​IPL 2025 साठी सज्ज होतोय RCB चा नवा कर्णधार, बॅटमधून पाडतोय धावांचा पाऊस​

RCB's New Captain: IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी, RCB ने Faf Du Plessis ला सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आरसीबीच्या नव्या कर्णधाराबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. विराट कोहली पुन्हा एकदा संघाची धुरा सांभाळू शकतो, असे लोकांच्या एका वर्गाचे मत आहे, मात्र एका खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमधील कर्णधारपद आणि फलंदाजीच्या बळावर आरसीबीच्या कर्णधारपदासाठी जोरदार दावा मांडला आहे. चला जाणून घेऊया कोण आहे तो खेळाडू?

2025-01-07T19:31:14Z