बातम्या

Trending:


'इतिहास तुला नेहमीच...' चीफ सिलेक्टर पदावरून दूर झालेल्या अजित आगरकरबाबत काय म्हणाला गौतम गंभीर? पोस्ट करून व्यक्त केली भावना

Gautam Gambhir About Ajit Agarkar : चीफ सिलेक्टर असलेल्या अजित आगरकर यांचा कार्यकाळ 4 ऑक्टोबर रोजी संपुष्टात आला आहे. त्यानंतर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याने एक्सवर अगरकरांविषयी पोस्ट शेअर केली आहे.


सुवर्णकन्या कुमकुम आणि रौप्यपदक विजेता यशदीपचे अमरावतीत जल्लोषात स्वागत; आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी

जपानमध्ये पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या अमरावतीची सुवर्णकन्या कुमकुम मोहोड आणि रौप्यपदक विजेता यशदीप भोगे यांचे शहरात आगमन होताच अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.


तेरे भाई की हुकूमत..., श्रेयसच्या शतकानंतर बहिणीचा स्वॅग, रॅप सॉन्गवर आईसोबत सेलिब्रेशन, video

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. वेस्ट इंडिजने दिलेलं 172 रनचं आव्हान टीम इंडियाने 14.4 ओव्हरमध्येच फक्त 2 विकेट गमावून पार केलं. कर्णधार श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. श्रेयस अय्यरने 43 बॉलमध्ये 237.21 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 102 रन केले, ज्यात 10 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. श्रेयस अय्यरचं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे पहिलंच शतक होतं.श्रेयस अय्यरने...


रणजी ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ जाहीर! दोन मराठमोळ्या खेळाडूंकडे नेतृत्वाची धुरा, उपलब्ध असूनही सूर्यादादाची संघात निवड नाही

Mumbai Squad for Ranji Trophy: मुंबई क्रिकेट असोसिएशनने रणजी ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला आहे. उपलब्ध असूनही सूर्यकुमार यादवची संघात निवड करण्यात आलेली नाही.


न्यूझीलंड क्रिकेटमध्ये नेमकं चाललंय तरी काय? सहाव्या खेळाडूने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नाकारलं, कारणही सांगितलं

Michael Bracewell NZ Central Contract: न्यूझीलंड क्रिकेट संघातील सहाव्या खेळाडूने आता सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून नाव काढून घेतलं आहे.


वीरेंद्र सेहवागच्या मुलावर मोठी जबाबदारी, आर्यवीर सेहवाग दिल्लीचे कर्णधारपद भूषवणार

वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग याला पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (DDCA) त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.


सूर्यकुमार यादवला मुंबईच्या संघात स्थान का नाही मिळालं? MCA अधिकाऱ्याने सांगितलं कारण, म्हणाले…

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवला आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईच्या रणजी संघात स्थान का देण्यात आलेलं नाही? यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.


प्रिय रोहित... आंदोलन करणाऱ्या लेक रोहित पवारांसाठी राजेंद्र पवारांची भावूक पोस्ट, दिले दोन महत्त्वाचे सल्ले

रोहित पवारांना त्यांच्या वडिलांनी राजेंद्र पवारांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. सध्या पुण्यामध्ये रोहित पवारांच्या नेतृत्त्वामध्ये अनेक विद्यार्थ्यी आंदोलन करत आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरु आहे.


भारत 149 वर ऑल आऊट, ऑस्ट्रेलियाविरूद्ध IPL स्टार्स फेल; पहिल्याच मॅचमध्ये दारूण पराभव

IND A vs AUS A Match Result News : भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघामध्ये झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. या सामन्यामध्ये आयपीएलमधील स्टार खेळाडू पूर्ण फेल गेल्याचं पाहायला मिळालं. रजत पाटीदारने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली.


Smriti Mandhana : कॅप्टन्सी मिळाल्यावर हरमनच्या डोळ्यात डोळेही घालू शकली नाही स्मृती मानधना, BCCI च्या मिटिंगमध्ये काय घडलं? Inside story

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या वुमेन्स टीम इंडियाच्या कॅप्टन्सीबाबत काल मोठा निर्णय झाला. टीम इंडियाची वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने सर्व फॉरमॅटच्या कॅप्टन्सीवर पाणी सोडलं अन् भावूक पोस्ट लिहिली होती. हरमनप्रीत कौर पायउतार होताच मराठमोळी खेळाडू स्मृती मानधना हिला टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली असून ती टीम इंडियाच्या सर्व फॉरमॅटची कॅप्टन असेल, असं बीसीसीआयने जाहीर केलं आहे. अशातच आता बीसीसीआयच्या मिटिंगमध्ये असं काय झालं होतं की, टीम इंडियात उभी फुट पडली? पाहा इनसाईड स्टोरी बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांच्या अध्यक्षतेखाली गुवाहाटी येथे झालेल्या आढावा बैठकीत हरमनप्रीतला हे स्पष्ट करण्यात आले की नेतृत्वबदल अटळ आहे. त्यानंतर चांगले संबंध असणाऱ्या हरमनप्रीत आणि स्मृती मानधना यांच्यात कर्णधारपदाचा मुद्दाही तापला होता. स्मृती मानधना हिने नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत कॅप्टन्सीची ऑफर आल्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. "गेल्या काही काळापासून त्यांचे एकमेकांशी पटत नव्हते आणि त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये स्पष्ट अस्वस्थता निर्माण झाली होती", अशी माहिती एनडीटीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. हरमनप्रीत कौरचं कर्णधारपद कायम ठेवायचे होते, परंतु सिलेक्टर्सला पुढील वर्ल्ड कप स्पर्धेच्या सायकलसाठी संघाची नव्याने बांधणी करायची होती. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये बाद फेरीपर्यंत न पोहोचता सलग दोनदा बाहेर पडल्यानंतर, सिलेक्टर्स हरमनप्रीत कौर यांच्याऐवजी दुसऱ्या पर्यायाचा विचार करत होते. पुढील वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी संघाची नव्याने बांधणी करण्याची वेळ आली आहे, असं निवडकर्त्यांना वाटत होतं. यात 'स्प्लिट कॅप्टन्सी'चा म्हणजेच वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा कोणताही विचार नव्हता, अशी माहिती सुत्रांनी क्रिकबझला दिली आहे. क्रिकबझ'ला मिळालेल्या माहितीनुसार, हरमनप्रीत कौर यांना एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट सामन्यांचे कर्णधारपद कायम ठेवण्याचा पर्याय देण्यात आला होता, परंतु त्यांनी दोन्ही पदे सोडण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीतने रागात हा निर्णय घेतला का? असा सवाल देखील विचारला जातोय. स्मृतीने कॅप्टन्सी मिळाल्यावर हरमनप्रीतचं कौतुक देखील केलं. हरमनप्रीत आणि कर्णधार म्हणून तिने गेल्या काही वर्षांत दिलेल्या योगदानाची मी दखल घेऊ इच्छिते. तिने अत्यंत निष्ठेने संघाचं नेतृत्व केलं आहे आणि ती आमच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे, असं स्मृती म्हणाली.


हेटमायर क्रीजमध्ये येऊनही रनआऊट, स्टंपला बॉल लागूनही होप नॉटआऊट, T20 मध्ये याआधी असं कधीच घडलं नाही

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर पहिल्या 6 ओव्हरच्या पॉवर प्लेमध्ये वेस्ट इंडिजचा स्कोअर 44/3 एवढा झाला. पॉवरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजचा आक्रमक खेळाडू शिमरन हेटमायर याच्या रनआऊटवरून मोठा वाद झाला. सहाव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला अक्षर पटेलच्या बॉलिंगवर शाय होपने शॉट मारला, पण श्रेयस अय्यरने मिस फिल्डिंग केली, या मिस फिल्डिंगवर होप आणि हेटमायर रन काढण्यासाठी धावले. होप आणि हेटमायर धावत असल्याचं दिसताच श्रेयसने विकेट कीपर संजू सॅमसनच्या दिशेने थ्रो केला. रन पूर्ण करण्यासाठी हेटमायरने डाईव्ह मारली, यानंतर हेटमायरची बॅट क्रीजमध्ये तर आली पण हवेतच राहिली, तेव्हाच संजूने बेल्स उडवल्या. हेटमायरची बॅट हवेत असल्यामुळे थर्ड अंपायरने आऊट दिलं, यानंतर हेटमायरने मैदानामध्ये वादही घातला. शाय होपला जीवनदान मिळालं तेव्हा तो 33 रनवर खेळत होता, यानंतर त्याने अर्धशतक झळकावलं. 37 बॉलमध्ये 52 रन करून होप आऊट झाला. या खेळीमध्ये त्याने 2 सिक्स आणि 6 फोर मारल्या. शाय होप आऊट झाला तेव्हा वेस्ट इंडिजचा स्कोअर 11.4 ओव्हरमध्ये 107/4 एवढा झाला होता. शाय होप आऊट झाल्यानंतर शरफेन रदरफोर्डने आक्रमक बॅटिंग केली. रदरफोर्डने 34 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने 54 रन केले. पण रदरफोर्ड आऊट होताच वेस्ट इंडिजची बॅटिंग गडगडली आणि त्यांचा 171 रनवर ऑलआऊट झाला. भारताकडून नमन धीरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादवला 2-2 आणि अर्शदीप सिंग, मयंक यादव यांना 1-1 विकेट मिळाली. भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मयंक यादव


हरमनप्रीत युगाचा अंत! स्मृती मानधना बनली टीम इंडियाची नवी कर्णधार

Smriti Mandhana Named As Captain: बीसीसीआय़कडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरनंतर स्मृती मानधनाची कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.


विराटने प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी खरंच ५ कोटी रुपये घेतले? अखेर कोहलीने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “श्रध्दा आणि आदरापोटी…”

Virat Kohli Premanand Maharaj Controversy: विराट कोहली ५ कोटी रूपये घेऊन प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला गेला होता, असा दावा दिनेश फलहारी यांनी केला होता. यावर आता विराट कोहलीकडून वक्तव्य आलं आहे.


आगरकरचा कार्यकाळ संपताच टीम इंडियात होणार मोठे बदल... न्यूझीलंड सीरिजसाठी घातक बॉलरचा कमबॅक निश्चित

भारतीय क्रिकेट टीमच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महिन्याच्या शेवटची टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरूवात होणार आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात 5 टी-20, 5 वनडे आणि 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनेक प्रमुख खेळाडूंची टीम इंडियात एन्ट्री होणार आहे, त्याआधीच टीम निवडीबाबत मोठं वृत्त समोर आलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार निवड समितीची बैठक या आठवड्यात 5 ते 11 ऑक्टोबरमध्ये होणार आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांना कार्यकाळ 4 ऑक्टोबरला संपला आहे, पण बोर्डाने अजूनही आगरकर यांचा उत्तराधिकारी निवडलेला नाही. निवड समिती प्रमुखाची घोषणा केली जात नाही तोपर्यंत चार सदस्यीय समिती टीम इंडियाची घोषणा करेल, भारताचा माजी स्पिनर प्रग्यान ओझा निवड समितीच्या बैठकीची सूत्र हातात घेऊ शकतो. ही निवड समिती न्यूझीलंड दौऱ्यासाठी तिन्ही फॉरमॅटची टीम निवडेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजनंतर कर्णधार शुभमन गिलने न्यूझीलंड दौऱ्यासाठी महत्त्वाचे खेळाडू उपलब्ध असतील, असे संकेत दिले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2027 फायनलच्या रेसमध्ये कायम राहायचं असेल तर भारतासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या दोन टेस्ट मॅच महत्त्वाच्या आहेत. इराणी कपमध्ये जम्मू-काश्मीरविरुद्ध घातक बॉलिंग करणारा बंगालचा फास्ट बॉलर मुकेश कुमारचं टेस्ट टीममध्ये पुनरागमन निश्चित मानलं जात आहे. इराणी कपच्या फायनलमध्ये मुकेशने 6 विकेट मिळवून टीमला विजय मिळवून दिला. याशिवाय आकाश दीप यालाही टेस्ट टीममध्ये संधी मिळू शकते. याशिवाय जसप्रीत बुमराहचंही टीम इंडियात कमबॅक व्हायची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. वनडे वर्ल्ड कप 2027 ची तयारी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचं समीकरण पाहता बुमराह टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.


वेस्ट इंडिज 171 धावांवर ऑल आऊट, डेब्यू करणाऱ्या नमन धीरने गाजवलं, पहिल्याच मॅचमध्ये रचला इतिहास

Naman Dhir Record News : भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या टी-२० सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी १७१ धावांवर ऑल आऊट केले. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या नमन धीरने पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेत इतिहास रचला आहे.


भारत वि. वेस्ट इंडिज टी-20 मालिकेतील पहिला सामना कुठे आणि किती वाजता? वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही?

IND vs WI 1st T20 News : वनडे मालिका पार पडल्यावर आता भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कुठे आणि किती वाजता असणार? वैभवला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी 5 कोटी रुपये दिल्याचा आरोपांवर विराट कोहलीने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, मला

वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या यात्रेसाठी 5 कोटी रुपये मिळाल्याचे दावे केले जात आहेत, त्याचा त्यावर विराट कोहलीच्या टीमने स्पष्टपणे सांगितले आहे.


Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरनं तडकाफडकी कर्णधारपद सोडलं, काल बीसीसीआयच्या मीटिंगमध्ये असं काय घडलं?

Haramanpreet Kaur BCCI Meeting: हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडायचा निर्णय घेतला. पण हे कालच ठरल्याचे समजत आहे कारण काल बीसीसीआयची रिव्ह्यू मीटिंग पार पडली.


सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले टॉप 10 भारतीय क्रिकेटपटू, नंबर एकला धक्कादायक नाव; सचिन, विराट, रोहितचाही समावेश

Most Ducks in International Cricket :आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या टॉप १० भारतीय क्रिकेटपटूंमध्ये यामध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग यांचाही समावेश आहे. पण पहिल्या क्रमांकावरील खेळाडू पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.


सोनी लिव्हवर नाही 'येथे' पाहता येणार पहिल्या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग! वाचा संपूर्ण माहिती

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी20 मालिकेला काही तासांमध्ये सुरु होणार आहे, या मालिकेचा पहिल्या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला या लेखामध्ये देणार आहोत.


'सेम टू सेम' वक्तव्य भोवलं... सूर्याप्रमाणेच हरमनची कॅप्टन्सीही गेली, BCCI च्या बैठकीत काय झालं?

बीसीसीआयच्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये सचिव देवजित सैकिया, हेड कोच अमोल मुजुमदार, हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना सहभागी झाले होते. गुवाहाटीमध्ये झालेल्या या बैठकीनंतर हरमनप्रीतने हा निर्णय घेतला, त्यामुळे बीसीसीआय बैठकीच्या बंद खोलीत नेमकं काय झालं? ज्यामुळे हरमनने तिन्ही फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडली. भारतीय क्रिकेट आता संक्रमणाच्या काळातून जात आहे. हमरनप्रीत 17 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे आणि बऱ्याच काळापासून ती टीमची कॅप्टनही आहे. हरमनच्या नेतृत्वात भारतीय महिला टीमने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला. 2025 मध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. हरमनप्रीत कौर 37 वर्षांची आहे, टीमची उपकर्णधार स्मृती मंधानाने अनेकदा जाहीरपणे कॅप्टन्सीची इच्छा बोलून दाखवली. यानंतर बीसीसीआयने नेतृत्व बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. हरमनप्रीत कौर भारताची एकमेव वर्ल्ड कप विजेती महिला कर्णधार आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपर्यंत टीमची कॅप्टन्सी करण्याची इच्छा हरमनप्रीतने व्यक्त केली होती. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवनेही अशीच इच्छा व्यक्त केली होती. सूर्यकुमार यादव आणि हरमनप्रीत कौर या दोघांनीही ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त करणं आणि त्यानंतर दोघांचीही कॅप्टन्सी जाणं, हा योगायोग आहे का आणखी काही कारण आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. हरमनप्रीत कौर मागच्या एका दशकापासून भारताच्या टी-20 टीमची कॅप्टन आहे. 2016 साली हरमनप्रीत भारताच्या टी-20 टीमची तर 2022 साली वनडे टीमची कॅप्टन बनली. 2023 मध्ये हरमनला सगळ्या फॉरमॅटची कॅप्टन करण्यात आलं. आता कॅप्टन्सी सोडली असली तरी आपण तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार असल्याचं हरमनप्रीतने स्पष्ट केलं आहे. हरमनप्रीतने 5 टेस्ट, 51 वनडे आणि 155 टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं. यावर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया लवकर बाहेर झाली, तेव्हा हरमनची कामगिरी निराशाजनक झाली, त्यानंतर डायना एडुल्जी यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी स्मृतीला कर्णधार करण्याची मागणी केली होती.


प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटणारी बातमी, महाराष्ट्राची लेक झाली भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार

प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या सांगलीची लेक आता भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयकडून अधिकृतपणे स्मृती मानधना हिला कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं आहे.


सूर्याला मुंबईच्या टीममधून बाहेर का काढलं? धक्कादायक कारण समोर आलं!

मुंबईच्या रणजी टीममध्ये आधीच अनुभवाची कमतरता असताना सूर्यकुमार यादवला टीममधून बाहेर ठेवलं गेल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, पण आता सूर्याला टीमबाहेर ठेवण्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. रेकॉर्ड 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकलेली मुंबई यंदाच्या रणजी ट्रॉफीचा पहिला सामना 11 ऑक्टोबरला चंडीगढविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी मुंबईने 16 सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली आहे. सिद्धेश लाड मुंबईचा कर्णधार तर आयुष म्हात्रे उपकर्णधार आहे. सूर्यकुमार यादव मुंबईच्या प्री-सिझन कॅम्पपासून गायब होता, याच कारणामुळे त्याची मुंबईच्या रणजी ट्रॉफी टीममध्ये निवड झाली नाही, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या सूत्रांनी पीटीआयला दिली आहे. मुंबईटे खेळाडू मागच्या एका महिन्यापासून रणजी ट्रॉफीसाठी ट्रेनिंग करत आहेत. मंगळवारीही सीसीआय आणि एमसीएच्या बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्सच्या मैदानात खेळाडूंचा सराव सुरू होता. सूर्याला टीममध्ये घेतलं असतं तर एखाद्या युवा खेळाडूला बाहेर बसावं लागलं असतं, जे योग्य ठरलं नसतं, असंही सूत्रांनी सांगितलं. 10 दिवसांपूर्वी जेव्हा मुंबई टीमच्या निवडीसंदर्भात सूर्यकुमार यादवसोबत संपर्क केला गेला तेव्हा त्याने कोणतंही उत्तर दिलं नव्हतं, पण त्यानंतर सूर्याने स्वत:च मी उपलब्ध असल्याचा रिप्लाय दिला. पण रेड बॉल क्रिकेटचा कमी अनुभव आणि मुंबईच्या प्री-सिझन कॅम्पमध्ये न येणं, या कारणांमुळे सूर्याची मुंबईच्या टीममध्ये निवड झाली नाही. सूर्यकुमार यादवसाठी निवडीचे दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नाहीत. त्यांना पुन्हा एकदा टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी एमसीएकडून आयोजित पोलीस शिल्ड किंवा पुरुषोत्तम शिल्ड यासारख्या क्लब क्रिकेटमध्ये खेळावं लागेल. पण व्हाईट बॉल क्रिकेटची परिस्थिती वेगळी असल्याचं एमसीएने सांगितलं आहे. मुंबईच्या व्हाईट बॉल क्रिकेटसाठी सूर्यकुमार यादवचा विचार केला जाईल. सूर्या व्हाईट बॉल स्पर्धांसाठी मुंबईच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे, पण श्रेयस अय्यर उपलब्ध नसेल तेव्हाच सूर्याला कॅप्टन्सी दिली जाऊ शकते, असं सांगण्यात येत आहे.


सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला किती सामने खेळता येणार? WC 2027पूर्वी किती मालिका होणार? जाणून घ्या

Virat Kohli Most International Centuries Record: विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यासाठी किती सामने मिळू शकतात, पाहूया.


सुनील गावसकरांनी परफेक्ट ओळखलं, भुवनेश्वर कुमार याच्या कमबॅकबाबत नेमकं काय म्हणाले?

Sunil Gavaskar on Bhuvneshwar Kumar News : भारताचा स्टार खेळाडू भुवनेश्वर कुमार याची चार वर्षांनी टीममध्ये कमबॅक केले आहे. या निर्णयावर माजी खेळाडूंना आनंद व्यक्त केला आहे. अशातच यावर सुनील गावसकर यांनी भुवीच्या निवडीचे कारण सांगितले आहे.


शाब्बास रे पठ्ठ्या! पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलिया ऑल आऊट, मराठमोळ्या सूर्यांश शेडगेच्या 4 विकेट, भारताला जिंकण्यासाठी 275 धावांचे टार्गेट

Suryansh Shedge Marathi News : भारत अ वि. ऑस्ट्रेलिया अ संघात पहिला वनडे सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये भाराताच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत कांगारूंना ऑल आऊट केले. हार्दिक पंड्या याच्या जागी निवड झालेल्या सूर्यांशने चार विकेट घेतल्या आहेत.


क्रीजमध्ये पोहोचली होती हेटमायरची बॅट, तरी दिला रनआउट; नंतर अंपायरशी वाद अन्… नेमकं काय घडलं?

Shimron Hetmyer Run Out News: लखनौ टी२० मध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हेटमायरसोबत एक विचित्र घटना घडली. केवळ दोन चेंडू खेळल्यानंतर हेटमायर धावबाद झाला. मात्र, या धावबादमुळे वाद निर्माण झाला.


Ajit Agarakar: ठरलं तर मग! टीम इंडियाच्या नवीन सिलेक्टरची घोषणा होणार, गंभीरची आगरकरांसाठी एक पोस्ट अन् चर्चा सुरु

Gautam Gambhir: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आता अजित आगरकर यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची आता जोरदार चर्चा होत आहे.


विराट कोहलीला आश्रमात आणण्यासाठी ५ कोटी रुपये? प्रेमानंद महाराजांच्या आश्रमावरून नवा वाद; संताचा मोठा दावा

Virat Kohli Ashram Visit: फलाहरी महाराजांनी प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबद्दल गंभीर खुलासे केले आहेत. त्यांनी विराट कोहलीला ५ कोटी रुपयांना आमंत्रित केल्याचा दावा केला आहे.


Virender Sehwag son: वीरेंद्र सेहवागच्या लेकाचं नशीब चमकलं, थेट मिळाली अंडर-19 टीमची कॅप्टन्सी; बापाचा तो एक सल्ला कामी आला!

टीम इंडियाचा माजी विस्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग याची बॅटिंग पाहून अनेकांचं आजही मन तृप्त होतं. विराट कोहलीला लाजवेल असा कव्हर ड्राईव्ह आणि बॅकफूट पंच... रोहितही चकित होईल असा पुल शॉट... सेहवागची बॅटिंग म्हणजे सुखाचा क्षण... अशातच आता वीरेंद्र सेहवागचा मुलगा मैदानात उतरला आहे. सेम टू सेम बापासारखी बॅटिंग... आर्यवीर सेहवागने टीम इंडियाच्या अंडर 19 मध्ये संधी मिळवली अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला जलवा दाखवला होता. आर्यवीर सेहवागने ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 टीमविरुद्ध केलेल्या कामगिरीनंतर आता त्याला मोठी लॉटरी लागली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 टीमविरुद्ध 28 धावांची खेळी केली होती. आता आर्यवीर सेहवाग याला दिल्लीच्या अंडर 19 टीमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तो यंदा विनू मांकड ट्रॉफीमध्ये दिल्लीचा कॅप्टन असेल. विनू मांकड ट्रॉफी 8 ऑक्टोबरपासून विशाखापट्टणम येथे खेळवली जाईल. आर्यवीर सेहवागने 2024 च्या कूचबिहार ट्रॉफीमध्ये मेघालयाविरुद्ध दिल्लीकडून खेळताना 297 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याचीच चर्चा सर्वत्र होत होती. त्याची ट्रिपल सेंच्युरी हुकल्याने वीरू देखील नाराज होता. मला आर्यवीर सेहवागचा अभिमान वाटतो. लोकं टीका करतील, तिरस्कार करतील पण, मी त्याला स्पष्ट सांगितलं आहे की दबाव तर असतोच, पण मैदानावर निर्भयपणे खेळ. मोठी धावसंख्या उभारण्याची चिंता करू नको, असा सल्ला वीरेंद्र सेहवागने दिला होता. लोकं काय म्हणतात याचा विचार करण्यापेक्षा आपल्या सरावावर लक्ष केंद्रीत करात. त्यांना जे काही म्हणायचं आहे ते म्हणू दे. तू तुझ्या खेळावर लक्ष केंद्रीत कर. बॅटिंग करताना गाणं म्हणत त्यामुळे प्रेशर कमी होतं, असंही सेहवागने आपल्या लेकाला सांगितलं होतं.


IND vs WI: कॅप्टन श्रेयसची सेंच्यूरी, पण वाईस कॅप्टन्सी काढलेल्या खेळाडूने जिंकवलं, 6 बॉलमध्ये मॅच फिरवली

एकाना स्टेडिअमवर टीम इंडियाने वेस्ट इंडिजने दिलेले आव्हान 14.4 ओव्हरमध्ये पूर्ण करत हा सामना 8 विकेट राखून जिंकला आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकून पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. एकाना स्टेडिअमवर टीम इंडियाने वेस्ट इंडिजने दिलेले आव्हान 14.4 ओव्हरमध्ये पूर्ण करत हा सामना 8 विकेट राखून जिंकला आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकून पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली नव्हती. कारण संजू सॅमसन अवघ्या 11 धावावर बाद झाला होता.त्याच्यापाठोपाठ अभिषेक शर्मा देखील 21 धावावर आऊट झाला होता. दोन्ही ओपनर स्वस्तात बाद झाल्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर आणि ईशान किशनने भारताचा डाव सारवला होता. दोन्ही खेळाडूंनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 139 धावांची पार्टनरशीप केली होती. त्यात श्रेयस अय्यरने नाबाद 102 धावा आणि ईशान किशनच्या नाबाद 37 धावांच्या बळावर टीम इंडियाने 8 विकेटने सामना जिंकला. खरं तर श्रेयस अय्यरने जरी शतकीय खेळी केली असली तरी टीम इंडियाच्या दुसऱ्याच खेळाडूने मॅच जिंकवली होती. विशेष म्हणजे हा तोच खेळाडू जाच्याकडून वाईस कॅप्टन्सी काढून घेण्यात आली होती. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी अक्षर पटेल आहे.वेस्ट इंडिजच्या डावा दरम्यान अक्षर पटेल सहावी ओव्हर घेऊन मैदानात आला होता. यावेळी त्याच्या ओव्हरला पहिल्यांदा शिमरॉन हेटमायर रनआऊट झाला. हा विकेट दुसऱ्या बॉलला पडली होती.त्यानंतर पाचव्या बॉलला अक्षर पटेलने रोवमेन पोवेलला बोल्ड केले होते. अशाप्रकारे अक्षर पटेलने मेडन ओव्हर टाकून दोन विकेट काढले होते. अक्षरची हीच ओव्हर सामन्याची टर्निंग पॉइंट ठरली होती. त्यामुळे भारताने सहा बॉलमध्ये मॅच जिंकली होती.


Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीचा विषयच हार्ड आहे, क्रेझ इतकी की चाहत्यांनी चक्क रात्री

Vaibhav Sooryavanshi IND vs WI T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका सुरु असून या मालिकेच्या तिकिटांच्या खरेदीसाठी चाहत्यांची भलतीच गर्दी केली आहे.


न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! ज्या मैदानावर शेवटचा सामना खेळला, त्याच मैदानावर दमदार खेळाडूचं T20I संघात पुनरागमन, जाणून घ्या संपूर्ण संघ…

Team India Squad New Zealand Tour: न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला आहे. भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे.


श्रेयस अय्यरने मोडला विराट कोहलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय कर्णधार

Shreyas Iyer Record: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने शतक झळकावताच विराट कोहलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.


भारताचा वेस्ट इंडिजवर 8 विकेटने दमदार विजय, श्रेयस अय्यरचे तुफानी शतक; मालिकेत 1-0 ने आघाडी

IND vs WI 1st T20 News : भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघावर ८ विकेटने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये कर्णधार श्रेयस अय्यरने तुफानी शतकी खेळी केली.


Hardik Pandya: हार्दिक पंड्याचा पुन्हा पत्ता कट, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेत मराठमोळ्या मुंबईकर खेळाडूची टीममध्ये एन्ट्री

Hardik Pandya News: हार्दिक पंड्या काही लवकर कमबॅक करेल अशी चिन्हे फार कमी दिसत आहे. कारण तो पुन्हा एकदा एका मालिकेतून बाहेर पडला आहे.


आधी दोन डॉट बॉल, मग स्टेडियममध्ये सन्नाटा... भारतातल्या फास्टेस्ट बॉलरला वेस्ट इंडिजने बेक्कार धुतलं!

पहिल्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यातून नमन धीर याचं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे. पहिल्या टी-20 सामन्यातून टीम इंडियाने रवी बिष्णोई, नितीश कुमार रेड्डी, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी यांना बाहेर बसवलं आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या अनुभवी ओपनर्सवर पुन्हा एकदा टीम मॅनेजमेंटने विश्वास दाखवल्यामुळे वैभव अजूनही भारतात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याच्या प्रतिक्षेत आहे. लखनऊच्या या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. लखनऊमध्ये झालेल्या 6 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांपैकी 5 सामने पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकले आहेत. टॉस जिंकून पहिले बॉलिंग करणाऱ्या टीम इंडियाने चांगली सुरूवात केली. अर्शदीप सिंगने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन दिल्या, पण त्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होपने भारतीय बॉलर्सवर आक्रमण करायला सुरूवात केली. इनिंगची दुसरी ओव्हर टाकण्यासाठी मयंक यादव आला, या ओव्हरमध्ये मयंकने दोन डॉट बॉल टाकले, पण उरलेल्या चार बॉलवर होपने चार फोर मारल्या, त्यामुळे मयंकच्या पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 16 रन आल्या. मयंक यादव हा सध्या भारतातला सगळ्यात फास्ट बॉलर आहे. मयंक सातत्याने 150 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉलिंग करू शकतो, त्यामुळे त्याची टीम इंडियात निवड झाली, पण भारतातल्या सगळ्यात जलद बॉलरवरच वेस्ट इंडिजच्या कर्णधाराने आक्रमण केलं, त्यामुळे हाऊसफूल असलेल्या इकाना स्टेडियममध्ये काही काळ एकच सन्नाटा पसरला होता. मयंक यादवच्या एका ओव्हरमध्येच 16 रन आल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने पुन्हा त्याला पॉवरप्लेमध्ये बॉलिंग दिली नाही. यानंतर श्रेयसने डावखुरा स्पिनर अक्षर पटेलच्या हातात बॉल दिला आणि त्याने दणक्यात टीम इंडियाचं कमबॅक करून दिलं. 6 ओव्हरचा पॉवरप्ले संपला तेव्हा वेस्ट इंडिजचा स्कोअर 44/3 एवढा झाला होता, म्हणजेच मयंकच्या एका ओव्हरमधल्या 16 रन वगळल्या तर उरलेल्या 5 ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला फक्त 28 रन करता आल्या यात त्यांच्या 3 विकेट गेल्या. यात एक विकेट अर्शदीपला, एक अक्षर पटेलला मिळाली तर एक रन आऊट झाला. भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मयंक यादव


होय, स्वप्न पूर्ण होतात, श्रेयस अय्यर पहिल्यावहिल्या टी-२० शतकानंतर झाला भावुक; म्हणाला...

Shreyas Iyer on India Win: श्रेयस अय्यरने भारताच्या विजयानंतर आणि त्याच्या शतकी खेळीनंतर नेमकं काय म्हटलं, जाणून घेऊया.


भारतीय महिला क्रिकेट संघात फूट, हरमनप्रीत-स्मृतीमध्ये एकमत नव्हतं, ड्रेसिंग रुमचं वातावरण गरम, कॅप्टन्सीच्या हँडओव्हरवेळी चर्चांना उधाण

Harmanpreet Kaur Smriti Mandhana rift : गेल्या काही काळापासून महिला क्रिकेट संघाची मावळती कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उगवती कर्णधार स्मृती मानधना यांच्यात बऱ्याच मुद्द्यांवर एकमत होत नव्हतं. त्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


रोनाल्डोने पोर्तुगाल संघाची साथ सोडण्यामागचं पूर्ण सत्य सांगितलं, कोचवर आरोप करत म्हणाला, "मला दिलेला शब्द पाळला नाही"

Cristiano Ronaldo Portugal Controversy Statement: पोर्तुगाल संघाची साथ सोडण्यामागे नेमकं काय कारण होतं, नेमकं काय घडलं होतं, याचा खुलासा रोनाल्डोने केला आहे.


Suryakumar Yadav : मुंबई क्रिकेटमध्ये नवा ड्रामा! सूर्यकुमार यादव मुंबईच्या टीममधून 'आऊट', आधी फोनकरून विचारलं मग दिला डच्चू

रणजी ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघाची सिलेक्शन करताना मोठा ड्रामा पहायला मिळाला. मुंबई क्रिकेटची मिटिंग पार पडली, त्यावेळी एमसीएने म्हणजेच मुंबई क्रिकेट असोशिएशनने सूर्यकुमार यादवला संपर्क साधून विचारलं होतं की, त्याला आगामी रणजी करंडक सामना खेळण्यात रस आहे का? सूर्यकुमार यादव याने यावर सकारात्मक उत्तर दिलं. होय मी खेळण्यास तयार आणि फिट आहे, असं सूर्याकडून उत्तर देण्यात आलं. त्यानंतर मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. सूर्यकुमार यादवला मुंबईच्या संघात संधी दिली जाईल, असं सगळ्यांना वाटत होतं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. मात्र, निवड समितीने सूर्यकुमार यादवची मुंबईच्या संघासाठी निवड केली नाही. एमसीएचे निवड समिती प्रमुख राजेश पवार यांनी खुलासा केला आहे की, सूर्याने मागील वर्षभरात टेस्ट क्रिकेट खेळलेलं नाही, त्यामुळे त्याची निवड झाली नाही, असं पवार म्हणाले. गेल्याच आठवड्यात सूर्याला रणजी ट्रॉफी खेळण्याच्या त्याच्या उपलब्धतेबद्दल आणि इच्छेबद्दल विचारण्यात आले होते, आणि त्याने होकार देण्यासाठी एक दिवस घेतला. याच वेळात एमसीएने निर्णय बदलला की काय? असा सवाल विचारला जात आहे. एमसीएच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की त्यांनी त्याच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता सूर्याचं सिलेक्शन न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सूर्याने गेल्या वर्षभरात 'रेड-बॉल' क्रिकेट खेळलेले नाही आणि त्याला ते खेळण्याची गरज आहे. जर तो काही 'रेड-बॉल' क्रिकेट खेळला, तर तो नक्कीच संघात येऊ शकतो, असंही निवड समिती प्रमुख राजेश पवार म्हणाले आहेत. मुंबईच्या टीमसाठी एमसीएच्या निवड समितीने या हंगामासाठी सिद्धेश लाडची कर्णधारपदी आणि सलामीवीर आयुष म्हात्रेची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. तर यशस्वी जयस्वाल याला देखील सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली आहे.


Sourav Ganguly: आता 'दादागिरी' चालणार, सौरव गांगुली यांच्याकडे मोठी जबाबदारी, थेट हेड कोच बनले

Sourav Ganguly Headcoch: भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सौरव गांगुली यांना एक मोठी जबाबदारी मिळाली आहे.


12 स्पर्धकांना हरवून अविनाश मिश्रा ठरला अल्टीमेट विनर; झाली चांदीच चांदी! ट्रॉफीसोबत काय काय मिळालं?

उंचावरून झेप घेणे, आगीशी खेळ किंवा मग साप-मगरींच्या गराड्यामध्ये उतरणे असो; ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये आलेल्या स्पर्धकांना एक-एक टास्क करताना नाकीनऊ येतात. यंदाच्या १५ व्या सीझनमध्येही रोहित शेट्टीने स्पर्धकांसमोर अशीच एकापेक्षा एक भयानक आव्हाने उभी केली होती. मात्र, पहिल्या दिवसापासून प्रत्येक भीतीला थेट सामोरे जात प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या टीव्ही अभिनेता अविनाश मिश्राने अखेर या धमाकेदार सीझनच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. ४ ऑक्टोबरच्या रात्री रंगलेल्या ग्रँड फिनालेमध्ये रोहित शेट्टीने विजेता म्हणून अविनाशच्या नावाची अधिकृत घोषणा करताच सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अविनाशच्या नावाची जोरदार हवा होती, आणि अपेक्षेप्रमाणेच त्याने विजेतेपदाची ट्रॉफी उंचावून ती चर्चा खरी करून दाखवली. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सीझनमध्ये टीव्हीच्या १३ प्रसिद्ध चेहऱ्यांनी सहभाग घेतला होता. अविनाशने तब्बल १२ तगड्या स्पर्धकांना मागे टाकत अंतिम टप्प्यात धडक मारली. टॉप-५ मध्ये अविनाशसोबत फरहाना भट्ट, करण वाही, ओरी आणि ऋत्विक धनजानी यांनी स्थान मिळवले होते. फिनालेच्या अत्यंत चुरशीच्या अखेरच्या टास्कमध्ये ओरी आऊट झाल्यानंतर विजेतेपदाची थेट लढत अविनाश आणि ऋत्विक यांच्यात रंगली. अखेरच्या क्षणी अविनाशने अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने बाजी मारली, तर ऋत्विक धनजानीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या विजयासोबतच अविनाशला या सीझनची आकर्षक ट्रॉफी, २० लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक आलिशान मारुती सुझुकी स्विफ्ट कार बक्षीस म्हणून मिळाली आहे. संपूर्ण सीझनदरम्यान कोणताही स्टंट असो, अविनाशने कधीही माघार घेतली नाही. टास्क पूर्ण करण्यासाठी तो स्वतःच्या जिवाची बाजी लावत असे. केवळ स्वतःचाच खेळ न बघता, अनेकदा जेव्हा दुसरे स्पर्धक दुखापत झाल्यास टास्क करू शकत नसतील, तेव्हा अविनाश स्वतःहून पुढे येऊन त्यांच्या वतीने स्टंट करायचा आणि त्यांना सुरक्षितही ठेवायचा. त्याच्या याच लढाऊ वृत्तीचे शोचा होस्ट रोहित शेट्टीने वारंवार तोंडभरून कौतुक केले होते. चिकाटी, संयम आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या या विजयामुळे सध्या मनोरंजन विश्वातून आणि चाहत्यांकडून अविनाशवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


टीम इंडियात निवड, तरी पंतच्या करिअरला उतरती कळा, 25 वर्षीय खेळाडूच्या कॅप्टन्सीमध्ये खेळावं लागणार!

ऋषभ पंत हा मागच्या बऱ्याच काळापासून भारताच्या व्हाईट बॉल टीममधून बाहेर आहे. ऋषभ पंतने भारताकडून शेवटची वनडे आणि टी-20 मॅच 2024 साली खेळली, टेस्ट क्रिकेटमध्ये ऋषभ पंत टीम इंडियाचा भाग असला तरी वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये मात्र त्याच्या करिअरला ब्रेक लागला आहे. टीम इंडियात इशान किशन, केएल राहुल, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल या प्रमुख विकेट कीपरच्या स्पर्धेत ऋषभ पंत बराच मागे पडल्याची चर्चा आहे. टेस्ट क्रिकेटमध्येही ध्रुव जुरेलने मागच्या काही काळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्यामुळे पंतने टेस्टमध्ये सातत्याने कामगिरी केली नाही तर त्याचं तिथलं स्थानही धोक्यात येऊ शकतं. मागच्या बऱ्याच काळापासून व्हाईट बॉल क्रिकेटपासून लांब असलेल्या ऋषभ पंत याची न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंडिया ए टीममध्ये निवड झाली आहे, पण या दौऱ्यात पंतला फक्त 16 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असणाऱ्या खेळाडूच्या कॅप्टन्सीमध्ये खेळावं लागणार आहे. ऋषभ पंत याने भारताकडून 51 टेस्ट, 31 वनडे, 76 टी-20 असे एकूण 158 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतका अनुभव असलेल्या पंतला फक्त 16 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या ध्रुव जुरेलच्या कॅप्टन्सीमध्ये खेळावं लागेल. इंडिया ए न्यूझीलंड ए विरुद्ध 3 अनऑफिशिअल टेस्ट मॅच खेळणार आहे. पहिला सामना 24 ते 27 ऑक्टोबर, दुसरा सामना 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर आणि तिसरा सामना 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान होईल. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या तयारीसाठी या 3 अनऑफिशिअल टेस्ट भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाच्या असतील. इंडिया ए टीम : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आर. स्मरण, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, आकिब नबी, आकाश दीप, अंशुल कंबोज, मानव सुतार, मुकेश चौधरी, साई सुदर्शन, यश राठोड, मुकेश कुमार


वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कॅप्टनला कुठेच जागा नाही, मुंबईच्या टीमची घोषणा, सूर्याला डच्चू!

मार्च महिन्यात टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी-20 वर्ल्ड कप जिंकला. लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया जगातली पहिलीच टीम ठरली. भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून दिल्यानंतर सूर्याची फक्त कॅप्टन्सीच गेली नाही, तर त्याला टीम इंडियातूनही बाहेर केलं गेलं. सूर्याच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप फायनलचा सामना खेळला होता, ज्यात भारताचा ऐतिहासिक विजय झाला, पण या सामन्यानंतर सूर्या टीम इंडियाकडून खेळताना दिसला नाही. भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या ऐवजी श्रेयस अय्यरला भारताच्या टी-20 टीमचं नेतृत्व देण्यात आलं. भारताच्या टी-20 टीममधून बाहेर झालेल्या सूर्यकुमार यादवला आता आणखी एक धक्का बसला आहे. रणजी ट्रॉफीच्या नव्या मोसमासाठी मुंबईने चंडीगढविरुद्ध होणाऱ्या आपल्या पहिल्या सामन्यासाठी टीमची घोषणा केली, ज्यात सिद्धेश लाडला कर्णधार करण्यात आलं, तर आयुष म्हात्रेला टीमचं उपकर्णधार करण्यात आलं, पण सूर्यकुमार यादवचं नाव मुंबईच्या टीममधून गायब आहे. मुंबई 2026-27 च्या रणजी ट्रॉफीचा पहिला सामना चंडीगढविरुद्ध 11 ते 15 ऑक्टोबरदरम्यान खेळणार आहे. मुंबईने सध्या पहिल्याच सामन्यासाठी टीमची घोषणा केली आहे, पण सूर्यकुमार यादवचं नाव या यादीत नसल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादवने रणजी ट्रॉफीच्या या मोसमासाठी आपण उपलब्ध असल्याचं मुंबई क्रिकेट आणि निवड समितीला कळवल्याचं सांगण्यात येत आहे, पण तरीही त्याला टीममधून बाहेर ठेवण्यात आलं. पहिल्या सामन्यासाठी मुंबईची टीम : सिद्धेश लाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे, दिव्यांश सक्सेना, मुशीर खान, सरफराज खान, सुवेद पारकर, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, शम्स मुलानी, तनुष कोटियान, अथर्व अंकोलेकर, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसुजा, ओमकार तरमळे


Shreyas Iyer: माझंच मला कळलं नाही की... शतकी खेळीनंतरही कॅप्टन श्रेयस अय्यर असं का म्हणाला?

Shreyas Iyer On IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका सुरु असून पहिला सामना भारताने जिंकला. आता यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर नेमके काय म्हणाला?


वैभवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर का ठेवलं? टॉस जिंकताच श्रेयसने सांगितलं, मुंबईच्या खेळाडूचा डेब्यू!

टी-20 सीरिजचा पहिला सामना लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये होत आहे. वनडे सीरिज खेळलेले फक्त 3 खेळाडूच भारतीय टीमचा भाग आहेत. कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी आणि नमन धीर या तिघांचीच वनडे आणि टी-20 टीममध्ये निवड झाली आहे. याआधी शनिवारी भारतीय टी-20 टीमने जपानमध्ये एशियन गेम्सची फायनल खेळली. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 19 रनने पराभव करून गोल्ड मेडल पटकावलं, त्यानंतर आता भारतीय खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी मैदानात उतरत आहेत. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. रवी बिष्णोई, नितीश कुमार रेड्डी, वैभव सूर्यवंशी आणि प्रिन्स यादव या चौघांना संधी मिळालेली नसल्याचं कर्णधार श्रेयस अय्यरने टॉसवेळी सांगितलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यातून नमन धीरने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमधून नमन धीरचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं होतं. आयपीएलमध्ये नमन धीर हा मुंबईकडून खेळतो. मुंबईसाठी नमन धीरने अनेकदा फिनिशरची तर काही वेळा मिडल ऑर्डर बॅट्समनची भूमिका बजावली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा आक्रमक ओपनर वैभव सूर्यवंशी याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या अनुभवी ओपनर्सवरच कर्णधार श्रेयस अय्यरने विश्वास दाखवला आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या ओपनिंग जोडीनेच वर्षाच्या सुरूवातीला भारताला भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकवून दिला होता, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचं याआधी अफगाणिस्तानविरुद्धच्या सीरिजवेळीही टीम मॅनेजमेंटने स्पष्ट केलं होतं. तसंच वैभवला त्याच्या संधीची वाट पाहावी लागेल, असं कर्णधार श्रेयस अय्यर आणि कोच गौतम गंभीर म्हणाला होता. भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मयंक यादव वेस्ट इंडिजची प्लेइंग इलेव्हन : शाय होप, कमील पूरन, शिमरन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, रोस्टन चेस, अकील हुसैन, शमार स्प्रिन्जर, शमार जोसेफ


वीरेंद्र सेहवागच्या लेकाला मिळाली कर्णधारपदाची जबाबदारी, वयाच्या १८व्या वर्षी करणार या संघाचं नेतृत्त्व

Virendra Sehwag Son Captaincy: वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर सेहवागला कर्णधारपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.


सांगलीची स्मृती बनली भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार, जाणून घ्या तिचा इथपर्यंतचा प्रवास

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू हरमनप्रीत कौर हिने क्रिकेटच्या सर्व प्रकारामधील कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यांनंतर महाराष्ट्राची लेक असलेल्या स्मृती मंधाना हिच्यावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


बीसीसीआयकडून न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, भुवनेश्वर कुमारची एन्ट्री तर ध्रुव जुरेल कॅप्टन; पाहा संपूर्ण टीम

BCCI Announced Team India against New Zealand : भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून टी-२० संघाची घोषणा करण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमार याची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यासोबतच भारत अ संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.