Virat-Anushka Award VIDEO: बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्या मिश्रणाचं फेवरेट कपल म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma). नुकतंच विराट आणि अनुष्का इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 च्या शोमध्ये दिसले होते. मुंबईमध्ये हा खास शो आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या शोमध्ये किंग कोहली त्याच्या पत्नीला असं काही बोलून गेला ज्यामुळे एकच चर्चा झाली. यानंतर त्यांच्यामध्ये झालेलं गमतीशीर भांडणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
मुंबईमध्ये पार पडलेल्या या इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 शोमध्ये रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, अजय देवगन, नीरज चोपड़ा आणि शुभमन गिल हे सेलिब्रिटी आणि खेळाडू सहभागी झाले होते. दरम्यान या शोमध्ये विराट कोहलीने अनुष्का शर्माला मोटी म्हणजेच जाडी म्हटलं.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 या शोमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले. अनेक सेलिब्रिटी असताना देखील विराट-अनुष्काच्या जोडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विराट कोहली ब्लॅक कलरच्या सूटमध्ये दिसतोय. तर त्याची पत्नी अनुष्का जांभळ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये दिसतेय. दरम्यान या कार्यक्रमानंतर बोलताना कोहलीने अनुष्काला मोटी म्हणजेच जाडी म्हटलं आहे.
विराटच्या या कमेंटनंतर अनुष्का स्वतःही आश्चर्यचकित झालेली दिसली. इतकंच नव्हे तर तिने पत्रकाराला देखील विचारलं की, मी खरोखरच जाड झाली आहे का? या दोघांच्याही गमतीशीर भांडणाचा व्हिडीओ चाहत्यांना मात्र फारच आवडला आहे.
लवकरच अनुष्का शर्माचा एक नवा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. भारताची माजी महिला वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित सिनेमामध्ये अनुष्का शर्मा दिसणार आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अनुष्का शर्मा सिनेमामध्ये दिसून येणार आहे. यासाठी सिनेमासाठी अनुष्का शर्माने महिने क्रिकेटचा सरावही केला आहे. इतकंच नाही तर जिममध्येही तिने भरपूर मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालं असून लवकरच त्याचा प्रिमियर होणार आहे.
2023-03-25T14:06:33Z dg43tfdfdgfd