IPL 2023 : ईडन गार्डनवर दिसणार किंग खानच्या टीमची जादू? श्रेयस अय्यरविना असा आहे KKR चा संघ

IPL 2023 : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मालकी हक्क असलेला कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलमध्ये (IPL) आतापर्यंत दोनवेळा जेतेपद पटकावलं आहे. पण 2014 नंतर केकेआर संघाला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने 2012 आणि 2014 मध्ये चॅम्पियन्सचा खिताब पटकावला होता. पण यानंतर एकाही कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही. आता आयपीएलच्या नव्या हंगामात नव्या उत्साहासह केकेआर (KKR) मैदानात उतरणार आहे. पण त्यांच्या या उत्साहाला स्पर्धेआधीच धक्का बसला आहे. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतग्रस्त असून त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. अशात संघाचं नेतृत्व कोण करणार याकडे केकेआरच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत आंद्रे रसेल (Andre Russell), नितिश राणा (Nitish Rana) आणि सुनील नरिन (Sunil Narine) यांच्या नावाची चर्चा आहे. 

श्रेयस अय्यरची कमी जाणवणार

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरवर केकेआरने 2002 च्या लिलावात तब्बल 12 कोटी 25 लाख रुपये बोली लावून आपल्या संघात घेतलं. गेल्या हंगामात श्रेयस अय्यरने केकआरचं नेतृत्व केलं.  श्रेयस अय्यर कर्णधार आणि प्रमुक फलंदाज आहे. पण यंदा खेळू शकणार नसल्याने श्रेयस अय्यरची कमी संघाला जाणवणार आहे. त्यामुळे प्लेईंग इलेव्हन निवडणं हे कोलकाता नाईट रायडर्ससमोरचं प्रमुख आव्हान असणार आहे. 

केकेआरची प्लेईंग इलेव्हन

केकेआरच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये लिट्टन दास आणि व्यंकटेश अय्यर यांच्यावर सलामीची जबाबदारी असण्याची शक्यता आहे. लिट्टन दासवर फलंदाजीबरोबर विकेटकीपर अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. तर व्यंकटेश अय्यर आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. मधल्या फळीत नितीश राणा, रिंकू सिंह आणि मनदीप सिंह यांच्यावर जबाबदारी असणार आहे. त्यानंतर अष्टपैलू आंद्रे रसेल आणि सुनील नरिन संघाची जबाबदारी सांभाळतील. सुनील नरिन फलंदाजीबरोबरच अनुभीव फिरकी गोलंदाज आहे. त्याला फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीची साथ मिळेल. याशिवाय शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि टीम साऊदी यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. यातला शार्दुल ठाकूर हा तळाला येऊन उपयुक्त फलंदाजी करण्यातही माहिर आहे. 

IPL 2023 केकेआरचं वेळापत्रक

1 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स - मोहाली 

6 एप्रिल – कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - कोलकाता 

9 एप्रिल – गुजरात टाइटन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स - अहमदाबाद 

14 एप्रिल – कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद - कोलकाता 

16 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स - मुंबई 

20 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स - दिल्ली 

23 एप्रिल – कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स - कोलकाता 

26 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स - बंगलोर 

29 एप्रिल – कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स - कोलकाता 

4 मे – सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स - हैदराबाद

8 मे – कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध पंजाब किंग्स - कोलकाता 

11 मे – कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - कोलकाता 

14 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स - चेन्नई 

20 मे – कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स - कोलकाता 

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार) नितीश राणा, रहमानुल्लाह गुरबाज, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरिन, शार्दुल ठाकुर, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, टिम साउदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंह, नारायण जगदीसन, वैभव अरोडा , सुयश शर्मा, डेविड वाइज, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंह, लिटन दास, शाकिब अल हसन

2023-03-28T09:38:03Z dg43tfdfdgfd