनला क्रॅम्प्सचा त्रास होत असल्यानं तो मैदानात आत-बाहेर करत होता. त्याला सातत्याने मैदानात थांबता येत नव्हतं. खूप उष्णता होती. बॅटिंगनंतर क्रॅम्पचा त्रास झाला आणि त्यामुळेच त्याने बॉलिंग केली नाही, असंही रहाणे यावेळी स्पष्ट म्हणाला.


लोकांना तुमच्याकडून अपेक्षा नसणे काही वेळा फायद्याचेच! ‘कँडिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धा विजेत्या वैशालीचे मत

लोकांना तुमच्याकडून अपेक्षा नसणे काही वेळा फायद्याचेच ठरते. तुमच्यावर कोणतेही दडपण नसते, त्यामुळे तुम्ही मोकळेपणाने तुमचा नैसर्गिक खेळ करू शकता, असे मत ‘कँडिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धा विजेती भारताची ग्रँडमास्टर आर. वैशालीने व्यक्त केले.


KKR qualification scenario: लागोपाठ ५ सामने गमावले, पण KKR कडे अजूनही प्लेऑफ गाठण्याची संधी! करावं लागेल ‘हे’ काम

Kolkata knight Riders Qualification Scenario: आयपीएल २०२६ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघ अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतों. जाणून घ्या कसं असेल समीकरण.


Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या भारतीय संघातील पदार्पणाबाबत आली मोठी अपडेट, निवडकर्त्यांसमोर कठीण पेच; सूर्यावर टांगती तलवार

Vaibhav Suryavanshi Team India Debut Update: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी भारतीय संघात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. आयर्लंड दौऱ्यादरम्यान तो पहिल्यांदाच टी-20 संघाची जर्सी घालून मैदानात उतरू शकतो. परंतु त्याच्या निवडीमुळे निवडकर्त्यांसमोर एक नवीन डोकेदुखी निर्माण झाली आहे.


IPL 2026 च्या points table मध्ये उलटफेर! पराभवानंतरही चेन्नईला एका रँकिंगचा फायदा, पण अचानक असं कसं झालं?

हैदराबादविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जला जिंकता आलं नाही. कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली हा चौथा पराभव होता. मात्र, मॅच गमावल्यानंतर ऋतुराजला देखील आश्चर्यचा धक्का बसला. पराभवानंतरही पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची सुधारणा झाली आहे. मॅचपूर्वी आठव्या क्रमांकावर असलेला चेन्नईचा संघ आता सातव्या स्थानावर पोहोचला. पराभवानंतर बहुतांशवेळा एखाद्या टीमची रँकिंग घसरते पण चेन्नईला फायदा झाला. ही दुर्मिळ अशी घटना, कशी घडली? असा सवाल विचारला जातोय. तर, नेट रन रेटमुळे (NRR) हा दुर्मिळ बदल पाहायला मिळाला आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी चेन्नईचा संघ 4 पॉईंट्स आणि-0.846 अशा नेट रन रेटसह आठव्या क्रमांकावर होता. हैदराबादविरुद्धचा सामना केवळ 10 रन्सनी हरल्यामुळे चेन्नईचा रन रेट सुधारून तो -0.780 इतका झाला. यामुळे त्यांनी लखनऊ सुपर जायंट्सला मागे टाकले आहे. लखनऊचे देखील 4 पॉईंट्स असून त्यांचा रन रेट -0.804 असा असल्याने ते आता आठव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादला देखील विजयानंतर फायदा झाला आहे. सनरायझर्स हैदराबाद आता पाईंट्स टेबलमध्ये 6 अंकासह चौथ्या स्थानी पोहोचली आहे. त्याचबरोबर एकही पराभव न झालेली पंजाब किंग्ज पाईंट्स टेबलच्या टॉपवर आहे. त्याने पाच पैकी चार सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.


सिंदारोवने गुकेशला नमवल्यास कार्लसनच्या पुनरागमनाची शक्यता; जगज्जेतेपदाच्या लढतीबाबत कास्पारोवचे मत

सायप्रस येथे नुकत्याच झालेल्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत सिंदारोवने प्रतिस्पध्र्यांवर वर्चस्व गाजवले. त्याने एकही सामना न गमावता या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि जगज्जेतेपदासाठी गुकेशला आव्हान देण्याची संधी मिळवली.


बीसीसीआयकडून राजस्थान रॉयल्सचा मॅनेजर रोमी भिंदरवर कारवाई, वैभव सूर्यवंशीबाबतही महत्त्वाची अपडेट समोर

Romi Bhinder Fined : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या सामन्यादरम्यान डगआऊटमध्ये फोन वापरल्याबद्दल बीसीसीआयने राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.


T20 World Cup 2026 मध्ये मॅच फिक्सिंग? हा सामना रडारवर, ICC ॲक्शन मोडवर

ICC T20 World Cup 2026 मधील या सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. सामना कोण जिंकणार हे अगोदरच निश्चित झाल्याचा आरोप होत असल्याने ICC ॲक्शन मोडवर आली आहे. काय आहे हे प्रकरण?