IPL 2023: हार्दिक पंड्याने केला MS DHONI चा अपमान? स्टेजवर केलं असं कृत्य की...!

Hardik Pandya : आयपीएलच्या 16 व्या सिझनला आजपासून सुरुवात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना खेळवला जातोय. या सिझनची ओपनिंग सेरेमनी देखील एकदम दमदार करण्यात आली. यावेळी अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि बॉलिवूड सिंग अरिजीत सिंह यांनी चार चांद लावले. दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही कर्णधारांना स्टेजवर बोलवण्यात आलं होतं. यावेळी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने धोनीसोबत असं कृत्य केलं, जे माहीच्या चाहत्यांना अजिबात आवडलेलं नाही. 

सामना सुरु होण्यापूर्वी हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी (MS Dhoni) शी हात मिळवत नाही. यावेळी तो धोनीच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तींशी हात मिळवतोय. दरम्यान हा व्हिडीओ माहीच्या चाहत्यांना मात्र काही आवडलेला नाहीये. 

Hardik Pandya ने MS Dhoni हात मिळवला नाही

ओपनिंग सेरेमनीमध्ये स्टार्सच्या परफॉर्मन्सनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांना स्टेजवर बोलवण्यात आलं होतं. यानंतर चेन्नई टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला देखील बोलावलं. धोनीनंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याही स्टेजवर आला. 

यावेळी हार्दिकचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एमएस धोनीला सोडून हार्दिक जय शाह, अरुण धुमल आणि रॉजर बिन्नी यांच्याशी हार्दिक हात मिळवतो. मात्र धोनीशी मिळवत नाही. मुख्य म्हणजे धोनी या सर्वांच्या प्रथम उभा असतो पण तरीही त्याला सोडून हार्दिक थेट बाकीच्या सदस्यांशी हात मिळवताना दिसतोय.

गुजरातने टायटन्सने जिंकला टॉस

16 व्या सिझनच्या पहिल्या सामन्यामध्या हार्दिक पंड्याने टॉस जिंकला. यावेळी गुजरातने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र चेन्नईच्या फलंदाजांसाठी हा निर्णय चांगलाच फायदेशीर ठरलेला दिसला. चेन्नईचा ओपनर ऋतुराज गायकवाडने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करत उत्तम फलंदाजी केली.

2023-03-31T16:09:39Z dg43tfdfdgfd