MS DHONI IPL 2023: आयपीएलसाठी 'थाला' करतोय खास तयारी; अखेर 'तो' VIDEO आला समोर!

MS Dhoni IPL 2023 CSK : 'मैं पल दो पल का शायर हूँ' म्हणत 3 वर्षापूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (MS Dhoni retirement) घेतली. मात्र, धोनी आयपीएलचे (IPL 2023) सामने खेळतो. यंदाचे आयपीएल हंगाम धोनीसाठी अखेरचा असेल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने (CSK) यावेळी आयपीएल जिंकावी, अशी अपेक्षा थाला धोनीचे (MS Dhoni) फॅन्स करत आहेत. अशातच आता आयपीएलसाठी धोनी खास तयारी करत असल्याचं दिसतंय. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल (MS Dhoni Viral Video) देखील होताना दिसतोय.

चेन्नईचा संघ सध्या सराव सत्रात घाम गाळताना दिसतोय. सराव सत्रादरम्यानचाच धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत धोनी गोलंदाजी (MS Dhoni Bowling Video) करताना दिसतोय आणि तो स्व:ताच त्या चेंडूवर शॉट देखील खेळताना दिसत आहे. त्यानंतर दोन्ही धोनी समोर येऊन हसताना दिसत आहेत. दोन व्हिडिओ मर्ज करून हा व्हिडिओ तयार करण्यात आलाय.

पाहा VIDEO -

बेन स्टोक्सची (Ben Stokes) चेन्नईत एन्ट्री

चेन्नईच्या संघात अनेक नवीन खेळाडू संघात सामील झाले आहेत. यावेळी चेन्नईने बेन स्टोक्सला (Ben Stokes) संधी दिली आहे. चेन्नईने आयपीएलच्या (IPL 2023 Mini Auction) लिलावात बेन स्टोक्सला 16.25 कोटींमध्ये खरेदी केलंय. धोनीने आयपीएल 2023 लिलावापूर्वी 18 खेळाडूंना कायम ठेवलं होतं.

आणखी वाचा - MS Dhoni Retirement: धोनी खेळणार शेवटचा IPL सामना? पाहा तारीख, वेळ आणि ठिकाण

दरम्यान, बेन स्टोक्स चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) मधल्या फळीला मजबूत करेल, अशी अपेक्षा आहे. रवींद्र जडेजा, मोईन अली या दोन अष्टपैलू खेळाडूंमुळे मोक्याच्या क्षणी संघ सामना पलटू शकतो. दासून शनाका, जेम्स नीशम, डॅरिल मिशेल या तीन गोलंदाजांमुळे चहरला साथीदार मिळणार आहे.

कसा असेल चेन्नईचा (CSK) संभाव्य संघ?

डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, बेन स्टोक्स, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चहर, मुकेश चौधरी, महेश तिखस्ना.

2023-03-25T11:21:43Z dg43tfdfdgfd