IPL 2023: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; आयपीएलपूर्वी ROHIT SHARMA पडला आजारी!

IPL 2023: अखेर उद्यापासून आयपीएलचा (IPL 2023) थरार सुरु होणार आहे. यंदाचा आयपीएलचा हा 16 वा सिझन असणार आहे. या सिझनची जय्यत तयारी सुरु झाली असून आज सर्व टीमच्या कर्णधारांनी आयपीएलच्या ट्रॉफीसोबत फोटोशूट केलं. मात्र यावेळी या फोटोशूटपेक्षा जास्त चर्चा होती ती रोहित शर्माची (Rohit sharma). याचं कारण म्हणजे, रोहित शर्मा या फोटोशूटसाठी अनुपस्थित होता. 

दरम्यान या फोटोशूटला रोहित शर्मा का अनुपस्थितीत होता, याबाबत अनेक तर्क वितर्क काढण्यात आले. मात्र त्यानंतर समोर आलेल्या माहितीमुळे मुंबई इंडियन्सच्या टीमला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मा अनुपस्थित

30 मार्च म्हणजे गुरुवारी सर्व कर्णधारांचं आयपीएलच्या ट्रॉफीसोबत शूट करण्यात आलं. यावेळी सगळ्यांच्या नजरा सर्वात जास्तवेळा या ट्रॉफीला उचलण्याऱ्या रोहित शर्माला शोधत होत्या. मात्र या शूटसाठी रोहित शर्मा अनुपस्थितीत होता. 

कर्णधार रोहित शर्मा आजारी 

शूटला न येण्यामागील कारण असं समजलं जात होतं की, रोहित दुसऱ्या एका शूटमध्ये व्यस्त असावा. मात्र टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, रोहित शर्मा आजारी पडला आहे. हिटमॅनची तब्येत अचानक बिघडल्याचं समोर आलंय. दरम्यान याच कारणामुळे तो आज फोटोशूटसाठी उपस्थित राहू शकला नाही. 

रोहित शर्माची तब्येत कितपत बिघडली आहे, याची पूर्ण माहिती अजून मिळालेली नाही. मात्र त्रास जास्त असल्यास तो रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा सामना खेळू शकणार की नाही याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाकडून दिलेल्या माहितीनुसार, 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित फीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान बीसीसीआयच्या वर्कलोड मॅनेजमेंटनुसार, रोहित शर्माना आयपीएल 2023 चे काही सामने मिस करावे लागतील. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

एडन मार्करम देखील फोटोशूटसाठी अनुपस्थित

सनरायझर्स हैदराबादच्या टीमच्या नेतृत्वाची धुरा आता एडन मार्करमकडे देण्यात आलीये. मात्र एडन मार्करम अजून भारतात आला  नाही. त्यामुळे त्याच्या जागी सनरायझर्सनचा भुवनेश्वर कुमारने फोटोमध्ये सहभाग घेतला. मात्र यावेळी मुंबई इंडियन्सचा एकही खेळाडू किंवा कर्णधार रोहित शर्मा दिसला नसल्याने त्याची एकच चर्चा झाली.

2023-03-30T16:54:16Z dg43tfdfdgfd