IPL 2023 TEAM PREVIEW: 'नवा आहे पण छावा आहे' लखनऊ सुपर जायंट्सच्या ऑलराऊंड खेळाडूंची फौज सज्ज

Lucknow Super Giants IPL 2023 : के एल राहुलच्या (K L Rahul) नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचा हा दुसरा आयपीएल (IPL 2023) हंगाम आहे. गेल्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या लखनऊने (Lucknow Super Giants) दमदार कामगिरी केली होती. पहिल्यांदाच खेळणाऱ्या लखनऊने थेट टॉप चारमध्ये जागा बनवली होती. त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. पण लखनऊच्या कामगिरीची दखल सर्वांनीच घेतली. आता नव्या हंगामात लखनऊ पुन्हा एकदा नवा धमा (Allround Players) का करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यासाठी संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. केल राहुल कर्णधार असलेल्या या संघात अनेक दिग्गज ऑलराऊंड खेळाडूंची फौज आहे. प्रत्येक खेळाडूत सामना फिरवण्याची धमक आहे. 

दिग्गज खेळाडूंचा संघात भरणा

ऑलराऊंड खेळाडूंमुळे लखनऊ सुपर जायंट्स भक्कम बनली आहे. कृणाल पांड्या (Krunal Pandya), कायले मेयर्स (Kyle Mayers) आणि मार्कस स्टोयनिससारखे (Marcus Stoinis) अनुभवी खेळाडू टीममध्ये असून अंतिम अकरामध्ये (Playing XI) संधी मिळाल्यास दमदार कामगिरी करु शकतात. हे तीनही ऑलराऊंडर खेळाडू संघासाठी गेमचेंजर ठरु शकतात. लखनऊने विकेटकीपर आणि फलंदाज निकोलस पूरनवर (Nicholas Pooran) मोठा डाव लावला आहे. लिलावात त्याच्यावर तब्बल 16 कोटींची बोली लावत संघात घेतलं आहे, पूरन आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळ त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. 

पहिला सामना 1 एप्रिलला

आयपीएलमध्ये आपली दुसरी स्पर्धा खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सचा पहिला सामना 1 एप्रिलला लखनऊमधल्या इकाना क्रिकेट स्टेडिअममध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) रंगणार आहे. त्यानंतर 3 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सबरोबर लऊनऊ आपला दुसरा सामना खेळणार आहे. साखळीतील शेवटचा सामना 20 मे रोजी ईडन गार्डन स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे. 

आयपीएल 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सची कामगिरी दमदार झाली होती. लखनऊने 14 सामन्यांपैकी तब्बल 9 सामन्यात विजय मिळवला होता. आणि पॉईंटटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकाव हा संघ होता. 

स्पर्धेआधी लखनऊला धक्का

पण यंदाच्या स्पर्धेआधीच लखनऊला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सलामीवीर क्विटन डीकॉक खेळू शकणार नाही. त्यामुळे के एल राहुलला सलामी फलंदाजासाठी पर्याय शोधावा लागणार आहे. अशात राहुल बरोबर पूरन संघासाठी सलामीला येण्याची शक्यता आहे. पूरन सलामीला आला तर मधल्या फळीत दीपक हुड्डा आणि आयुष बदोनीला संधी मिळू शकते. गेल्या हंगामात युवा आयुष बदोनीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.  दुसरा मोठा धक्का म्हणजे मोहसिन खान दुखापतग्रस्त आहे आणि संपूर्ण हंगाम तो बाहेर राहू शकतो.

लखनऊ सुपर जाएंट्सचा संघ

केएल राहुल (कर्णधार), आवेश खान, आयुष बडोनी, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), के गौतम, दीपक हुड्डा, प्रेरक मांकड, काइल मेयर्स, अमित मिश्रा, मोहसिन खान, नवीन उल हक, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), रवि बिश्नोई, डेनियल सॅम्स, करण शर्मा, रोमारियो शेफर्ड, मार्कस स्टोइनिस, स्वप्निल सिंह, जयदेव उनादकट, मनन वोहरा, मार्क वुड, मयंक यादव, यश ठाकुर, युद्धवीर सिंह

2023-03-29T08:38:37Z dg43tfdfdgfd