NITESH KUMAR WON GOLD MEDAL: नितेश कुमार ठरला गोल्डन बॉय, भारतासाठी जिंकले दुसरे सुवर्णपदक

पॅरिस : भारताच्या नितेश कुमारने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. बॅडमिंटन एकेरीमध्ये ब्रिटेनच्या बेथलचे यावेळी नितेशपुढे आव्हान होते. नितेशने यावेळी पहिला गेम २१-१४ असा सहजपणे जिंकला आणि त्यामुळे तो सुवर्णपदक जिंकू शकतो, असे वाटत होते. नितेशला दुसऱ्या गेममध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिसरा गेम दोघांसाठी निर्णायक ठरणार होता. तिसऱ्या गेममध्ये नितेशने आघाडी घेतली आणि हा सामना जिंकत सुवर्णपदक पटकावले. भारताचे हे या पॅरिस पॅरालिम्पिकमधील दुसरे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी नेमबाजीत भारताने सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर भारताला या स्पर्धेत हे दुसरे सुवर्णपदक पटकावता आले आहे.

निेतेश कुमारने या सामन्याची दमदार सुरुवात केली. नितेशने पहिला गुण जिंकला आणि चांगली सुरुवात केली. त्यानंतर अजून गुण जिंकत नितेशने २-० अशी दमदार आघाडी घेतली. त्यानंतर मात्र नितेशला दोन गुण गमवावे लागले आणि त्यामुळे सामना २-२ असा बरोबरीत होता. त्यानंतर पुन्हा एकदा नितेशने दोन गुण कमावले, पण त्यानंतर पुन्हा दोन गुण गमावले. त्यामुळे पुन्हा एकदा नितेश आणि बेथेल यांच्यात बरोबरी झाली. त्यानंतर नितेशने एक गुण जिंकला, पण त्याला तीन गुण गमवावे लागले. त्यामुळे तो ७-५ अशा पिछाडीवर होता. पण त्यानंतर नितेशने सामन्यात ९-९ अशी बरोबरी केली.

नितेश कुमारने त्यानंतर दोन गुणांची आघाडी घेतली होती. त्यामुळे निेतेश कुमार हा ११-९ असा आघाडीवर होता. पण पुन्हा एकदा त्याने ही आघाडी गमावली. नितेश पिछाडीवर पडला होता. पण त्याने हार मानली नाही. त्यानंतर एकामागून एक त्याने चार गुण जिंकले आणि त्याने १७-१४ अशी दमदार आघाडी घेतली. त्यामुळे आता नितेश पहिला गेम जिंकेल, असे वाटत होते. नितेशने अजून एक गुण जिंकला आणि तो पहिला गेम जिंकण्याच्या दिशेने निघाला. नितेशने त्यानंतर सलग गुण जिंकले आणि पहिला गेम आपल्या नावावर केला. नितेशने यावेळी पहिला गेम २१-१४ असा जिंकला.

नितेशने पहिला गेम जिंकला, त्यामुळे त्याच्यासाठी दुसरा गेम निर्णायक होता. हा गेम जिंकत नितेशला सुवर्णपदक जिंकता येऊ शकत होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष या गेमवर लागले होते. या गेममध्ये नितेशने ४-३ अशी आघाडी घेतली होती. या गेमममध्ये नितेशने आघाडी कायम ठेवली आणि तो सुवर्णपदकाच्या दिशेने कूच करायला लागला होता. नितेशने दुसऱ्या दुसऱ्या गेममध्ये ६-५ अशी आघाडी कायम ठेवली होती. नितेशमे त्यानंतर ११-८ अशी आपली घाडी वाढवली. त्यानंतर नितेशला फक्त सुवर्णपदक जिंकण्यासाठी १० गुणांची गरज होती. पण आघाडी असूनही नितेशने हा दुसरा गेम गमावला. त्यामुळे हा सामना तिसऱ्या गेममध्ये गेला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-02T11:39:54Z dg43tfdfdgfd