BB फार्मचा कारभार स्पर्धकांच्या हाती, मात्र दोन्ही टीममधील भांडणच संपेना!

मुंबई : 'बिग बॉस मराठी 5' चा कल्ला यंदा खूप पाहायला मिळतोय. सोशल मीडियावरही बिग बॉसची खूप चर्चा पाहायला मिळतेय. यंदाच्या सीझनला स्पर्धकांना नवे इंटरेस्टिंग टास्कही दिले जात आहेत. अशातच आज सदस्यांना अवघड टास्क दिलं जाणार आहे. त्यांना बिग बॉस फार्माचा कारभार सांभाळावा लागणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना दिसत आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना दिसत आहेत. वैभव, अरबाज, सूरज, जान्हवी, घन:श्याम, निक्की, आर्यासह अनेक सदस्य आक्रमकपणे टास्क खेळत आहे. त्यांचा आक्रमकपणा पाहून बिग बॉस सदस्यांना चांगलीच शिक्षा सुनावणार आहेत. प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत, "आक्रमकतेची शिक्षा म्हणून दोन्ही टीममधील एका सदस्याला बाद करण्यात येत आहे".

Janhvi Killekar : नवऱ्यानंतर जान्हवीच्या सपोर्टसाठी उतरल्या 'जाऊबाई', म्हणाली, "तिच्यासोबत हे..."

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या टास्कमधून दोन्ही टीममधले कोणते सदस्य बाद होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना पाहून प्रेक्षकांचं मात्र चांगलंच मनोरंजन होणार आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठी 5 सीझन दिवसेंदिवस रंगतदार होताना दिसतोय. स्पर्धकांमध्येही सतत वाद, भांडण, मैत्री पाहायला मिळतेय. त्यामुळे आता प्रेक्षकही स्पर्धकांना चांगलेच जज करत असतात. यामध्ये काहींचं कौतुक करतात तर काहींना ट्रोल करतात.

2024-09-03T11:57:49Z dg43tfdfdgfd