HARDIK PANDYA FINED : वेदनादायक पराभवानंतर हार्दिक पंड्याला 24 लाखांचा दंड, BCCI ची कारवाई

मुंबई : गुजरात टायटन्सकडून शेवटच्या चेंडूवर झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला मोठा धक्का बसला. पावसामुळे व्यत्यय आलेला सामना मुंबईने शेवटच्या चेंडूवर गमावला. या सामन्यातील पराभवानंतर, बीसीसीआयने हार्दिकच्या संघाला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावला. फक्त हार्दिकच नाही तर त्याची संपूर्ण टीमला कारवाईचा दणका बसला आहे.

खरं तर, एमआयने 147 धावांचा बचाव करताना (डीएलएसनुसार सुधारित लक्ष्य), निर्धारित वेळेत संपूर्ण षटकांचा कोटा पूर्ण केला नाही. या चुकीबद्दल, बीसीसीआयने एमआयला स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरवले. यासह त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्याला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला. चालू हंगामात मुंबई संघाने दुस-यांदा स्लो ओव्हर रेटची चूक केली आहे.

IPL 2025 Uncapped Player : 4 कोटींच्या अनकॅप्ड फलंदाजाने IPLमध्ये घातला धुमाकूळ, टीम इंडियासाठी ठोकली दावेदारी

बीसीसीआयच्या निवेदनानुसार, पंड्याच्या संघाने या हंगामात दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटची चूक केली आहे. त्यामुळे आयपीएलच्या आचारसंहितेनुसार पंड्यावर 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, प्लेइंग-11 मधील इतर खेळाडूंवर, इम्पॅक्ट प्लेयर आणि कनकशन सब्स्टीट्यूट खेळाडूंवर प्रत्येकी 6 लाख रुपये आणि मॅच फीच्या 25 टक्के दंड आकारण्यात आला आहे.

IPL 2026 च्या हंगामात CSKची होणार गोची! आयुष, ब्रेव्हिस, पटेलला खेळवण्यासाठी करावी लागणार कसरत

गुजरातने जिंकला सामना

मंगळवारी (दि. 6) रात्री आयपीएल 2025 मध्ये एक रोमांचक सामना पार पडला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सला धूळ चारली. पावसामुळे सामन्यात दोनदा व्यत्यय आला. त्यामुळे गुजरातसाठी सुधारित लक्ष्य आणखी कठीण झाले. गुजरातचा संघ डकवर्थ लुईसच्या नियमानुसार स्कोअरमध्ये मागे होता. पण दीर्घ प्रतीक्षेनंतर जीटीने एक रोमांचक विजय मिळाला.

Virat Kohli RCB Podcast: ‘आनंदी राहण्यासाठी टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले’, कोहलीने सोडले मौन; पॉडकास्टमध्ये केले गुपित उघड

सामना 19 षटकांचा

पावसामुळे 19 षटकांत 147 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. गुजरातला शेवटच्या 6 चेंडूत 15 धावांची आवश्यकता होती. राहुल तेवतिया आणि जेराल्ड कोएत्झी क्रीजवर होते. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने शेवटचा षटक दीपक चहरला दिला. पण चहर दबावाखाली डगमगला. पहिल्याच चेंडूवर तेवतियाने चौकार मारला.

2025-05-07T09:22:11Z