IPL 2023: आयपीएल तोंडावर असताना SOURAV GANGULY म्हणतो तर काय? RISHABH PANT वर बोलताना म्हणाला...

Sourav Ganguly On Rishabh Pant: येत्या 31 मार्चपासून आयपीएलच्या आगामी हंगामास (IPL 2023) सुरूवात होणार आहे. मात्र, दिल्लीचा स्टार प्लेयर ऋषभ पंत (Rishabh Pant) यंदाची आयपीएल खेळणार नसल्याने सर्वांचाच हिरमोड झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि दिल्लीसोबत जोडल्या गेलेल्या सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) मोठं वक्तव्य केलं. 

गांगुली दिल्लीच्या संघाचे संचालक (Director) म्हणून जोडले गेले आहेत. आयपीएलच्या (IPL 2023) आगामी टप्प्यापूर्वी अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) दिल्लीचा संघ सराव करत आहे. गांगुलीने संघाच्या प्री-सीझन शिबिरात हजेरी लावली. सर्व खेळाडूंच्या फिटनेसवर काम केलं. त्यावेळी ऋषभ पंतवर बोलताना गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाला Sourav Ganguly?

आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला त्यांच्या यष्टीरक्षक फलंदाजाची म्हणजेच ऋषभ पंतची नक्कीच उणीव भासेल, असं सौरव गांगुली (Sourav Ganguly On Rishabh Pant) म्हणतो.

मला खात्री आहे की, राष्ट्रीय संघालाही ऋषभ पंतची उणीव भासत आहे. तो तरुण खेळाडू आहे आणि त्याच्या करिअरमध्ये बराच काही शिल्लक आहे. तो एक खास खेळाडू आहे आणि त्याने पूर्णपणे सावरण्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे. आम्ही त्याला शुभेच्छा देतो आणि मीही त्याला भेटेन, असं वक्तव्य सौरव गांगुलीने केलं आहे.

आणखी वाचा - BCCI चा वार्षिक करार जाहीर; Rohit-Virat चा पगार माहितीये का? थक्क व्हाल!

डेव्हिड वॉर्नर (David Warner) संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे, तो एक उत्कृष्ट खेळाडू आणि कर्णधार आहे. आयपीएलमध्ये त्याने खूप धावा केल्या आहेत आणि तो खूप अनुभवी देखील आहे. त्याचा त्याच्या अनुभवाचा फायदा दिल्लीला होईल, असं गांगुली म्हणतो.

दिल्लीच्या खेळा़डूंची संपूर्ण यादी  (Delhi Capitals Squad)

डेव्हिड वॉर्नर (C), अक्षर पटेल (VC), पृथ्वी शॉ, अॅनरिक नॉर्टजे, मिचेल मार्श, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, खलील अहमद, चेतन साकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुळ, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे., लुंगी एनगिडी, विकी ओस्तवाल, अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रोसौ.

2023-03-27T12:22:35Z dg43tfdfdgfd