IPL 2023 NEWS : पहिल्याच सामन्याआधी चेन्नईला धक्का; धोनी मैदानात आलाच नाही तर....?

IPL 2023 News : आयपीएलची दणक्यात सुरुवात होत असताना आणि संघ या स्पर्धेसाठी सज्ज झालेले असतानाच चेन्नईच्या संघाला मोठा धक्का मिळाला आहे. स्पर्धेला सुरुवातही झालेली नाही, तोच चेन्नईच्या संघाचा कर्णधार असणारा महेंद्रसिंह धोनी पहिल्याच सामन्याला मुकणार असल्याचं चित्र आहे. (IPL 2023 News chennai Superkings CSK vs gujarat titans GT Mahendra Sing Dhoni might not be playing)

आयपीएलचं जेतेपद चार वेळा पटकावणाऱ्या चेन्नईसोत पहिल्यात सामन्या गुजरात टायटन्सचा संघ अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भिडणार आहे. या सामन्यात धोनी चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसू शकतो अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

सामन्याआधी सुरु असणाऱ्या सरावादरम्यान धोनीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या दुखापतीमुळं तो सामन्याच्या एक दिवस आधीसुद्धा नेट्समध्ये सरावासाठी दिसला नव्हता. परिणामी त्याची ही दुखापत CSK च्या संघासोबतच क्रिकेटप्रेमींसाठीही मोठी बातमी ठरत आहे. त्यामुळं आता माहिच्या अनुपस्थितीत त्याच्या जागी नेमकं संघाला आधार देणार कोण? हा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधार कोण? 

दुखापतीमुळं धोनीला गुजरातविरुद्धचा पहिला सामना खेळता आलाच नाही, तर संघाकडे या जबाबदारी चार खेळाडूंचे पर्याय आहेत. यामध्ये दोन भारती आणि दोन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. धोनी गैरहजर असल्यास सलामीच्या सामन्याचं कर्णधारपद बेन स्टोक्सकडे जाऊ शकतं. आक्रमक कर्णधार अशी जागतिक क्रिकेटमध्ये ओळख असणाऱ्या स्टोक्सकडे CSK चा भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहिलं जात आहे. पण, त्याच्याही Fitness बाबत भूमिका स्पष्ट नाही हेसुद्धा तितकंच खरं. 

दुसरं नाव म्हणजे मोईन अली. जोस बटलरच्या अनुपस्थितीत त्यानं हल्लीच इंग्लंडच्या संघाचं नेतृत्त्वं केलं होतं. भारतीय खेळाडूंमध्ये समोर येणारी नावं म्हणजे रविंद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे. 

हेसुद्धा पाहा : IPL 2023 Live Streaming: फुकटात पाहा GT vs CSK सामना; कुठे आणि कसा याबाबतची माहिती एका क्लिकवर 

मागील पर्वात जडेजाकडे धोनीनं ही जबाबदारी सोपवली होती. पण, काही कारणास्तव त्यानं हे पद पुन्हा माहिकडेच दिलं. अजिंक्य रहाणेला कर्णधारपद मिळाल्यास ही त्याच्यासाठी पूर्णपणे नवी संधी ठरू शकते. पण, चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळणार की नाही इथपासूनच याची सुरुवात आहे. 

एकदा चेन्नईच्या संघावर नजर टाका 

बेन स्टोक्स, दीपक चाहर, एमएस धोनी, मोइन अली, अंबाती रायडू, ऋतुराज गायकवाड, शिवम दूबे, मिचेल सेंटनर, राजवर्धन हँगरगेकर, प्रशांत सोलंकी, डेवोन कॉनवे, काइल जेमीसन, महीष तीक्षणा, निशांत सिंधु, अजिंक्य रहाणे, ड्वेन प्रिटोरियस, अजय मंडल, सुभ्रांशु सेनापती, आकाश सिंह, सिमरजीत सिंग, मथीशा पथिराना, भगत वर्मा, शॅक रशीद, तुषार देशपांडे आता यातून कोणाची निवड Playing 11 साठी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

   

2023-03-31T05:09:28Z dg43tfdfdgfd