गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींनी घटस्फोट घेतला आहे. या यादीत हार्दिक पांड्या, मोहम्मद शामी, शिखर धवन यांसारख्या क्रिकेटपटूंच्या नावांचाही समावेश आहे. दरम्यान टीम इंडियाचा युवा ऑफ स्पिनर युझवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. युझवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काडीमोड झाल्याची माहिती समोर येत आहे.
क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दोघांमध्ये वाद सुरू असून दोघंही घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा रंगल्या आहेत. लग्नाच्या 4 वर्षात दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली आहे. 2020 मध्ये युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने लग्नगाठ बांधली होती. आता लग्नाला 4 वर्ष झाली तर दोघांमध्ये भांडणं सुरू झाली आहे. दोघांनी इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केलं आहे.
दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यापासून आणि घटस्फोटाच्या अफवा रंगल्यापासून युझी क्रिप्टिक पोस्ट शेअर करत आहे. त्यामुळे या घटस्फोटाच्या चर्चेना आणखी हवा मिळत आहे. दोघांमध्ये खटके उडाल्याची माहिती मिळताच फॅन्सना चिंता लागून राहिलीये.
अशातच आता धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली असून या प्रकरणावर तिचं मत मांडलं आहे. तिने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे, “गेले काही दिवस माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूप कठीण गेले आहेत. खरंतर अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे वस्तुस्थिती न तपासता केलेले निराधार लिखाण आणि द्वेष पसरवणाऱ्या फेसलेस ट्रोलद्वारे माझ्या प्रतिष्ठेचे चारित्र्यहनन. माझे नाव आणि यश कमावण्यासाठी करण्यासाठी मी अनेक वर्षे कठोर परिश्रम केले आहेत. माझे मौन दुर्बलतेचे नाही, तर ताकदीचे लक्षण आहे. नकारात्मकता ऑनलाइन सहज पसरत असताना, इतरांना आधार देण्यासाठी धैर्य आणि करुणा लागते. मी माझ्या सत्यावर लक्ष केंद्रित करून, माझ्या मूल्यांना धरून पुढे जाण्याचा निश्चय केला आहे. सत्याला कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नसते.”
घटस्फोटाच्या या चर्चेदरम्यान धनश्री वर्मा लोकप्रिय कोरिओग्राफर प्रतीक उतेकरला डेट करत आहे असं म्हटलं जात आहे. धनश्री आणि प्रतीकचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अफवा सुरू झाल्या आहेत.
2025-01-08T16:51:45Z