बंगळूर; वृत्तसंस्था : तळाच्या फळीतील फलंदाजांच्या चिवट झुंजीमुळे भारत ‘अ’ संघाने 4 दिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघावर 3 गडी राखून निसटता विजय मिळवला. 275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत ‘अ’ संघ अचानक संकटात सापडला. मात्र, ऋषभ पंतने (90) संयमी फलंदाजी साकारत संघाला सुस्थितीत आणले.
तनुष कोटियन (23) आणि आयुष बदोनी (23) उसळत्या गोलंदाजीला सामोरे जाताना बाद झाल्यानंतर भारत ‘अ’ संघाची 7 बाद 215 अशी स्थिती होती. विजयासाठी आणखी 60 धावांची गरज असताना मानव सुतार (नाबाद 20) आणि अंशुल कंबोज (नाबाद 37) यांनी कमालीचा संयम दाखवला. वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये ज्या शिस्तीचा अभाव होता, तीच शिस्त दाखवत या जोडीने आठव्या गड्यासाठी अभेद्य 58 धावांची भागीदारी रचली आणि यजमान संघासाठी विजयश्री खेचून आणली.
संक्षिप्त धावफलक :
द. आफ्रिका ‘अ’ प. डाव : 302.
भारत ‘अ’ पहिला डाव : 234.
द. आफ्रिका ‘अ’ दु. डाव : 199.
भारत ‘अ’ दुसरा डाव (टार्गेट 275) : 73.1 षटकांत 7 बाद 277 (ऋषभ पंत 113 चेंडूंत 11 चौकार, 4 षटकारांसह 90, आयुष बदोनी 34, अंशुल कंबोज नाबाद 37, मानव सुतार नाबाद 20).
2025-11-02T16:41:16Z