ICC Champions Trophy 2025 : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला सर्वात जास्त कमतरता भासत होती ती मोहम्मद शमीची... शमी फिट नसल्याने जसप्रीत बुमराहवर संपूर्ण टीम इंडियाचा लोड होता. अशातच आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला सर्वात आनंदाची बातमी मिळाली आहे. मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध असणार आहे. स्वत: शमीने व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली.
मोहम्मद शमीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये तो भेदक गोलंदाजीचा सराव करताना दिसतोय. अचूकता, वेग आणि उत्कटता, सर्व जगाला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे, असं कॅप्शन मोहम्मद शमीने शेअर केलं आहे.
दरम्यान, घोट्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर शमीने रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्तक अली टी-ट्वेंटी आणि विजय हजारे वनडे या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. अशातच आता इंग्लंड दौऱ्यासाठी शमीला संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
2025-01-07T12:06:10Z