Yuzvendra Chahal : चहलच्या कथित गर्लफ्रेंडचा धनश्रीला टोमणा,तो कसाही असला तरी...
टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट होणार आहे. या घटस्फोटावर उद्या कोर्टातून निर्णय येणार आहे. या दरम्यान युझवेंद्र चहलने धनश्री वर्माला 4.75 कोटी रुपये देण्यास सहमती दर्शविली आहे.बुधवारी बार अँड बेंचने अहवाल दिला की संमतीच्या अटीनुसार, चहलने वर्मा यांना 4.75 कोटी रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्यास सहमती दर्शविली आहे. यानंतर आता चहलसोबत डेटिंगची चर्चा असलेल्या आरजे महावशने धनश्री वर्माला टोमणा मारला आहे. त्यामुळेआरजे महावशची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. आरजे महावशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, तुम्हाला जी व्यक्ती आवडते, त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करा. ती व्यक्ती कशीही असो, पण तुम्हाला ती व्यक्ती आवडते ना, मग तिचा स्वीकार करा. बाकीची लोकं काय करतात, या गोष्टीशी आपल्या आवडत्या व्यक्तीची तुलना करू नका. कारण लोकांना जे करायचं आहे ते त्या व्यक्ती करतील, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, ते तुम्ही ठरवा. कारण तुमची आवडती व्यक्ती तुमच्याबरोबर असणं, हे सर्वात महत्वाचं आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला कधीही फसवू नका, कारण त्यावेळी तुम्ही केलेल्या त्या कृतीची सल तुम्हाला आयुष्यभर बोचत राहील. कोणत्या व्यक्तीला डेट करायचं आहे, ते तुम्ही ठरवा. बाकी लोकांना काय करायचं आहे, ते ते लोकं ठरवतील. आरजे महावशने धनश्री वर्माच नाव घेता तिच्यावर जोरदार टीका केली आहे. या टीकेवर आता धनश्री काय उत्तर देते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
2025-03-19T16:59:06Z
RCB चे 83 कोटी पाण्यात...'या' तीन चूका अन् ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ कायम राहणार
येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2025 ला सुरूवात होणार आहे. पहिला सामना हा कोलकत्ता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरू या दोन संघात रंगणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे. आयपीएलचे आतापर्यंत 17 सीझन पार पडले आहेत. यंदाचा आयपीएलचा 18 वा सीझन आहे. या काळात रॉयल चँलेजर्स बंगळुरुला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही आहे. यंदाच्या वर्षी ट्रॉफीवर नाव कोरण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.पण हे कितपत शक्य आहे? हे जाणून घेऊयात. आरसीबीकडे जोश हेझलवूड व्यतिरिक्त नुवान तुषारा, रोमारियो शेफर्ड आणि लुंगी एनगिडी हे परदेशी वेगवान गोलंदाज आहेत. पण या तिन्ही खेळाडूंचा प्रभाव जोश हेझलवूडसारखा नाही. हेझलवूड स्वतःच्या बळावर आरसीबीला सामना जिंकवून देऊ शकतो. पण या तीन खेळाडूंबद्दल हे सांगणे कठीण होईल. आरसीबीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत कृणाल पंड्या हे एक मोठे नाव आहे. जो फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही खळबळ माजवू शकतो. पण या व्यतिरिक्त आरसीबीकडे दोन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू नाही. ही आरसीबीची सर्वात मोठी कमजोरी आहे. बंगळुरूकडे कृणाल पंड्याशिवाय दुसरा कोणताही चांगला भारतीय अष्टपैलू खेळाडू नाही. तिसरी गोष्ट म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात एकही चांगला फिरकी गोलंदाज नाही. फक्त एकच प्रसिद्ध फिरकी गोलंदाज आहे, सुयश शर्मा. तथापि, त्यालाही फारसा अनुभव नाही. आयपीएलमध्ये फिरकीपटूंची भूमिका मोठी असते. चांगला फिरकी गोलंदाज नसणे हा बेंगळुरूसाठी चिंतेचा विषय असू शकतो. मेगा लिलावात आरसीबीने आपली नवीन टीम तयार केली आणि 82.25 कोटी रुपये खर्च केले.त्यामुळे आरसीबीने जर संघ निवडीत या चूका केल्या असतील तर त्यांचे 82.25 कोटी पाण्यात जाण्याची शक्यता आहे. RCB चा संपूर्ण संघ : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेजलवूड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसीख दार, सुयश शर्मा, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्निल सिंग, टिम डेविड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भांडगे, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक छिक्कारा, लुंगी एन्गिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
2025-03-19T13:59:09Z