Google Doodle Today: 28 ऑगस्ट पासून पॅरालंपिकची सुरुवात झाली आहे. ऑलंपिक 2024 च्या की मेजबानी नंतर पॅरिसनं पॅरालंपिकचं देखील आयोजन केलं आहे. या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. पॅरिस पॅरालंपिकच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघातील 100 पेक्षा जास्त सदस्यांनी सहभाग घेतला होता. यात 52 खेळाडूंचा समावेश आहेत.
आज Paralympics मध्ये Wheelchair Tennis ची स्पर्ध आहे. यासाठी गुगलने डूडल बनवलं आहे. या डुडलमध्ये एक निळा आणि एक करड्या रंगाचा पक्षी टेनिस खेळताना दिसत आहेत. हे दोन्ही पक्षी व्हीलचेअरवर आहेत. तर इतर पक्षी बाजूला उभे राहून या खेळाचा आनंद घेत आहेत. गंमत म्हणजे या डुडलमध्ये पक्षांच्या हातात चमचे रॅकेट म्हणून देण्यात आले आहेत, गार्डन फेंस नेट तर अकॉर्न नटचा वापर बॉल म्हणून केला जात आहे, जो शेवटी प्रेक्षकांमध्ये असलेल्या पक्ष्याच्या डोक्यावर पडतो.
व्हीलचेअर टेनिसची सुरुवात युनायटेड स्टेट्सच्या फ्री स्टाईल स्की प्लेयर ब्रॅड पार्क्स यांनी 1976 यांनी केली होती.
त्यानंतर हा खेळ वाढला आणि 1980 च्या दशकात फ्रांस हा युरोपमधील पहिला देश बनला ज्याने व्हीलचेअर टेनिससाठी खास प्रोग्रॅम सुरु केला. 1992 मध्ये बार्सेलोना येथे झालेल्या पॅरालिंपिक्स मध्ये या खेळाचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला. आजच्या घडीला व्हीलचेअर टेनिस जगातील सर्वात वेगाने वाढणारा व्हीलचेअर खेळ आहे आणि दिव्यांगांचा यातील रस वाढत आहे.
या खेळात स्पर्धक 3 फुट उंच जाळीवरून टेनिस बॉलने टेनिस खेळतात. इथे सामान्य टेनिसचे सर्व नियम लागू होतात. विशेष म्हणजे कोर्ट, रॅकेट किंवा टेनिस बॉलच्या आकारात कोणताही बदल केला जात नाही. फक्त एक मोठा फरक आहे तो म्हणजे “डबल बाउंस रुल” ज्यामुळे बॉलला मारण्यापूर्वी तो दोन वेळा बाउंस होऊ शकतो.
तीन कॅटेगरीमध्ये खेळाडू सहभागी होऊ शकतात, ज्यात पुरुष, महिला आणि आणि क्वॉड्स, या कॅटेगरीमध्ये सिंगल्स आणि डबल्स असे स्पर्धा प्रकार देखील असतात.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-09-03T05:15:24Z dg43tfdfdgfd