RAVINDRA JADEJA MISTAKE : जडेजाने BCCIचा आदेश झुगारला! स्टार अष्टपैलूवर कारवाईची टांगती तलवार

ind vs eng 2nd test ravindra jadeja break bcci rule

इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गिल व्यतिरिक्त रवींद्र जडेजानेही आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. जडेजाने पहिल्या डावात 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, मात्र दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका महत्त्वाच्या नियमाचे उल्लंघन केले.

भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान, अष्टपैलू रवींद्र जडेजाने ही मोठी चूक केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती, ज्यांचे कठोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापि, जडेजाने या नियमाकडे दुर्लक्ष केल्याने आता त्याच्यावर बोर्डाकडून काही कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का! कर्णधार मालिकेबाहेर; संघाची धुरा नव्या खेळाडूकडे

BCCIच्या ‘या’ नियमाचे जडेजाने केले उल्लंघन

भारतीय संघ जेव्हा 2025 च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा दौरा संपवून मायदेशी परतला होता, तेव्हा बीसीसीआयने परदेश दौऱ्यांसंदर्भात काही नवीन नियम लागू केले होते. यातील एक महत्त्वाचा नियम असा होता की, कोणताही खेळाडू स्टेडियममध्ये एकट्याने जाणार नाही किंवा तेथून एकटा परतणार नाही. सर्व खेळाडूंनी टीम बसमधूनच एकत्र प्रवास करणे बंधनकारक होते. मात्र, एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा टीम बसची वाट न पाहता संघापूर्वीच स्टेडियमकडे रवाना झाला. अर्थात, जडेजाने संघाचे हित लक्षात घेऊनच हा नियम मोडल्याचे म्हटले आहे.

IND vs ENG 2nd Test : गिल-जडेजा जोडीची 'SENA' देशांमधील विक्रमी भागीदारी!

जडेजाने स्वतः दिले स्पष्टीकरण

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र जडेजाने यावर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, ‘चेंडू नवीन असल्यामुळे मला अतिरिक्त फलंदाजीचा सराव करण्याची गरज वाटली. कारण नवीन चेंडूवर मी अधिक चांगल्या प्रकारे खेळू शकलो, तर माझे काम सोपे होईल असे मला वाटले. मी असे करण्यात यशस्वी ठरलो आणि दुपारच्या जेवणापर्यंत फलंदाजी करू शकलो. जेव्हा तुम्ही संघासाठी फलंदाजीने योगदान देता, तेव्हा खूप आनंद होतो. मी फलंदाजीला आलो तेव्हा संघाने 5 गडी गमावले होते, अशा स्थितीत मी संघासाठी चांगली कामगिरी करू शकलो याचे मला समाधान आहे.’

Ravindra Jadeja Record : सर जडेजाची तलवार घुमली.. नोंदवला ऐतिहासिक पराक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

2025-07-04T12:03:11Z