केएल राहुलची बॅट इंग्लंडमध्ये सध्या चांगलीच तळपतेय. सीरीजमध्ये त्याने दोन सेंच्युरी झळवकल्या आहेत. या दरम्यान आता एक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सऐवजी कोलकता नाइट रायडर्सकडून खेळू शकतो. केकेआरच्या टीमला काहीही करुन ट्रेड करुन त्याला आपल्या स्क्वाडमध्ये आणायचं आहे. केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. त्याने 13 इनिंगमध्ये 539 धावा केल्या होत्या.
कॅप्टनची आवश्यकता असल्याने केकेआर केएल राहुलला खरेदी करण्याच्या मूडमध्ये आहे. मागच्या सीजनमध्ये अजिंक्य रहाणे केकेआरचा कॅप्टन होता. टीम प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नव्हती. केकेआरच प्रदर्शन खूपच खराब होतं. केकेआर आता मोठे बदल करण्याच्या मूडमध्ये आहे. त्यामुळे केएल राहुलला टीममध्ये आणून कॅप्टन बनवण्याच प्लानिंग आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार केकेआर केएल राहुलसाठी 25 कोटी पर्यंत रक्कम खर्च करायला तयार आहे. केएल राहुल फक्त चांगला फलंदाजच नाहीय, तर एक चांगला कर्णधार आणि विकेटकीपरची भूमिका सुद्धा निभावू शकतो. म्हणूनच केकेआर त्याच्यासाठी इतकी मोठी रक्कम मोजायला तयार आहे.
स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली
केकेआरने आयपीएल 2025 ऑक्शनच्या आधी स्वत:च स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारली होती. त्यांनी टीमला तिसरी आयपीएल जिंकून देणारा कॅप्टन श्रेयस अय्यरला रिटेन केलं नाही. अय्यर गेल्यामुळे केकेआरच मोठं नुकसान झालं. सर्वात आधी त्यांनी कॅप्टन बदलला. त्यानंतर टीमच्या खेळण्याची पद्धत बदलली. टीम 14 पैकी फक्त 5 सामने जिंकू शकली. आयपीएल 2026 आधी केकेआरने चंद्रकांत पंडित यांना हेड कोच पदावरुन हटवलं आहे. कधी या टीमची गोलंदाजी युनिट मजबूत बनवणारे भरत अरुण आता लखनऊसाठी काम करतात. केकेआरला आता काहीही करुन केएल राहुलला टीममध्ये आणून बॅलन्स बनवायचा आहे. केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्स सोडणार का? हा प्रश्न आहे.
2025-07-31T08:53:10Z