IPL 2023 : चेन्नईच्या चेपॉकवर पुन्हा घुमणार माही..माहीचा आवाज, पाचव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी CSK सज्ज

IPL 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची (India vs Australia ODI Series) एकदिवसीय मालिका संपलीय आणि आता क्रिकेट चाहत्यांनी उत्सुकता लागली आहे ती इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची (IPL 2023). येत्या 31 मार्चपासून आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होतेय. गतविजेती गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 31 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) सलामीचा सामना रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये तब्बल चार वेळा जेतेपद पटकावलं आहे आणि आता पाचव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी चेन्नईचा संघ एमएस धोणीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. 

गत हंगामात निराशाजनक कामगिरी

मुंबई इंडियन्सनंतर (Mumbai Indians) आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्सकडे पाहिल जातं. पण असं असलं तरी आयपीएलचा पंधरावा हंगाम म्हणजे गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली होती. दिग्गज खेळाडू असलेल्या चेन्नईला प्लेऑफमध्येही दाखल होता आलं नव्हतं. पण या हंगामात नव्या उत्साहासह चेन्नई संघ मैदानात उतरणार आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये फ्रँचाईजने दमदार खेळाडूंवर बोली लावत आपल्या संघात घेतलं आहे. 

माहिच्या नेतृत्वात चेन्नई दमदार

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून महेंद्रसिंग धोणी चेन्नई संघाचं नेतृत्व करतोय. आणि यावेळीदेखील माहिच्या नेतृत्वात चेन्नई संघ खेळणार आहे. महेंद्रसिंग धोणीने आतापर्यंत चेन्नईला 2010, 2011, 2018 आणि 2021 अशी चारवेळा संघाला ट्रॉफी जिंकून दिली आहे. या हंगामात सीएसकेसाठी एक जमेची बाजू म्हणजे दोन धडाकेबाज फलंदाज संघात सहभागी झाले आहेत. इंग्लंडचा धडाकेबाज ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि मोईन अली (Moin Ali) या दोघांची सीएसकेमध्ये एन्ट्री झाली आहे. आयपीएल खेळण्यासाठी दोनही खेळाडू भारतात दाखल झाले आहेत. 

चार वर्षांनंतर चेपॉकवर सामना

धोणीच्या नेतृत्वाखाली सीएसके तब्बल चार वर्षांनंतर घरच्या मैदानावर खेळणार आहे. 3 एप्रिलला चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर (Chennai Chepauk Stadium) चेन्नईचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी (Lucknow Super Giants) होणार आहे. 2019 नंतर चेन्नईचा संघ आपल्या घरच्या मैदानावर एकही सामना खेळलेला नाही. चेपॉकवर चेन्नईचा संघ एकूण सात सामने खेळणार आहे. 

चौदा सामने खेळणार चेन्नई

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स एकूण चौदा सामने खेळणार आहे. यात आरसीबी, गुजरात, पंजाब आणि हैदराबाद संघाबरोबर प्रत्येकी एक सामना खेळवला जाणार आहे. इतर संघांशी चेन्नईचे प्रत्येकी दोन सामने रंगतील. 31 मार्चला चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधला पहिला सामना खेळेल तर 20 मे ला साखळीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर खेळला जाणार आहे. आपण एक नजर टाकूया चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएलमधल्या संपूर्ण वेळापत्रकावर

IPL 2023 चेन्नई सुपर किंग्सचं वेळापत्रक

31 मार्च- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स - अहमदाबाद

3 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स- चेन्नई

8 एप्रिल-  चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - मुंबई

12 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - चेन्नई

17 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बंगलोर - बंगलोर

21 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- चेन्नई

23 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स - कोलकाता

27 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - जयपूर

30 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स- चेन्नई

04 मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स -  लखनऊ

06 मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - चेन्नई

10 मे- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- चेन्नई

14 मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- चेन्नई

20 मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - दिल्ली

चेन्नई सुपर किंग्स टीम

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश तीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल

2023-03-27T08:52:33Z dg43tfdfdgfd