IPL 2023 NEWS : पाहा VIDEO; 'सुपला शॉट'मुळे सुर्यकुमार यादव वाचला, नाहीतर आलेली रुमबाहेरच राहण्याची वेळ

IPL 2023 News : आयपीएलचा नवा हंगाम नेमका कसा असणार? याचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यातच सर्व संघ आता शेवटच्या टप्प्यातील तयारी करताना दिसत आहेत. काही खेळाडू इथंही त्यांचं वेगळेपण दाखवताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादवही (suryakumar yadav) त्यातलाच एक. कारण, या पठ्ठ्यानं पुन्हा एकदा एक कमाल करत सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. 

मुंबई इंडियन्सच्या (Mumbia Indians) सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये त्यानं नेमकं केलंय तरी काय हे पाहायला मिळत आहे. बरं, हे पाहतान तुम्ही हसू थांबवूच शकणार नाही. कारण....? 

सध्याच्या घडीला कोणत्याही बड्या हॉटेलमध्ये गेलं असता तिथं रुम लॉक करण्यासाठी काही महत्त्वाच्या पद्धती वापरात आणलेल्या असतात. कार्ड की आणि आताआतातर पासवर्ड वापरत हे रुम लॉक- अनलॉक होतात. पण, पासवर्ड विसरलात तर? पुढे नेमकं काय होतं याची हलकीशी झलक सूर्यकुमारनं पाहिली. 

हेसुद्धा वाचा : Ajinkya Rahane : मराठमोळ्या रहाणेला BCCI कडून मोठा धक्का; आता फक्त निवृत्ती…!

 

मुंबईचा हा धडाकेबाज खेळाडू रुम अनलॉक करतेवेळी पासवर्डच विसरला. मग काय? जगभरात आहेत नाहीत ते सगळे पासवर्ड त्यानं वापरून पाहिले, 'दुल्हन की बिदाई का वक्त...', 'क्या गुंडा बनेगा रे तू?', 'तेजा मै हूं, मार्क इधर है' हे असं सारंकाही रुमच्या दारावरच उभं राहून तो बोलत राहिला. पण, मशिननं मात्र Access Denied असंच उत्तर देत त्याला प्रवेश नाकारला. बस्स, मग शेवटी काय? 'सुपला शॉsssट' असं सूर्या म्हणाला आणि क्षणातच त्याच्या रुमचा दरवाडा उघडला. हे सर्व सुरु असताना शेवटच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर सुटकेचा नि:श्वास आणि सोबतच आनंद या दोन्ही भावना पाहण्याजोग्या होत्या. 

बरं क्रिकेटप्रेमी आणि Mumbai Indians चे चाहते सूर्याचे हे प्रयत्न पाहताना त्याची विनोदी शैलीमुळं पोट धरून हसू लागले होते. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. इतकंच नव्हे तर, अनेकांनी तो स्टेटसमध्येही ठेवला आहे. आता हे सुपला शॉट प्रकरण नेमकं काय आहे हे सोशल मीडियावर रेंगाळणाऱ्या नेटकऱ्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. पण, तरीही पाहून घ्या सूर्यानं काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्स्त्यांवर मारलेला सुपला शॉट. जिथून तुम्हाला याचा किमान अंदाज येऊ शकतो. 

2023-03-27T08:37:52Z dg43tfdfdgfd