मुंबई : बीसीसीआयने मुंबईत आयोजित केलेल्या नमन पुरस्कार सोहळ्यात भारतीय क्रिकेटपटूंचा सन्मान केला आहे. या सोहळ्याला अनेक भारतीय क्रिकेटपटूंना आमंत्रित करण्यात आले होतं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन या सारखे दिग्गज क्रिकेटपटू यात सहभागी झाले होते. या सोहळ्यात सचिन तेंडुलकरला कर्नल सीके नायडू जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर जसप्रीत बुमराहला सर्वोत्कृष्ट मुख्य आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून सन्मानित करण्यात आलं.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही बोर्डाकडून विशेष पुरस्कार मिळाला होता. अनेक महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पुरस्कार दीप्ती शर्माला देण्यात आला.