ANDRE RUSSELL IPL RETIREMENT: आंद्रे रसेलची तडकाफडकी निवृत्ती, IPL लिलावापूर्वी चाहत्यांना मोठा धक्का
Andre Russell Retirement from IPL: कोलकाता नाईट रायडर्सचा दिग्गज आणि दोन वेळा आयपीएल चॅम्पियन आंद्रे रसेलने आयपीएल लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का आहे. रसेलने त्याच्या निवृत्तीची माहिती देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
आंद्रे रसेलने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. केकेआरने आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी त्याला सोडल्यानंतर रसेलने हा निर्णय घेतला. आंद्रे रसेलने आयपीएलमधून खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली आहे, परंतु निवृत्तीची घोषणा करताना त्याने असेही म्हटले आहे की तो पुढील हंगामात सपोर्ट स्टाफ सदस्य म्हणून आयपीएलमध्ये दिसेल.
हे पण वाचा : IPL 2026 MI Retained and Released Players: रिलीज अन् रिटेन नंतर अशी आहे मुंबई इंडियन्स, पाहा टीममध्ये कोण-कोण
आंद्रे रसेलची सोशल मीडियावर पोस्ट
आंद्रे रसेलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, "मी आयपीएलला निरोप देत आहे, पण या रंगाला नाही. आयपीएलमध्ये हा किती अद्भुत प्रवास होता. 12 वर्षांच्या आठवणी आणि केकेआर कुटुंबाकडून खूप प्रेम मिळाले. मी अजूनही जगभरातील इतर क्रिकेट लीगमध्ये सिक्सर मारत राहीन आणि विकेट घेत राहीन. तुम्हाला माहिती आहे का, सर्वोत्तम भाग काय आहे? मी घर सोडत नाहीये. तुम्ही मला केकेआर सपोर्ट स्टाफमध्ये एका नवीन भूमिकेत पहाल. आयपीएल 2026 मध्ये, मी पॉवर कोच म्हणून परत येईन. एक नवीन अध्याय, पण त्याच उर्जेसह."
आंद्रे रसेलचे आयपीएलमधील करिअर
आंद्रे रसेलने 2012 मध्ये आयपीएल खेळण्यास सुरवुवात केली. त्याने दोन सीझन दिल्ली डेअरडेविल्ससोबत खेळले आणि त्यानंतर केकेआरने त्याला खरेदी केलं. तब्बल 12 वर्षे तो केकेआरसोबत होता आणि आता त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. या दरम्यान आंद्रे रसेलने आयपीएलमध्ये अनेक मॅच विनिंग इनिंग््स खेळल्या आहेत.
- मॅच - 140
- इनिंग्स - 115
- रन्स - 2651
- सर्वोच्च स्कोअर - 88*
- अॅव्हरेज - 28.2
- स्ट्राईक रेट - 174.17
- हाफसेंच्युरी - 12
- फोर - 186
- सिक्सर - 223
2025-11-30T10:52:21Z